1 / 8मेघालयाची 'स्कॉटलंड ऑफ द ईस्ट' अशी ओळख आहे. तिथे जाण्याचे स्वप्न अनेकजण पाहतात, पण बजेटमुळे मागे हटतात. मात्र, २५,००० रुपयांच्या आत मेघालय फिरता येऊ शकते. कसे? जाणून घ्या.. 2 / 8मेघालयात थेट विमानतळ असले तरी तिथली तिकिटे महाग असतात. त्यामुळे गुवाहाटीपर्यंत स्वस्त विमान किंवा ट्रेनने प्रवास करा. गुवाहाटीहून शिलाँगला जाण्यासाठी खासगी टॅक्सी करण्याऐवजी शेअर्ड टॅक्सी वापरा. यामुळे प्रवासाचा खर्च निम्म्याने कमी होतो.3 / 8शिलाँग किंवा चेरापुंजीमध्ये महागड्या हॉटेल्समध्ये राहण्यापेक्षा स्थानिक होमस्टे निवडा. इथे तुम्हाला ५०० ते १५०० रुपयांत उत्तम सोय मिळते. शिवाय, स्थानिक लोकांकडून मेघालयाबद्दल अधिक माहिती मिळते आणि घरगुती जेवणाचा आस्वादही घेता येतो.4 / 8टूरिस्ट कॅफे किंवा मोठ्या रेस्टॉरंटमध्ये जाण्याऐवजी छोट्या स्थानिक हॉटेल्समध्ये 'खासी' पदार्थांचा आस्वाद घ्या. जदो किंवा स्थानिक व्हेज थाळी अतिशय स्वस्त आणि चविष्ट असते. यामुळे रोजच्या जेवणाचे बजेट नियंत्रणात राहते.5 / 8मेघालयातील निसर्ग सौंदर्य पाहण्यासाठी जास्त पैसे खर्च करण्याची गरज नाही. नोहकलिकाई फॉल्स, मावसमाई गुहा, डॉकी नदी आणि उमियम लेक यांसारख्या ठिकाणांची एन्ट्री फी अगदी नाममात्र आहे. काही व्ह्यू पॉईंट्स तर पूर्णपणे मोफत आहेत.6 / 8एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी खासगी गाडी बुक करणे महागात पडते. शिलाँगच्या 'पोलो मार्केट'मधून विविध पर्यटन स्थळांसाठी शेअर्ड टॅक्सी उपलब्ध असतात. तसेच, 'रॅपिडो' किंवा स्थानिक बसचा वापर करून तुम्ही हजारो रुपये वाचवू शकता.7 / 8५ दिवसांसाठी परफेक्ट प्लॅन - दिवस १: गुवाहाटी ते शिलाँग (उमियम लेक पाहणे), दिवस २: शिलाँग लोकल (एलिफंट फॉल्स, शिलाँग पीक), दिवस ३: चेरापुंजी (सेव्हन सिस्टर फॉल्स, गुहा), दिवस ४: डॉकी आणि मावलिनोंग (स्वच्छ गाव आणि रिव्हर बोटिंग), दिवस ५: शिलाँगहून पुन्हा गुवाहाटी परतीचा प्रवास.8 / 8जर तुम्ही ३-४ मित्रांसोबत ट्रिप करत असाल, तर गाडीचे आणि रूमचे भाडे विभागले जाऊन तुमची ट्रिप २०,००० रुपयांच्या आतही होऊ शकते!