शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
4
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
5
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
6
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
7
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
8
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
9
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
10
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
11
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
12
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
13
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
14
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
15
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
16
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
17
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
18
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
19
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
20
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
Daily Top 2Weekly Top 5

मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2024 19:31 IST

Raj Thackeray, Akbar Sonawala News: नांदगाव मतदारसंघाचे मनसेचे उमेदवार अकबर  सोनावला यांनी जाहीर सभेत उद्धव ठाकरे गटात प्रवेश केल्याने खळबळ उडाली आहे.

विधानसभा निवडणुकीला अवघे काही दिवस राहिलेले असताना उमेदवार आपल्या स्पर्धक उमेदवाराला पाठिंबा देऊ लागले आहेत. अमरावतीत महाशक्तीच्या उमेदवाराने मविआच्या उमेदवाराला पाठिंबा दिला आहे. तर नाशिकच्या नांदगाव मतदारसंघामध्ये राज ठाकरेंना मोठा धक्का बसला आहे. 

नांदगाव मतदारसंघाचे मनसेचे उमेदवार अकबर  सोनावला यांनी जाहीर सभेत उद्धव ठाकरे गटात प्रवेश केल्याने खळबळ उडाली आहे. सोनावला यांनी निवडणुकीतून माघार घेत असल्याचे जाहीर करत ठाकरे गटाचे उमेदवार गणेश धात्रक यांना पाठिंबा दिला आहे. सोनावाला यांनी भर सभेत उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत ठाकरे गट शिवसेनेत प्रवेश केला आहे. 

राज ठाकरेंना नाशिकमध्ये हा सलग दुसरा धक्का आहे. मनसेचे प्रदेश सरचिटणीस आणि नाशिकचे माजी महापौर अशोक मुर्तडक यांनी मनसेला सोडचिठ्ठी देत ठाकरे गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. नाशिक विधानसभा मतदारसंघात मुर्तडक निवडणूक लढवू इच्छित होते. मात्र त्यांच्या ऐवजी प्रसाद सानप यांना उमेदवारी मिळाल्याने ते नाराज होते.

अमरावतीत चाललेय काय? परिवर्तन महाशक्ती आघाडी मधील प्रहार जनशक्ती पक्षाचे अमरावती विधानसभा मतदारसंघातील उमेदवार डॉ. अबरार यांनी आज महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. सुनील देशमुख यांना पाठिंबा दिला आहे. यावर खळबळ उडालेली असतानाच प्रहार जनशक्ती पक्षाने कोणताही पाठिंबा जाहीर केला नसून आगामी काळात पक्ष प्रमुख बच्चू कडू यावर निर्णय घेतील. अबरार यांचा तो वैयक्तीक निर्णय असल्याचे प्रहार पक्षाला जाहीर करावे लागले आहे. काही दिवसांपूर्वी डॉ. अबरार यांच्या कुटुंबियांना अज्ञातांनी धमक्या दिल्यात. त्यामुळे संपूर्ण कुटुंब भीतीमध्ये होते, असाही दावा प्रहारचे प्रदेश प्रवक्ते जितू दुधाने यांनी केला आहे. 

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेUddhav Thackerayउद्धव ठाकरेnandgaon-acनांदगावMNSमनसेmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Shiv Senaशिवसेना