शहरं
Join us  
Trending Stories
1
CM देवेंद्र फडणवीसांनी चालवलेली बुलेट कुणाची? PUC वरून काँग्रेस-भाजपात का जुंपली?
2
Top Marathi News Live Updates: देशासमोरील संकट गंभीर, पंतप्रधानांनी सर्वपक्षीय बैठक बोलवावी- शरद पवार
3
अंगावर शहारा आणणारी घटना! वादळात टीनशेडसोबत 'नन्हे मियाँ'ही उडाले अन्...; थरार कॅमेऱ्यात कैद -  बघा VIDEO
4
सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा राजीनामा; पत्रात काय?
5
HSRP बसवली नाही तर कडक कारवाई, नियमभंग केल्यास मोठा दंड होणार; किती शुल्क आकारले जाणार?
6
Raj Thackeray : “२२ लाख मुलांचं आणि त्यांच्या कुटुंबीयांचं आयुष्य टांगणीला लागलं त्याचं काय?”, राज ठाकरेंचा सवाल
7
PCOS नाही, आता PMOS! ८ पैकी १ ‘या’ समस्येने त्रस्त; १७ कोटी महिलांच्या आरोग्यावर थेट परिणाम
8
नाशिक-पुणे, सिंधुदुर्ग-रत्नागिरीसाठी बड्या तरतुदी मान्य; राज्य मंत्रिमंडळाचे १४ मोठे निर्णय
9
Travel : अवघ्या २५ हजारांत करा 'भारताच्या स्कॉटलँड'ची ट्रिप! बजेट प्लॅनिंगसाठी फॉलो करा 'या' खास टिप्स
10
Video - मुलींना बेदम मारलं, मुलाला उलटं टांगलं; शिक्षक झाला हैवान, शाळेतील धक्कादायक प्रकार
11
Instagram अकाउंट अचानक बॅन झालंय? घाबरू नका! 'या' सोप्या ट्रिकने मिनिटांत होईल रिकव्हर
12
"टीम इंडियाकडून खेळायचंच नाहीये, आता तर मी..."; विराट कोहलीचा मैदानावरील Video व्हायरल
13
VIDEO : असा दबा धरून शिकार करतात सिंह, गिर नॅशनल पार्कमध्ये पर्यटकांच्या डोळ्यांदेखत घडला अंगावर शहारा आणणारा थरार 
14
मासिक शिवरात्रि व्रत २०२६: महादेव मनोकामना पूर्ण करतील, यश मिळेल, सुख लाभेल; ‘असे’ करा व्रत!
15
महागाईचा भडका! घाऊक महागाईचा दर ४२ महिन्यांच्या उच्चांकावर; कच्च्या तेलाच्या किमतींमुळे सर्वसामान्यांचं टेन्शन वाढलं
16
"सरकार पुढील सहा महिन्यांपर्यंत राज्यात...!"; PM नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
17
समुद्राच्या लाटा रक्ताळल्या! ओमानच्या तटावर भारतीय जहाजावर हल्ला; भारताने इराणला ठणकावून सांगितलं...
18
Video - हाहाकार! उत्तर प्रदेशमध्ये मुसळधार पाऊस अन् भीषण चक्रीवादळ; १०१ जणांचा मृत्यू
19
VIDEO: मुख्यमंत्री 'बुलेट'वरून विधानभवनात! PM मोदींचा आदर्श ठेवत फडणवीसांचाही कृतीतून संदेश
20
Motorola Razr Fold भारतात लॉन्च; १.७० लाखांचा फोन ५,५५६ रुपयांच्या EMI वर उपलब्ध
Daily Top 2Weekly Top 5

सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा राजीनामा; पत्रात काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2026 17:31 IST

NCP Sunetra Ajit Pawar News: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधील १४ वर्षांचा प्रवास, सर्व नेते, पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे मिळालेले प्रेम आणि विश्वास कायम स्मरणात राहील, असे या नेत्यांनी म्हटले आहे.

NCP Sunetra Ajit Pawar News: राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) नव्या पदाधिकार्‍यांच्या यादीतून ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांना वगळल्याचे समोर आले असून, यावरून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. यातच आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते आनंद परांजपे यांनी अचानक राजीनामा दिला आहे. या तडकाफडकी राजीनाम्यामुळे पक्षातील घडामोडींना वेग आला असून, हा सुनेत्रा पवार यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे.

मनात अनेक भावना दाटून आल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधील माझा १४ वर्षांचा प्रवास, सर्व नेते, पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे मिळालेले प्रेम आणि विश्वास कायम स्मरणात राहील. आज अत्यंत जड अंतःकरणाने हा प्रवास इथेच संपवून नव्या वाटेवर पाऊल टाकून नवीन प्रवासाची सुरुवात करीत आहे..!, असे आनंद परांजपे यांनी एक्स पोस्टमध्ये म्हटले आहे. यासोबत त्यांनी एक पत्र दिले आहे.

राजीनामा आपण स्विकारावा ही नम्र विनंती

आनंद परांजपे यांनी पक्षाच्या प्रमुख सुनेत्रा अजित पवार यांना एक पत्र लिहिले आहे. मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सरचिटणीस तथा प्रवक्ता महाराष्ट्र प्रदेश, समन्वयक - ठाणे व पालघर (जिल्हा) व पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे. आजपर्यंत पक्षाने माझ्यावर विश्वास दाखवून पक्ष संघटनेमध्ये अनेक जबाबदा-या दिल्या. त्याबद्दल मी पक्षाचा शतशः आभारी आहे. तरी माझा राजीनामा आपण स्विकारावा ही नम्र विनंती. धन्यवाद!, असे आनंद परांजपे यांनी म्हटले आहे. 

दरम्यान, विधान परिषदेत जाण्याची संधी न मिळाल्यामुळे आनंद परांजपे हे गेले अनेक दिवस नाराज होते असे म्हटले जात आहे. त्यांनी त्यांच्या सर्व पदांचा राजीनामा दिल्याने राष्ट्रवादी पक्षाला मोठा धक्का बसल्याचे म्हटले जात आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आनंद परांजपे यांनी अलीकडेच भेट घेतली होती. त्यामुळे आनंद परांजपे शिंदे गटात जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात असल्याचे सांगितले जात आहे. 

टॅग्स :Sunetra Pawarसुनेत्रा पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसparth pawarपार्थ पवारJay Pawarजय पवारsunil tatkareसुनील तटकरेPraful Patelप्रफुल्ल पटेलPraful Patelप्रफुल्ल पटेलprafull patelप्रफुल्ल पटेल