Join us
Daily Top 2Weekly Top 5

PBKS vs MI : भावा कसा आहेस? रोहित शर्मा-श्रेयस अय्यरचा व्हिडिओ पाहिलात का?

दोन मुंबईकरांमधील खास संवाद अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2026 18:09 IST

Open in App

PBKS vs MI : पंजाब किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यात गुरुवारी आयपीएल २०२६ स्पर्धेतील ५८ वा सामना धर्मशाला येथील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशनच्या मैदानात खेळवण्यात येणार आहे. या सामन्याआधी मुंबई इंडियन्सचा माजी कर्णधार रोहित शर्मा आणि पंजाब किंग्सचा कर्णधार श्रेयस अय्यर यांच्यातील खास संवादाचा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

रोहित-श्रेयसचा खास व्हिडिओ

या व्हिडिओमध्ये दोन मुंबईकर एकमेकांविरुद्ध मैदानात उतरण्याआधी खास संवाद साधताना दिसते. रोहित शर्मानं कसा आहेस भावा? असा प्रश्न विचारत श्रेयस अय्यरची विचारपूस केली. दोघांच्यातील खास संवादाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. 

IPL 2026: विकेट नको, फक्त दहशत हवी! गुजरात टायटन्सचा 'नेहरा पॅटर्न', फलंदाजांच्या मनात भरली धडकी

 रोहित शर्मा रचणार इतिहास, अर्धशतकांचे अर्धशतक झळकावण्याचीही संधी

पंजाब किंग्स विरुद्धच्या सामन्यात रोहित शर्माला दोन मोठे विक्रम खुणावत आहेत. या सामन्यात मैदानात उतरताच IPL मध्ये सर्वाधिक सामने खेळण्याच्या बाबतीत तो MS धोनीचा विक्र मागे टाकून तो विराट विक्रमाची बरोबरी करेल. याशिवाय अर्धशतकासह त्याला आयपीएलमध्ये ५० अर्धशतके पूर्ण करण्याची संधी असेल. 

श्रेयस अय्यरही डबल धमाका करणार?

पंजाब किंग्सचा कर्णधार श्रेयस अय्यरसाठीही मुंबई इंडियन्स विरुद्धच्या सामन्यात दोन मोठे विक्रम नोंदवण्याची संधी आहेत.  ३० धावा करताच तो टी-२० क्रिकेटमध्ये ७००० धावांचा टप्पा पार करण्याची संधी आहे. याशिवाय ९ चौकारांसह IPL मध्ये ३५० चौकार पूर्ण करेल.

पंजाब किंग्ससाठी महत्त्वाचा सामना; मुंबई इंडियन्सचा विषय आधीच संपलाय

आयपीएलच्या यंदाच्या हंगामात मुंबई इंडियन्सचा स्पर्धेतील प्रवास आधीच संपुष्टात आला आहे. त्यामुळे ते प्रतिष्टा राखण्यासाठी मैदानात उतरतील. दुसरीकडे पंजाब किंग्सचा संघ हा सामना जिंकून प्लेऑफ्सच्या दिशेनं एक पाऊल पुढे टाकण्यासाठी प्रयत्नशील असेल. जर पंजाब किंग्सने हा सामना गमावला तर उर्वरित दोन्ही सामने त्यांना जिंकावे लागतील. दबाव आणि जर तरच्या समीकरणात न अडकता पंजाब किंग्स कमबॅक करणार का? ते पाहण्याजोगे असेल.
 

English
हिंदी सारांश
Web Title : PBKS vs MI: Rohit Sharma and Shreyas Iyer's heartwarming interaction before match.

Web Summary : Before the PBKS vs MI match, Rohit Sharma's friendly chat with Shreyas Iyer went viral. Rohit Sharma aims for IPL records, while Shreyas Iyer eyes T20 milestones. Punjab needs a win for playoff hopes; Mumbai seeks pride.
टॅग्स :आयपीएल २०२६पंजाब किंग्समुंबई इंडियन्सरोहित शर्माश्रेयस अय्यरइंडियन प्रीमिअर लीग