शहरं
Join us  
Trending Stories
1
“१४ वर्षांचा वनवास संपला, स्वगृही परतलो, माझ्यात DNA…”; आनंद परांजपेंचा शिंदेसेनेत प्रवेश
2
“...तर महाराष्ट्र पुरोगामी राहिला असता”; प्रणिती शिंदेंचे विधान, गडकरींच्या कार्याची स्तुती
3
तिलक वर्माचा मॅच विनिंग सिक्सर! रोमहर्षक सामन्यात MI नं मारली बाजी; पाचव्या पराभवासह PBKS चं गणित बिघडलं
4
अरविंद केजरीवाल यांच्यासह ‘आप’च्या ५ नेत्यांच्या अडचणी वाढल्या; ‘या’ प्रकरणात खटला चालणार
5
भारतीय जहाजावरील हल्ल्यानंतर होर्मुझजवळ आणखी एक मोठी घटना; नांगर टाकलेल्या जहाजावर कब्जा, इराणच्या दिशेनं गेलं!
6
हिटमॅन रोहित शर्माने MS धोनीचा रेकॉर्ड मोडला, पण विराटला मागे टाकणं जमणार नाही, कारण...
7
सोन्यासंदर्भात सरकारचा आणखी एक मोठा निर्णय! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं खरेदी टाळण्याचं आवाहन 
8
PBKS vs MI : शार्दुल ठाकूरची कमाल! श्रेयस अय्यरचा असा घेतला बदला; अन्... (VIDEO)
9
‘एल-निनो’चा संभाव्य धोका, खरीप हंगामासाठी आवश्यक सज्जता ठेवा: शिवेंद्रसिंहराजे भोसले
10
अमेरिका इराण तणावामध्ये भारतासाठी चांगली बातमी, २ LPG टँकर्स 'होर्मुझ' पार करून पुढे निघाले!
11
Jasprit Bumrah : १३ वर्षांचा प्रवास; जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार! हार्दिक पांड्याचा विषय संपला?
12
ह्युंडाई स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणणार, काय काय फीचर्स असणार? टाटा पंच EV सह या कारना देणार टक्कर
13
जबरदस्त! १३८० किमी धावणार अन् तीन चाकांवरही पळणार! 'ही' नवी हायटेक इलेक्ट्रिक कार ऑटो विश्वात धुमाकूळ घालणार?
14
रशियाचे परराष्ट्र मंत्री PM मोदींना भेटले; तेल संकट, युक्रेन, परस्पर संबंध वाढवण्यावर चर्चा
15
देशातील परिस्थिती गंभीर, सर्वपक्षीय बैठक बोलवा, त्यात पंतप्रधानांनी हजर राहावे- शरद पवार
16
ममता बॅनर्जी खरंच वकील आहेत का, कागदपत्र सादर करा; बार कौन्सिलचे निर्देश, झाले तरी काय?
17
Vaibhav Suryavanshi In India A Squad : वैभव सूर्यवंशीला BCCI चं मोठं गिफ्ट; भारतीय ‘अ’ संघात निवड
18
HSRP बसवली नाही तर कडक कारवाई, नियमभंग केल्यास मोठा दंड होणार; किती शुल्क आकारले जाणार?
19
सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा राजीनामा; पत्रात काय?
20
Top Marathi News Live Updates: राष्ट्रवादी अजितदादा गटाला सोडचिठ्ठी देणारे आनंद परांजपे शिंदेंच्या शिवसेनेत जाणार
Daily Top 2Weekly Top 5

“१४ वर्षांचा वनवास संपला, स्वगृही परतलो, माझ्यात DNA…”; आनंद परांजपेंचा शिंदेसेनेत प्रवेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2026 23:01 IST

Anand Paranjape Join Shiv Sena Shinde Group: सायंकाळी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील सर्व पदांचा आणि पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा देऊन रात्री आनंद परांजपे यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला.

Anand Paranjape Join Shiv Sena Shinde Group:शिवसेना मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत माजी खासदार आनंद परांजपे १४ वर्षांनंतर स्वगृही परतले. बाळासाहेब भवन येथे शिवसेना संसदीय गटनेते खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, मंत्री दादाजी भुसे, मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत परांजपे यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी माजी खासदार राहुल शेवाळे, शिवसेना सचिव सिद्धेश कदम, रविंद्र फाटक आणि इतर प्रमुख नेते उपस्थित होते.

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात कोणतीही नाराजी नव्हती. संघटनेत काम करण्याचा माझा कायम प्रयत्न राहिलेला आहे. संघटनेत काम करण्याची संधी पक्ष देईल, ती पार पाडेन. प्रभू श्रीराम १४ वर्षे वनवासात होते. त्यानंतर रावण वध झाला. वनवास चांगलाही असू शकतो. तुम्ही त्याकडे नकारात्मकतेने का पाहता, अनेक गोष्टी वनवासात शिकायला मिळतात. आता माझी घरवापसी झाली आहे, असे आनंद परांजपे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. 

परांजपे आणि शिंदे कुटुंबीयांचे जिव्हाळ्याचे नाते

आनंद परांजपे शिवसेनेत असताना परांजपे आणि शिंदे कुटुंबीयांचे जिव्हाळ्याचे नाते होते. मधल्या काळात त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काम केले. त्यांना वेगवेगळ्या जबाबदाऱ्या मिळाल्या आणि त्या त्यांनी कुठल्याही अपेक्षा न ठेवता पार पाडल्,या असे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे म्हणाले. आनंद परांजपे यांच्या संघटन कौशल्याचा पक्षाला फायदा होईल, असा विश्वास डॉ. शिंदे यांनी व्यक्त केला. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून दररोज वेगवेगळ्या पक्षाचे कार्यकर्ते शिवसेनेत प्रवेश करत आहेत. राज्यात पक्षाची ताकद वाढत आहे, असेही त्यांनी नमूद केले. 

माझ्यात शिवसेनेचाच डीएनए आहे

घरातूनच शिवसेनेचा वारसा मिळाला. शिवसेनेकडून दोनदा खासदार बनलो. त्यात शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांचे मोठे योगदान होते. मी जरी दुसऱ्या पक्षात होतो तरी माझ्यात शिवसेनेचाच डीएनए आहे. मुख्यमंत्री असताना कॉमन मॅन म्हणून काम करणाऱ्या एकनाथ शिंदे यांनी जनहिताचे अनेक मोठे निर्णय घेतले. त्यांच्या कार्यपद्धतीवर प्रभावित होऊन स्वगृही परतण्याचा निर्णय घेतला. पदाची कोणतीही अपेक्षा न ठेवता एकनाथ शिंदे आणि डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वात संघटनेसाठी काम करण्याची इच्छा यावेळी परांजपे यांनी बोलून दाखवली.

दरम्यान, मनात अनेक भावना दाटून आल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधील माझा १४ वर्षांचा प्रवास, सर्व नेते, पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे मिळालेले प्रेम आणि विश्वास कायम स्मरणात राहील. अत्यंत जड अंतःकरणाने हा प्रवास इथेच संपवून नव्या वाटेवर पाऊल टाकून नवीन प्रवासाची सुरुवात करीत आहे. मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सरचिटणीस तथा प्रवक्ता महाराष्ट्र प्रदेश, समन्वयक - ठाणे व पालघर (जिल्हा) व पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे. आजपर्यंत पक्षाने माझ्यावर विश्वास दाखवून पक्ष संघटनेमध्ये अनेक जबाबदा-या दिल्या. त्याबद्दल मी पक्षाचा शतशः आभारी आहे, असे सांगून आनंद परांजपे यांनी अजित पवरांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व पदांचा आणि पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा सुनेत्रा पवार यांच्याकडे सुपूर्द केला होता. 

English
हिंदी सारांश
Web Title : Anand Paranjape joins Shinde's Shiv Sena after 14 years.

Web Summary : Anand Paranjape rejoined Shiv Sena (Shinde group) after 14 years, expressing faith in Eknath Shinde's leadership. He stated he has Sena's DNA and wants to work for the party without expecting a position. He resigned from the Nationalist Congress Party (Ajit Pawar faction) before joining.
टॅग्स :Shiv SenaशिवसेनाShrikant Shindeश्रीकांत शिंदेEknath Shindeएकनाथ शिंदेUday Samantउदय सामंतNCPराष्ट्रवादी काँग्रेस