Foreign Minister of Russia Sergei Lavrov Meet PM Narendra Modi: रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव्ह हे भारत दौऱ्यावर आहेत. भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांची भेट घेतल्यानंतर लावरोव्ह यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. ही भेट दिल्लीत झाली. या भेटीत युक्रेन युद्ध, पश्चिम आशियातील परिस्थिती, जागतिक तेल संकट आणि परस्पर हिताच्या अनेक प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर चर्चा झाली. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी संवाद आणि मुत्सद्देगिरी हाच पुढे जाण्याचा सर्वोत्तम मार्ग असल्याचे अधोरेखित केले.
एका निवेदनात पंतप्रधान कार्यालयाने म्हटले आहे की, डिसेंबर २०२५ मध्ये २३ व्या भारत-रशिया वार्षिक शिखर परिषदेत रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यासोबत झालेल्या भेटीनंतर द्विपक्षीय सहकार्यात झालेल्या प्रगतीबद्दल लावरोव्ह यांनी पंतप्रधान मोदींना माहिती दिली. रशियाचे परराष्ट्र मंत्री लावरोव्ह आणि पंतप्रधान मोदी यांनी युक्रेन आणि पश्चिम आशियातील परिस्थितीसह परस्पर हिताच्या अनेक प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर विचारविनिमय केला, अशी माहिती देण्यात आली आहे.
पुतिन यांना सदिच्छा संदेश पोहोचवण्याची विनंती
ब्रिक्स परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी भारतात आलेल्या पुतिन यांना आपला सदिच्छा संदेश पोहोचवण्याची विनंती पंतप्रधान मोदींनी लावरोव्ह यांना केली. परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आणि रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव्ह यांचीही भेट झाली. वाढत्या भू-राजकीय तणावाच्या पार्श्वभूमीवर ऊर्जा आणि व्यापार क्षेत्रातील द्विपक्षीय सहकार्य पुढे नेण्याच्या मार्गांवर चर्चा केली. जयशंकर आणि लावरोव्ह यांनी पश्चिम आशियातील संकट तसेच युक्रेन संघर्षावर चर्चा केल्याचे मानले जाते.
दरम्यान, ब्रिक्स सदस्य देशांच्या दोन दिवसीय शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची, ब्राझीलचे परराष्ट्र मंत्री माउरो व्हिएरा आणि दक्षिण आफ्रिकेचे आंतरराष्ट्रीय संबंध मंत्री ओजी लामोला हे ब्रिक्स परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीसाठी राष्ट्रीय राजधानीत दाखल झाले आहेत.
Web Summary : Sergei Lavrov met PM Modi, discussing Ukraine, West Asia, oil crisis, and bilateral ties. Modi emphasized dialogue. Lavrov conveyed progress since Putin's December 2025 meeting and BRICS matters were addressed.
Web Summary : सर्गेई लावरोव ने पीएम मोदी से मुलाकात की, जिसमें यूक्रेन, पश्चिम एशिया, तेल संकट और द्विपक्षीय संबंधों पर चर्चा हुई। मोदी ने संवाद पर जोर दिया। लावरोव ने पुतिन की दिसंबर 2025 की बैठक के बाद हुई प्रगति और ब्रिक्स मामलों पर बात की।