जंगलातील हिंस्त्र प्राण्याचा थरार किती भयंकर असू शकतो, याचा अनुभव गुजरातच्या गिर नॅशनल पार्कमध्ये पर्यटकांना आला आहे. सफारीवर गेलेल्या पर्यटकांच्या जिपसमोरच सिंहाने एका गायीची शिकार केली. या थरारक घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तो पाहून तुमच्याही अंगावर शहारा आल्यावाचून राहणार नाही.
पर्यटकांसमोर घडला थरार -
व्हायरल व्हिडिओमध्ये दिसते की, पर्यटक शांतपणे सफारीचा आनंद घेत आहेत. दरम्यान, एक सिंहिण हळूवारपणे पर्यटकांच्या जिपचा आडोसा घेत, पुढे सरकत आहे. समोरून गाय येत आहे. गाय टप्प्यात आल्यानंतर, दबा धरून बसलेली सिंहिण एकदम पूर्ण वेगाने समोर असलेल्या गायीवर झडप घालते. हा हल्ला एवढा वेगात होता की, गायीला सावरण्याची संधीच मिळाली नाही. सिंहिणीने गायीची मान पकडून तिला खाली पाडले. तेवढ्यात दुसऱ्या सिंहानेही गायीवर झडप घातली.
ही संपूर्ण घटना काही क्षणांत घडली. हे संपूर्ण दृष्य पाहून जिपमधील पर्यटकही सुन्न झाले. ही शिकार अनेकांनी आपल्या कॅमेऱ्यात रॅकॉर्ड केली. या व्हिडिओवर नेटकऱ्यांच्या विविध स्वरुपाच्या प्रतिक्रियाही येत आहेत. काही जण याला 'लाईव्ह नॅशनल जिओग्राफिक' अनुभव म्हणत आहेत.
गिर हे आशियाई सिंहांचे जगातील एकमेव नैसर्गिक निवासस्थान आहे. येथे सिंह दिसणे सामान्य असले, तसी एवढ्या जवळून शिकारीचे दृश्य दिसणे अत्यंत दुर्मिळ मानले जाते.
Web Summary : Tourists in Gir National Park witnessed a thrilling lion hunt. A lioness ambushed and killed a cow near a safari jeep. The rare sighting was captured on camera, leaving viewers stunned by the raw power of nature.
Web Summary : गिर राष्ट्रीय उद्यान में पर्यटकों ने एक रोमांचक शेर के शिकार को देखा। एक शेरनी ने सफारी जीप के पास एक गाय पर घात लगाकर हमला किया और उसे मार डाला। दुर्लभ दृश्य कैमरे में कैद हो गया, दर्शक प्रकृति की शक्ति से दंग रह गए।