Vaibhav Suryavanshi In India A Squad : IPL स्पर्धेसह देशांतर्गत क्रिकेटमध्ये धमाकेदार कामगिरी करणाऱ्या वैभव सूर्यवंशीलाबीसीसीआयकडून मोठं बक्षीस मिळालं आहे. भारत-श्रीलंका आणि अफगाणिस्तान यांच्यात होणाऱ्या तिरंगी मालिकेसाठी भारतीय 'अ' संघात त्याची निवड झाली आहे. BCCI नं तिलक वर्माच्या नेतृत्वाखालील १५ सदस्यीय संघ निवडला आहे. भारतीय वरिष्ठ संघात एन्ट्री मारण्यासाठी हा दौरा वैभव सूर्यवंशीसाठी महत्त्वपूर्ण ठरू शकतो.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
तिरंगी मालिकेसाठी भारत 'अ' संघ
तिलक वर्मा (कर्णधार), प्रियांश आर्य, वैभव सूर्यवंशी, रियान पराग (उप कर्णधार),आयुष बडोनी, निशांत सिंधु, हर्ष दुबे, सूर्यांश शेडगे, प्रभसिमरन सिंग,कुमार कुशाग्र,विप्रज निगम,यश ठाकूर,युद्धवीर सिंह,अंशुल कंबोज, अरशद खान.
"टीम इंडियाकडून खेळायचंच नाहीये, आता तर मी..."; विराट कोहलीचा मैदानावरील Video व्हायरल
IPL संपताच तिलक वर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय 'अ' संघ श्रीलंका दौऱ्यावर जाणार
भारत-श्रीलंका आणि अफगाणिस्तान यांच्यातील तिरंगी मालेकेतील सामने श्रीलंकेत होणार आहे. तिलक वर्माच्या नेतृत्वाखालील संघात रियान परागकडे उप कर्णधार पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. आयपीएल संपताच ९ जून ते २१ जून या कालावधीत ही तिरंगी मालिका खेळवण्यात येणार आहे आहे. त्यानंतर भारतीय संघ श्रीलंकेविरुद्ध दोन सामन्यांची द्विपक्षीय मालिकाही खेळणार आहे.
तिरंगी मालिकेचे वेळापत्रक-
- ९ जून, २०२६ – भारत 'अ' विरुद्ध श्रीलंका 'अ'
- ११ जून, २०२६ – भारत 'अ' विरुद्ध अफगाणिस्तान 'अ'
- १३ जून, २०२६ – अफगाणिस्तान 'अ' विरुद्ध श्रीलंका 'अ'
- १५ जून, २०२६ – भारत 'अ' विरुद्ध श्रीलंका 'अ'
- १७ जून, २०२६ – भारत 'अ' विरुद्ध अफगाणिस्तान 'अ'
- १९ जून, २०२६ – अफगाणिस्तान 'अ' विरुद्ध श्रीलंका 'अ'
- २१ जून, २०२६ – तिरंगी मालिकेतील अंतिम सामना
IPL मध्ये धमाक्यावर धमाका करताना दिसतोय वैभव
वैभव सूर्यवंशीने छोट्याशा आयपीएल कारकिर्दीतच सर्वांची मनं जिंकली आहेत. १५ वर्षांच्या वयात त्याने अनेक मोठे विक्रम आपल्या नावावर केले. आयपीएलमध्ये तो दुसराच हंगाम खेळत असून जगातील सर्वात मोठ्या टी-२० लीगमध्ये आतापर्यंत १८ सामन्यांत त्याने ६९२ धावा केल्या आहेत. यंदाच्या हंगामात राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या सामन्यात त्याने ११ सामन्यांत ४० च्या सरासरीसह ४४० धावा केल्या आहेत. यात एका शतकाचाही समावेश आहे.
याआधीही इंडिया-एसाठी गाजवली होती कामगिरी
२०२५ च्या आशिया कप रायझिंग स्टार्स स्पर्धेत वैभवने यूएईविरुद्ध अवघ्या ४२ चेंडूत १४४ धावांची तुफानी खेळी केली होती. त्या डावात त्याने ११ चौकार आणि १५ षटकार ठोकले होते. या खेळीसाठी त्याला सामनावीर पुरस्कार मिळाला होता. स्पर्धेत त्याने ४ सामन्यांत २३९ धावा करत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत दुसरे स्थान पटकावले होते.
भारतीय वरिष्ठ संघातही मिळू शकते संधी
आपल्या प्रतिभा आणि सातत्यपूर्ण कामगिरीच्या जोरावर वैभव सूर्यवंशी भारतीय संघाच्या दारात पोहोचला आहे. नियमित सदस्य होण्यासाठी अजून वेळ लागू शकतो, पण आगामी मालिकांमध्ये संधी मिळाल्यास तो भारतीय टी-२० संघात स्थान मिळवू शकतो, अशी चर्चा रंगू लागली आहे.
Web Summary : Vaibhav Suryavanshi earns India A selection after stellar domestic performance. He will play in the tri-series featuring Sri Lanka and Afghanistan. His IPL performance has been impressive. This tour is crucial for his senior team prospects.
Web Summary : शानदार घरेलू प्रदर्शन के बाद वैभव सूर्यवंशी का भारत ए टीम में चयन हुआ। वह श्रीलंका और अफगानिस्तान के साथ त्रिकोणीय श्रृंखला में खेलेंगे। आईपीएल प्रदर्शन प्रभावशाली रहा है। यह दौरा उनके वरिष्ठ टीम की संभावनाओं के लिए महत्वपूर्ण है।