शहरं
Join us  
Trending Stories
1
“१४ वर्षांचा वनवास संपला, स्वगृही परतलो, माझ्यात DNA…”; आनंद परांजपेंचा शिंदेसेनेत प्रवेश
2
“...तर महाराष्ट्र पुरोगामी राहिला असता”; प्रणिती शिंदेंचे विधान, गडकरींच्या कार्याची स्तुती
3
अरविंद केजरीवाल यांच्यासह ‘आप’च्या ५ नेत्यांच्या अडचणी वाढल्या; ‘या’ प्रकरणात खटला चालणार
4
भारतीय जहाजावरील हल्ल्यानंतर होर्मुझजवळ आणखी एक मोठी घटना; नांगर टाकलेल्या जहाजावर कब्जा, इराणच्या दिशेनं गेलं!
5
हिटमॅन रोहित शर्माने MS धोनीचा रेकॉर्ड मोडला, पण विराटला मागे टाकणं जमणार नाही, कारण...
6
सोन्यासंदर्भात सरकारचा आणखी एक मोठा निर्णय! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं खरेदी टाळण्याचं आवाहन 
7
PBKS vs MI : शार्दुल ठाकूरची कमाल! श्रेयस अय्यरचा असा घेतला बदला; अन्... (VIDEO)
8
‘एल-निनो’चा संभाव्य धोका, खरीप हंगामासाठी आवश्यक सज्जता ठेवा: शिवेंद्रसिंहराजे भोसले
9
अमेरिका इराण तणावामध्ये भारतासाठी चांगली बातमी, २ LPG टँकर्स 'होर्मुझ' पार करून पुढे निघाले!
10
Jasprit Bumrah : १३ वर्षांचा प्रवास; जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार! हार्दिक पांड्याचा विषय संपला?
11
ह्युंडाई स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणणार, काय काय फीचर्स असणार? टाटा पंच EV सह या कारना देणार टक्कर
12
जबरदस्त! १३८० किमी धावणार अन् तीन चाकांवरही पळणार! 'ही' नवी हायटेक इलेक्ट्रिक कार ऑटो विश्वात धुमाकूळ घालणार?
13
रशियाचे परराष्ट्र मंत्री PM मोदींना भेटले; तेल संकट, युक्रेन, परस्पर संबंध वाढवण्यावर चर्चा
14
देशातील परिस्थिती गंभीर, सर्वपक्षीय बैठक बोलवा, त्यात पंतप्रधानांनी हजर राहावे- शरद पवार
15
ममता बॅनर्जी खरंच वकील आहेत का, कागदपत्र सादर करा; बार कौन्सिलचे निर्देश, झाले तरी काय?
16
Vaibhav Suryavanshi In India A Squad : वैभव सूर्यवंशीला BCCI चं मोठं गिफ्ट; भारतीय ‘अ’ संघात निवड
17
HSRP बसवली नाही तर कडक कारवाई, नियमभंग केल्यास मोठा दंड होणार; किती शुल्क आकारले जाणार?
18
सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा राजीनामा; पत्रात काय?
19
Top Marathi News Live Updates: राष्ट्रवादी अजितदादा गटाला सोडचिठ्ठी देणारे आनंद परांजपे शिंदेंच्या शिवसेनेत जाणार
20
PM मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद, अग्रगण्य कंपनीचा मोठा निर्णय; 'अनावश्यक खर्च' टाळण्यासाठी बनवला मास्टर प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

“...तर महाराष्ट्र पुरोगामी राहिला असता”; प्रणिती शिंदेंचे विधान, गडकरींच्या कार्याची स्तुती

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2026 21:58 IST

Congress MP Praniti Shinde Big Statement About Nitin Gadkari: सर्व खासदारांसाठी कायम नितीन गडकरी यांची दारे खुली असतात. विरोधकांची कामे मार्गी लावतात, असे प्रणिती शिंदे यांनी म्हटले आहे.

Congress MP Praniti Shinde Big Statement About Nitin Gadkari: सर्व खासदारांसाठी कायम ज्यांचा दरवाजा उघडा असतो असे नेते म्हणजे नितीन गडकरी.नितीन गडकरी यांच्याकडे पक्षीय भेद नसतो. तुमच्यासारख्या नेत्याची महाराष्ट्राला उणीव आहे. आज जर तुम्ही मुख्यमंत्री असता, तर महाराष्ट्र पुरोगामी विचारांचा राहिला असता, असे मोठे विधान काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांनी केले आहे. सोलापूर येथे बोलताना प्रणिती शिंदे यांनी हे वक्तव केले. प्रणिती शिंदे यांनी केलेल्या या विधानाची आता राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्याचे म्हटले जात आहे .

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पालखी मार्गाची पाहणी केली. तसेच सोलापूर दौऱ्यात २,७८४ कोटींच्या ५ राष्ट्रीय महामार्गाच्या कामाचे भूमिपूजन केले. या कार्यक्रमाला काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे उपस्थित होत्या. प्रणिती शिंदे यांनी सभेला संबोधित करताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कामाची स्तुती केली. आपण हा कार्यक्रम घेतला आणि या कार्यक्रमासाठी मला निमंत्रण पाठवले. आजच्या परिस्थितीत जिथे विरोधकांना वैयक्तिक शत्रू म्हणले जाते, तिथे तुम्ही विरोधकांना सन्मानाची वागणूक देता आणि आमची कामे मार्गी लावता, असे प्रणिती शिंदे यांनी नमूद केले. 

महाराष्ट्र हा पुरोगामी विचारांचा महाराष्ट्र राहिला असता

हे आमच्यासाठी नवल आहे आणि त्यासाठी तुमचे आभार मानते. तुम्ही मी दिलेल्या पत्रावरती रिमार्क करून कामाला मंजूर दिली, त्यावेळेस मला असे वाटले की, तुमच्यासारख्या नेत्याची महाराष्ट्रात उणीव आहे. जर तुम्ही आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतात तर महाराष्ट्राची परंपरा आणखी बळकट झाली असती. आम्हाला आणखी बळ मिळाले असते. महाराष्ट्र हा पुरोगामी विचारांचा महाराष्ट्र राहिला असता. महाराष्ट्राच्या विकासाला आणखी बळ मिळाला असते, पुरोगामी विचाराचा महाराष्ट्र पुढे गेला असता, असे प्रणिती शिंदे यांनी म्हटले.

दरम्यान, स्मार्ट व्हिलेजसाठी प्रयत्न करत आहे. विकासाचा असमतोल निर्माण झाला आहे, तो होऊ नये. संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराजांच्या पालखीसाठी रस्ता झाला याचा आनंद आहे. मात्र, हे श्रेय माझे एकट्याच नाही, असंख्य इंजिनियर आणि कंत्राटदार माझ्यासोबत काम करत आहेत. मी केवळ निमित्त मात्र आहे. २२ हजार कोटी खर्च करून बौद्ध सर्किट पूर्ण केले. बोधीवृक्षाखाली थांबलो होतो, त्यावेळी बोधी वृक्षाचे पान आधी माझ्या आणि त्यानंतर बायकोच्या खांद्यावर पडले. त्यावेळी भिक्षु म्हणाले की, गौतम बुद्धचा आशीर्वाद तुम्हाला मिळाला, अशी एक दिव्य आठवण नितीन गडकरी यांनी सांगितली.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Shinde praises Gadkari, says Maharashtra would be progressive under him.

Web Summary : Congress MP Praniti Shinde lauded Nitin Gadkari's work ethic, stating his non-partisan approach is admirable. She believes Maharashtra would be more progressive if Gadkari were Chief Minister. Gadkari, during a Solapur visit, inaugurated highway projects.
टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीPraniti Shindeप्रणिती शिंदेPraniti Shindeप्रणिती शिंदेSolapurसोलापूर