धर्मशाला येथील मैदानात रंगलेल्या पंजाब किंग्स विरुद्धच्या सामन्यात मुंबई इंडियन्सच्या ताफ्यातून शार्दुल ठाकूर याने आपल्या गोलंदाजीची धमक दाखवून दिली. यंदाच्या हंगामात शार्दुल ठाकूरला MI च्या संघाकडून नियमित संधी मिळाली नाही. पण जसप्रीत बुमराहच्या नेतृत्वाखाली संधी मिळताच त्याने कमालीची गोलंदाजी करत सर्वांचे लक्षवेधून घेतले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
श्रेयस अय्यरनं चौकार मारल्यावर पुढच्या चेंडूवर घेतला बदला
पंजाब किंग्सच्या डावात १२ व्या षटकात गोलंदाजीला आल्यावर शार्दुल ठाकूरने पंजाब किंग्सच्या संघाला धक्क्यावर धक्के दिले. एका षटकात दोन महत्त्वाच्या विकेट घेत त्याने पंजाब किंग्सला बॅकफूटवर ढकलले. सेट झालेल्या प्रभसिमरन सिंगच्या रुपात त्याने या सामन्यातील आपली पहिली विकेट घेतली. तो ३२ चेंडूत ५७ धावांवर बाद झाला. त्याची जागा घेण्यासाठी आलेल्या पंजाब किंग्सच्या कर्णधार श्रेयस अय्यरनं खणखणीत चौकार मारत आपल्या डावाची सुरुवात केली. पण पुढच्याच पुढच्या चेंडूवर अप्रतिम चेंडूवर शार्दुल ठाकूरनं त्याले त्रिफळाचित केले. या विकेटनंतर त्याने आक्रमक अंदाजात सेलिब्रेशन केल्याचेही पाहायला मिळाले.
PBKS vs MI : भावा कसा आहेस? रोहित शर्मा-श्रेयस अय्यरचा व्हिडिओ पाहिलात का?
पंजाबविरुद्ध दमदार रेकॉर्ड, दुसऱ्यांदा साधला चार विकेट्सचा डाव
अनुभवी अष्टपैलू शार्दुल ठाकूरने आपल्या चार षटकांच्या स्पेलमध्ये ४ विकेट्स घेत पंजाबच्या फलंदाजीची कंबर मोडली. प्रभसिमरन सिंग आणि श्रेयस अय्यरनंतर त्याने सूर्यांश शेडगे आणि मार्को यान्सेन यांच्या रुपात चार विकेट्सचा डाव साधला. ४ षटकात त्याने ३९ धावा खर्च केल्या. त्याने पंजाबविरुद्ध दुसऱ्यांदा आणि IPL कारकिर्दीत तिसऱ्यांदा चार विकेट्स विकेट्स घेतल्या आहेत. ३६ धावांत ४ विकेट्स ही त्याची सर्वोच्च कामगिरी राहिली आहे. पंजाब विरुद्ध त्याने १६ सामन्यात २४ विकेट्स घेतल्या आहेत.
यंदाच्या हंगामात मोजक्या सामन्यात मिळाली संधी
यंदाच्या हंगामात कोलकाता नाईट रायडर्स विरुद्धच्या सलामीच्या सामन्यात ३९ धावा खर्च करत त्याने ३ विकेट्स घेतल्या होत्या. दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध तो विकेट लेस राहिला. राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुविरुद्ध त्याने प्रत्येकी १-१ विकेट घेतली. पंजाब किंग्सविरुद्धच तो अखेरचा सामना खेळला होता. या सामन्यात त्याने ४२ धावा खर्च करून १ विकेट घेतली होती. पुन्हा याच संघाविरुद्ध कमबॅकची संधी मिळाल्यावर त्याने गोलंदाजीतील धार दाखवून दिली.
Web Summary : Shardul Thakur's impressive bowling helped MI against PBKS. He took crucial wickets, including Shreyas Iyer, showcasing his talent after limited opportunities this season. Thakur's four-wicket haul broke Punjab's batting backbone, marking a strong comeback.
Web Summary : शार्दुल ठाकुर की शानदार गेंदबाजी से MI को PBKS के खिलाफ मदद मिली। उन्होंने श्रेयस अय्यर सहित महत्वपूर्ण विकेट लिए, और इस सीजन में सीमित अवसरों के बाद अपनी प्रतिभा का प्रदर्शन किया। ठाकुर के चार विकेटों ने पंजाब की बल्लेबाजी की कमर तोड़ दी, जिससे उन्होंने जोरदार वापसी की।