Manish Pandey catch video KKR vs RCB IPL 2026: विराट कोहलीच्या दमदार शतकाच्या जोरावर RCB ने कोलकाताचा ६ गडी राखून पराभव केला. KKR ने प्रथम फलंदाजी करताना ४ बाद १९२ धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना बंगळुरूने ५ चेंडू राखून विजय मिळवला. विराट कोहलीने ६० चेंडूत नाबाद १०५ धावा केल्या. विराटच्या खेळीचे साऱ्यांनी तोंडभरून कौतुक केले. त्यासोबतच आणखी एक क्षणाचीही जोरदार चर्चा रंगली.
विराट कोहली आणि टीम डेव्हिड मैदानात होते. कार्तिक त्यागी १८वे षटक टाकत होता. त्यावेळी बंगळुरूला विजयासाठी फारशा धावांची आवश्यकता नव्हती. त्यामुळे टीम डेव्हिडने हवाई फटका खेळण्याऐवजी जमिनीवरून फटका खेळायचा प्रयत्न केला. पण त्याचा फटका काही काळ हवेत राहिला. याच दरम्यान वेगाने चेंडू जात असताना मनिष पांडेने अप्रितम झेप घेत झेल टिपला आणि सारेच चाट पडले. गोलंदाज कार्तिक त्यागी आणि नॉन स्ट्राइकवर असलेल्या विराट कोहलीलाही चेहऱ्यावरचे आश्चर्य लपवता आले नाही. पाहा व्हिडीओ-
दरम्यान, सामन्यात विराट कोहलीने एकहाती सत्ता गाजवली. कोलकाता नाईट रायडर्सकडून अंगक्रिश रघुवंशीने ४६ चेंडूत ७१ धावांची खेळी केली. पण विराटच्या शतकापुढे सारे फिके पडले. विराट गेल्या दोन सामन्यात शून्यावर बाद झाला होता. त्यानंतर त्याने ६० चेंडूत ११ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने नाबाद १०५ धावा कुटल्या. या विजयामुळे RCB ने १२ पैकी ८ सामने जिंकून १६ गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले.
Web Summary : In the KKR vs RCB match, Kohli's century led RCB to victory. Manish Pandey's incredible catch, which stunned everyone, including Kohli, became a highlight. Angkrish Raghuvanshi's 71 went in vain as RCB secured the top spot with the win.
Web Summary : केकेआर बनाम आरसीबी मैच में कोहली के शतक ने आरसीबी को जीत दिलाई। मनीष पांडे के शानदार कैच, जिसने कोहली सहित सभी को चौंका दिया, आकर्षण का केंद्र बन गया। जीत के साथ आरसीबी ने अंक तालिका में शीर्ष स्थान हासिल किया।