मोबाईल तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज कंपनी मोटोरोलाने भारतीय बाजारपेठेत आपला पहिला प्रिमियम फोल्डेबल स्मार्टफोनमोटोरोला रेझर फोल्ड लॉन्च झाला. हा फोन केवळ त्याच्या डिझाइनसाठीच नाही, तर फोल्डेबल स्मार्टफोनच्या जगातील सर्वात शक्तिशाली बॅटरी आणि कॅमेरा सिस्टमसाठी चर्चेत आला आहे. या फोनच्या टॉप व्हेरिएंटची किंमत १ लाख ७० हजार रुपये आहे. मात्र, हा फोन ५,५५६ रुपयांच्या EMI वर उपलब्ध आहे.
मोटोरोला रेझर फोल्ड: किंमत
मोटोरोला रेझर फोल्ड (१२ जीबी रॅम/ २५६ जीबी स्टोरेज) किंमत: १ लाख ४९ हजार ९९९ रुपये आहे.
मोटोरोला रेझर फोल्ड (१६ जीबी रॅम/ ५१२ जीबी स्टोरेज) किंमत: १ लाख ५९ हजार ९९९ रुपये आहे.
मोटोरोला रेझर फोल्ड (१६ जीबी रॅम/ ५१२ जीबी स्टोरेज, फिफा एडिशन) किंमत: १ लाख ६९ हजार ९९९ रुपये आहे.
मोटोरोला रेझर फोल्ड: ऑफर
या स्मार्टफोनच्या खरेदीवर ग्राहकांना १० हजार रुपयांचे इस्टंट बँक डिस्काउट मिळत आहे. तर, एक्स्चेंज ऑफरमध्ये ग्राहकांना १० हजार रुपयांपर्यंत सूट मिळवण्याची संधी आहे. शिवाय, हा फोन फोन ५,५५६ रुपयांच्या ईएमआयवर उपलब्ध असून निवडक बँकांवर १८ महिन्यांपर्यंत नो-कॉस्ट इएमआयवर देखील उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी ग्राहकांनी कंपनीच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
मोटोरोला रेझर फोल्ड: जगातील सर्वोत्कृष्ट फोल्डेबल कॅमेरा
मोटोरोला रेझर फोल्डच्या कॅमेरा सिस्टमला 'DXOMARK Gold Label' मिळाले आहे. यामध्ये ट्रिपल ५०MP प्रो-ग्रेड कॅमेरा सेटअप आहे. यात Sony LYTIA™ 828 मुख्य सेन्सर आणि १००x सुपर झूमसह ५०MP पेरिक्सोप कॅमेरा देण्यात आला आहे. विशेष म्हणजे, हा फोन ८K डॉल्बी व्हिजन रेकॉर्डिंगला सपोर्ट करतो.
मोटोरोला रेझर फोल्ड: बॅटरी
फोल्डेबल फोन्समध्ये आतापर्यंतची सर्वात मोठी ६,०००mAh ची सिलिकॉन-कार्बन बॅटरी यात देण्यात आली. एका चार्जवर ही बॅटरी ४३ तासांहून अधिक काळ टिकते, असा दावा कंपनीने केला आहे. यासोबतच ८०W टर्बोपॉवर फास्ट चार्जिंग आणि ५०W वायरलेस चार्जिंगची सुविधाही उपलब्ध आहे.
मोटोरोला रेझर फोल्ड: डिस्प्ले
या फोनमध्ये ८.१ इंची २K एक्सट्रीम AMOLED मुख्य डिस्प्ले आणि ६.६ इंची बाह्य डिस्प्ले देण्यात आला आहे. मुख्य स्क्रीनची ब्राइटनेस ६,२०० निट्सपर्यंत असून ती अतिशय स्पष्ट व्हिज्युअल्स प्रदान करते. याव्यतिरिक्त, कंपनीने मोटो बड्स २ प्लस देखील लॉन्च केले आहेत, ज्याची किंमत ४ हजार ९९९ रुपये आहे. मोटोरोलाचा हा नवा फोल्डेबल फोन सॅमसंग आणि वनप्लस सारख्या कंपन्यांच्या प्रिमियम फोनला मोठी टक्कर देण्याची शक्यता आहे.
Web Summary : Motorola launched its premium foldable Razr Fold in India, boasting a powerful battery and camera. Available in multiple variants, it features a triple 50MP camera, 6,000mAh battery with fast charging, and vibrant displays. Offers include bank discounts and EMI options, challenging Samsung and OnePlus.
Web Summary : मोटोरोला ने भारत में अपना प्रीमियम फोल्डेबल रेज़र फोल्ड लॉन्च किया, जिसमें शक्तिशाली बैटरी और कैमरा है। कई वेरिएंट में उपलब्ध, इसमें ट्रिपल 50MP कैमरा, फास्ट चार्जिंग के साथ 6,000mAh बैटरी और वाइब्रेंट डिस्प्ले हैं। ऑफर्स में बैंक डिस्काउंट और ईएमआई विकल्प शामिल हैं, जो सैमसंग और वनप्लस को चुनौती देते हैं।