CM Devendra Fadnavis Bullet PUC: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी आपल्या ताफ्यातील वाहने कमी करत इंधन बचतीचा कृतीतून संदेश दिला. त्यानंतर महाराष्ट्र सरकारचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) हे आज गाड्यांचा ताफा सोडून चक्क बुलेटवरून (Bullet Row) विधानभवनात दाखल झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः बुलेट चालवत होते. तर त्यांच्या पाठीमागच्या सीटवर भाजपचे मंत्री आशिष शेलार (Ashish Shelar) बसले होते. पंतप्रधानांनी केलेल्या आवाहनाला महाराष्ट्रातून सकारात्मक प्रतिसाद मिळत असतानाच, फडणवीसांनी चालवलेली बुलेट वादात सापडली. बुलेटच्या PUC वरून काँग्रेस-भाजपात जुंपल्याचे पाहायला मिळाले. (Congress vs BJP)
काँग्रेसचा आरोप काय?
मुदत संपलेला माल (Expired Maal) चालतो का? असे दिसून येते की मुख्यमंत्र्यांनी निवडलेल्या बुलेटची PUC संपली आहे. मुंबई आरटीओ आणि मुंबई वाहतूक पोलीस यावर कारवाई करणार का? फडणवीस यावर उत्तर देणार का? असे सवाल खासदार वर्षा गायकवाड यांनी एक्स पोस्टच्या माध्यमातून केले. तसेच, बुलेटचा नंबर आणि त्याच्या PUCची मुदत संपल्याचा फोटोही त्यांनी पोस्ट केला.
भाजपकडून प्रत्युत्तर
वर्षा गायकवाड यांच्या आरोपांना भाजपचे प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांच्याकडून उत्तर आले. "वर्षाताई, सदर वाहन हे पोलिस विभागाचे आहे. ते स्वतः मुख्यमंत्री महोदय चालवणार असल्याने पोलिसांनी योग्य खबरदारी आधीच घेतली होती. काल त्याची सर्व्हिसिंग सुद्धा झाली. वाहन प्रणालीवर ९ ते १८ मे पर्यंत कामकाज बंद असल्याने त्यांनी हे वाहन पर्यावरणीय दृष्ट्या सक्षम असल्याचे प्रमाणपत्र सुद्धा आधीच घेतले होते. जनतेच्या मनातून उतरलेली काँग्रेस आता कागदपत्रांमधील तांत्रिक बाबींवरून स्वस्त प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. असो, मूळ प्रश्न आपण मा. पंतप्रधान महोदयांच्या आवाहनाला प्रतिसाद देणार की नाही, हा आहे. त्याचे उत्तर आधी द्या, 'तोवर इधर-उधर की बात ना कर'! वर्षाताईंनी ट्वीट करण्यापूर्वी सत्य पडताळून पाहिलं असतं, तर स्वतःचीच फजिती टळली असती," असे प्रत्युत्तर त्यांनी दिले.
Web Summary : CM Fadnavis rode a bullet to the assembly, drawing praise for fuel conservation. However, Congress alleged the bike's PUC had expired, triggering a political row. BJP countered, stating the bike belonged to the police and had been serviced.
Web Summary : मुख्यमंत्री फडणवीस विधानसभा में बुलेट चलाकर पहुंचे, ईंधन संरक्षण के लिए प्रशंसा मिली। हालांकि, कांग्रेस ने आरोप लगाया कि बाइक का पीयूसी समाप्त हो गया है, जिससे राजनीतिक विवाद शुरू हो गया। बीजेपी ने जवाब दिया कि बाइक पुलिस की है और उसकी सर्विसिंग हो चुकी है।