“अजितदादांसोबत आलेले सर्व त्यांचे कुटुंब होते, रोहित पवार राजकीय रंग देतायत”; कुणाची टीका?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2026 15:36 IST2026-02-13T15:33:41+5:302026-02-13T15:36:11+5:30
NCP Ajit Pawar Group Anand Paranjape News: त्या घटनाक्रमाला जो काही राजकीय रंग रोहित पवार यांच्याकडून आरोप करून देण्यात येत आहे त्याचा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील नेत्याने निषेध नोंदवला.

“अजितदादांसोबत आलेले सर्व त्यांचे कुटुंब होते, रोहित पवार राजकीय रंग देतायत”; कुणाची टीका?
NCP Ajit Pawar Group Anand Paranjape News: कुटुंब म्हणजे फक्त रक्ताची नाती नाही तर दिनांक २ जुलै २०२३ मध्ये जी वेगळी राजकीय भूमिका घेतल्यानंतर अजितदादांसोबत आलेले सर्व त्यांचे कुटुंब होते अशी स्पष्ट भूमिका मांडतानाच होणार्या वक्तव्याने क्षणभर विचार करा की, या सगळ्यांमुळे अजितदादा पवार यांच्या कुटुंबावर किती आघात, किती वेदना त्यांना होत असतील अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे यांनी आपला उद्वेग आणि संताप व्यक्त केला.
अजितदादांच्या अपघाती मृत्यूनंतर जी काही वक्तव्ये काही दिवसांपासून केली जात आहेत, त्याच्यामागे असलेल्या मार्गदर्शकाचा पक्षाच्यावतीने आनंद परांजपे यांनी निषेध केला आहे. ही महाराष्ट्राची संस्कृती नाही अशा शब्दात खडेबोल आनंद परांजपे यांनी सुनावले आहेत. अजितदादांच्या दु:खद निधनानंतर अंत्यविधी होण्याआधीच विलीनीकरणाच्या चर्चा सुरू झाल्या. अशा प्रकारची राजकीय वक्तव्य त्यावेळी टाळायला हवी होती. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी मांडली होती. जो अपघात झाला आहे, त्याची चौकशी व्हायला हवी, अशी मागणीही पहिल्या दिवसापासून केली आहे, असेही आनंद परांजपे यांनी स्पष्ट केले.
आम्हाला आधार देणारी मायमाऊली सुनेत्रा पवार याच आहेत
रोहित पवार यांनी जे मांडले त्या संपूर्ण प्रकरणांची चौकशी व्हायला हवी. ऐनवेळी कॅप्टन बदलले याचीदेखील चौकशी व्हायला हवी. घात होता की अपघात हेही तपासातून समोर यायला हवे. मात्र त्या घटनाक्रमाबाबत राजकीय बोलले गेले त्याबद्दल आम्ही मान्य करणार नाही. मात्र २८ जानेवारीबाबत त्यांनी जे प्रश्न निर्माण केले आहे त्या घटनाक्रमाची चौकशी व्हायला हवी अशी मागणी करतानाच दादांच्या जाण्याने आम्हाला आधार देणारी मायमाऊली सुनेत्रा पवार याच आहेत, हेही आवर्जून आनंद परांजपे यांनी सांगितले.
ही आमची पहिल्या दिवसापासूनची भूमिका आहे
रोहित पवार यांनी जे प्रश्न उपस्थित केले. ८ वाजून ४४ पर्यंत विमान अपघात झाला. त्यांनी RO पायलट यांचा विषय काढला या सर्वांची चौकशी झाली पाहिजे, ही आमची पहिल्या दिवसापासूनची भूमिका आहे, असे स्पष्ट करतानाच या प्रकरणावर कोणत्याही प्रकाराचे राजकारण करू नये. चौकशी चालू आहे, त्यानंतर निष्कर्षावर येऊ. चौकशीमध्ये सर्व समोर येईल vsr मध्ये कशा प्रकारे इंजिन मेन्टेन करण्यात येत होते. विमान उडण्यास सक्षम होते का? हे समोर येईल. अजितदादांना जे गमावले आहे ते जाणण्याचा अधिकार महाराष्ट्रातील जनतेला आहे, असेही आनंद परांजपे यांनी सांगितले.
दरम्यान, सुनेत्रा पवार यांची विधिमंडळ पदी निवड झाल्यानंतर त्या सर्व आमदाराची भेट घेणार आहेत. शिवाय सर्व वरिष्ठ नेत्यांसोबत बसून चर्चाही करतील. मात्र त्या घटनाक्रमाला जो काही राजकीय रंग रोहित पवार यांच्याकडून आरोप करून देण्यात येत आहे त्याचा आनंद परांजपे यांनी निषेध केला आहे.