Join us
Daily Top 2Weekly Top 5

हिटमॅन रोहित शर्माने MS धोनीचा रेकॉर्ड मोडला, पण विराटला मागे टाकणं जमणार नाही, कारण...

सामनावीर पुरस्कारांच्या शर्यतीतही रोहित-विराट यांच्यात तगडी फाईट

By सुशांत जाधव | Updated: May 14, 2026 22:45 IST

Open in App

पंजाब किंग्स विरुद्धच्या सामन्यात हिटमॅन रोहित शर्मानं इम्पॅक्ट प्लेयरच्या रुपात मैदानात उतरत MS धोनीचा विक्रम मोडीत काढला. IPL मध्ये सर्वाधिक सामने खेळणाऱ्या फलंदाजांच्या यादीत आता त्याने विराट कोहलीची बरोबरी केली आहे. रोहित शर्मानं डेक्कन चार्जर्स आणि मुंबई इंडियन्स या फ्रँचायझीसंघाकडून मिळून २७९ सामने खेळले आहेत. पण विराट कोहलीसोबतच्या शर्यतीत तो यंदाच्या हंगामात टिकू शकणार नाही. जाणून घेऊयात त्यामागचं कारण 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

MS धोनीचा विक्रम मोडला, पण विराटला मागे टाकणं जमणार नाही, कारण...

मुंबई इंडियन्सचा यंदाच्या हंगामातील प्रवास आधीच संपुष्टात आला आहे. पंजाब किंग्स विरुद्धच्या सामन्यानंतर उर्वरित दोन सामन्यातही रोहित शर्मा मैदानात उतरला तर तो यंदाच्या हंगामात २८१ सामने खेळेल. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघासह विराट कोहलीही साखळी फेरीतील लढतीत रोहित शर्माच्या बरोबरीनं २८१ सामने खेळेल. पण RCB चा संघ प्लेऑफ्समध्ये खेळणार असल्यामुळे विराट कोहली रोहितपेक्षा एक पाऊल पुढे राहूनच यंदाचा हंगामात संपवेल.

IPL 2026 मधील दमदार कामगिरीचं फळ! वैभव सूर्यवंशीसह या ५ खेळाडूंना टीम इंडियात संधी

सामनावीर पुरस्कारांच्या शर्यतीतही रोहित-विराट यांच्यात तगडी फाईट

आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक सामने खेळणाऱ्या रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्यात या स्पर्धेत सर्वाधिक वेळा सामनावीर पुरस्कार पटकण्यातही बरोबरीची स्पर्धा आहे. दोघांनी २७९ सामन्यानंतर प्रत्येकी २१-२१ वेळा सामनावीर पुरस्कार जिंकला आहे. सर्वाधिक सामने खेळण्यासोबत इथंही किंग कोहलीला रोहित शर्माला मागे टाकण्याची संधी आहे.

पंजाब किंग्सविरुद्धच्या सामन्यात हिटमॅनचा फ्लॉप शो

पंजाब किंग्स विरुद्धच्या सामन्यात २०१ धावांचा पाठलाग करताना रायन रिकल्टनसोबत रोहित शर्मानं मुंबई इंडियन्सच्या डावाची सुरुवात केली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी रचली. पण रोहित शर्मा सावध पवित्रा घेऊनच खेळताना दिसले. शेवटी चहलच्या गोलंदाजीवर २६ चेंडूत २ षटकाराच्या मदतीने २५ धावा करून तो क्लीन बोल्ड झाला. आयपीएलच्या यंदाच्या हंगामात रोहित शर्मानं कोलकाता विरुद्धच्या सलामीच्या सामन्यात ३८ चेंडूत ७८ धावांची खेळी करत धमाकेदार अंदाजात सुरुवात केली होती. पण दुखापतीमुळे तो बहुतांश सामन्याला मुकला. सलामीच्या सामन्यातील मोठ्या खेळीशिवाय लखनौ सुपर जाएंट्स विरुद्ध  त्याने ४४ चेंडूत ८४ धावांची खेळी केली होती. ही यंदाच्या हंगामातील त्याची सात सामन्यातील सर्वोच्च धावसंख्या ठरली. 

English
हिंदी सारांश
Web Title : Rohit Broke Dhoni's Record, But Can't Surpass Kohli: Here's Why

Web Summary : Rohit Sharma equaled Virat Kohli in IPL matches played, surpassing Dhoni. While Rohit may play 281 games this season, Kohli is likely to play more due to RCB's playoff chances. Both are tied with 21 Man of the Match awards.
टॅग्स :आयपीएल २०२६रोहित शर्मामुंबई इंडियन्सपंजाब किंग्स