Join us
Daily Top 2Weekly Top 5

Jasprit Bumrah : १३ वर्षांचा प्रवास; जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार! हार्दिक पांड्याचा विषय संपला?

जसप्रीत बुमराह MI चा नवा कर्णधार; हार्दिक पांड्याचा विषय संपला?

By सुशांत जाधव | Updated: May 14, 2026 19:49 IST

Open in App

IPL 2026  Jasprit Bumrah Becomes 10th Player To Captain MI :  पंजाब किंग्स विरुद्धच्या सामन्यात मुंबई इंडियन्सला नवा कर्णधार मिळाला. धर्मशाला येथील हिमाचल क्रिकेट असोसिएशनच्या मैदानात जसप्रीत बुमराहकडे संघाचे नेतृत्व देण्यात आले. २०१३ पासून तो मुंबई इंडियन्ससोबत आहे. पण पहिल्यांदाच त्याला IPL मध्ये  MI नं  नेतृत्व करण्याची संधी दिली आहे.  या निर्णयासह तो मुंबई इंडियन्सचा IPL इतिहासातील १० वा कर्णधार ठरला आहे. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

जसप्रीत बुमराह MI चा नवा कर्णधार; हार्दिक पांड्याचा विषय संपला?

आयपीएल स्पर्धेतील सर्वात यशस्वी संघ असलेल्या MI च्या संघाचा पहिला कर्णधार हा माजी फिरकीपटू हरभजन सिंग होता. त्यानंतर शॉन पोलॉक यानेही संघाचे नेतृत्व केले. आता जसप्रीत बुमराह या संघाचे नेतृत्व करणार तिसरा गोलंदाज ठरला आहे.  जसप्रीत बुमराहाला १३ वर्षांनी पहिल्यांदा कर्णधारपदाची संधी मिळाल्यावर हार्दिक पांड्याचं काय? असा प्रश्न निर्माण होत आहे. त्याच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थितीत झाल्यावर MI नं बुमराहच्या रुपात पर्याय निवडल्याचे चित्र निर्माण झाले आहे.   

PBKS vs MI : भावा कसा आहेस? रोहित शर्मा-श्रेयस अय्यरचा व्हिडिओ पाहिलात का?

जसप्रीत बुमराह सूर्याच्या अनुपस्थितीवर बोलला, पण हार्दिकबद्दल मात्र मौन 

नाणेफेकीनंतर जसप्रीत बुमराह म्हणाला की, ‘आम्ही प्रथम गोलंदाजी करण्याचे ठरवले आहे. MI चं नेतृत्व करण्याआधी मी भारतीय कसोटी संघाचे नेतृत्व करेल, असे वाटले नव्हते, असे म्हणत त्याने IPL फ्रँचायझीकडून कॅप्टन्सीची संधी खूपच उशीराने मिळाल्याची गोष्ट अप्रत्यक्षरित्या बोलून दाखवली. सूर्यकुमार यादव वैयक्तिक कारणास्तव संघाचा भाग नाही, असे त्याने स्पष्ट केले. पण हार्दिक पांड्याबद्दल मात्र तो काहीच बोलला नाही. त्यामुळे MI च्या ताफ्यातील ही खांदे पालट आगामी हंगामाचा ट्रेलर आहे का? असा प्रश्न निर्माण होतो.
 

मुंबई इंडियन्सचा IPL इतिहासातील १० कर्णधार

  • हरभजन सिंह (२० सामने, १० विजय) 
  • शॉन पोलॉक (४ सामने, ३ विजय) 
  • सचिन तेंडुलकर (५१ सामने, ३० विजय)
  • ड्वेन ब्राव्हो (१ सामना) 
  • रिकी पाँटिंग (६ सामने, ३ विजय)
  • रोहित शर्मा (१५८ सामने, ८७ विजय) 
  • किरॉन पोलार्ड (६ सामने, ४ विजय) 
  • सूर्यकुमार यादव  (५ सामने, २ विजय) 
  • हार्दिक पांड्या (३७ सामने, १५ विजय)
  • जसप्रीत बुमराह (१ सामना)
English
हिंदी सारांश
Web Title : Jasprit Bumrah captains Mumbai Indians after 13 years; Hardik era over?

Web Summary : Jasprit Bumrah debuted as Mumbai Indians' captain against Punjab Kings, becoming the 10th captain in IPL history. This follows questions about Hardik Pandya's leadership, suggesting a potential shift in MI's strategy.
टॅग्स :आयपीएल २०२६पंजाब किंग्सजसप्रित बुमराहहार्दिक पांड्यामुंबई इंडियन्स