CM Devendra Fadnavis Fuel Awareness: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ताफ्यातील गाड्या कमी करत इंधन बचतीच्या केलेल्या आवाहनाला कृतीतून संदेश दिल्यानंतर आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही आज एक आगळावेगळा आदर्श समोर ठेवला. फडणवीसांनी नेहमीचा मोठ्या गाड्यांचा ताफा आणि कडक सुरक्षा व्यवस्था बाजूला सारून मुख्यमंत्री आज चक्क बुलेट मोटारसायकलवरून विधानभवनात दाखल झाले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः बुलेट चालवत होते. तर त्यांच्या पाठीमागच्या सीटवर भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार स्वार झाले होते. पंतप्रधानांनी देशातील वाढता इंधन वापर कमी करण्यासाठी आणि पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी नागरिकांना शक्य तिथे इंधनाची बचत करण्याचे आवाहन केले आहे. या आवाहनाला प्रतिसाद देत प्रशासकीय स्तरावर आणि सर्वसामान्यांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी आज स्वतः दुचाकी चालवून विधानभवन गाठण्याचा निर्णय घेतला.
मुख्यमंत्री 'बुलेट'वरून विधानभवनात (CM Devendra Fadnavis Bike Ride Video)
विधानपरिषदेतील नवनिर्वाचित सदस्यांचा विधानभवनात आज शपथविधीचा कार्यक्रम आहे. त्यासाठी मुख्यमंत्री शासकीय निवासस्थानावरुन बुलेटने निघाले. विधानभवनाच्या प्रवेशद्वारावर मुख्यमंत्री बुलेटवरून उतरताच तिथे उपस्थित असलेल्या आमदार, कर्मचारी आणि प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी गर्दी केली होती.
परदेश दौरे बंद अन् ताफा अर्ध्यावर; मुख्यमंत्र्यांचे कडक आदेश
मुख्यमंत्री फडणवीसांनी जागतिक ऊर्जा संकट आणि इंधन बजतीच्या पाश्वभूमीवर कालच महत्त्वाचे आदेश दिलेत. ज्यात स्वत: मुख्यमंत्री, मंत्री आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या ताफ्यातील गाड्यांची संख्या आता थेट निम्म्यावर आणण्याचा निर्णय घेतला. तसेच मंत्री, अधिकार्यांचे विदेश दौरे रद्द करण्याचाही निर्णय घेण्यात आला.
पीएम मोदींसह अनेक मंत्र्यांनी केली ताफ्यात 'काट'कसर
इंधन आणि परकीय चलनाची बचत करण्याच्या उद्देशाने फडणवीसांनी काल दोन उच्चस्तरीय बैठका घेतल्या. या बैठकीला राज्याचे मुख्य सचिव, पोलीस महासंचालक आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्काळ अंमलबजावणीचे आदेश दिले. आता मंत्रालयातील बैठकांसाठी अधिकाऱ्यांना जिल्ह्यांतून मुंबईला यावं लागणार नाही, तर या बैठका व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेतल्या जाणार आहेत.
Web Summary : Following PM Modi's fuel conservation call, Maharashtra CM Devendra Fadnavis rode a motorcycle to the Assembly, with BJP leader Ashish Shelar as pillion. This promotes fuel saving and environmental protection. Fadnavis also slashed convoy sizes and canceled foreign trips for officials to save resources.
Web Summary : पीएम मोदी के ईंधन संरक्षण के आह्वान के बाद, महाराष्ट्र के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधानसभा मोटरसाइकिल पर पहुंचे, जिसमें भाजपा नेता आशीष शेलार पीछे बैठे थे। इससे ईंधन की बचत और पर्यावरण संरक्षण को बढ़ावा मिलता है। फडणवीस ने संसाधनों को बचाने के लिए काफिले का आकार भी घटाया और अधिकारियों की विदेश यात्राएं रद्द कर दीं।