शहरं
Join us  
Trending Stories
1
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
2
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
3
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
4
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
5
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
6
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
7
IPL मध्ये अडखणाऱ्या मुंबई इंडियन्ससाठी गुडन्यूज, ‘या’ सामन्यातून रोहित शर्मा करणार कमबॅक
8
त्याच हॉटेलमध्ये राष्ट्राध्यक्षांवर ४५ वर्षांपूर्वी झालेला गोळीबार; डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले, पण...
9
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
10
संरक्षण क्षेत्रात भारताची आघाडी! रशियाच्या जुन्या भागीदाराला मिळाली साथ; पुतिनही हैराण
11
अशोक खरातचे आणखी 'काळे कारनामे' उघड! ऑफिसबॉयनंतर कुकनेही उडवली झोप; फार्महाऊसमधील कृत्य एसआयटीच्या हाती
12
कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता
13
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
14
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
15
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
16
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
17
माओवाद्यांकडून सशस्त्र क्रांतीचाच पुनरुच्चार! ‎'देवजी'ला ठरवले गद्दार: आत्मसमर्पण धोरणावर पत्रकातून आगपाखड 
18
हैदराबादहून चेन्नईला जाणाऱ्या चारमीनार एक्स्प्रेसला लागली आग, प्रवाशांनी धावत्या ट्रेनमधून मारल्या उड्या   
19
बैठे काम सिगारेट ओढण्याइतकेच घातक; दुर्लक्ष केल्यास आरोग्याचा निघणार ‘धूर’, कशी घ्याल काळजी? 
20
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : राज्यात महायुती की महाविकास आघाडी? सर्व्हेतील धक्कादायक आकडे आले समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2024 21:00 IST

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर एका सर्व्हेचे आकडे समोर आले आहेत.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 ( Marathi News ) : विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. ४ नोव्हेंबर ही अर्ज माघारी घेण्याची शेवटची मुदत आहे. ४ ताारखेपासून राज्यभरात प्रचारसभांना सुरुवात होणार आहे. महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जोरदार चुरस लागली आहे. नुकत्याच झालेल्या सी-व्होटर सर्वेक्षणात राज्यातील सद्य राजकीय परिस्थितीचा एक रंजक आराखडा मांडण्यात आला आहे. या अहवालात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वैयक्तिक लोकप्रियता वाढली असली तरी सध्याच्या सरकारबाबत जनतेमध्ये काही प्रमाणात असंतोष असल्याचे दिसून येत आहे.  

"...तर जरांगेंचा बोलवता धनी कोण? यावर शिक्कामोर्तब होईल"; भाजप नेते प्रविण दरेकर स्पष्टच बोलले 

मुख्यमंत्री शिंदे यांनी लोकप्रियतेत उद्धव ठाकरे यांना मागे टाकल्याचे सर्वेक्षणातून समोर आले आहे. मात्र, राज्यातील ५१ टक्के जनता शिंदे सरकारच्या कारभारावर नाराज असून त्यांना सत्ताबदल हवा आहे, तर ४१ टक्के लोक सरकारची कामगिरी समाधानकारक असल्याचे मानत आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘लाडकी बहीण योजना’चा लोकांमध्ये चांगलाच प्रभाव पडला आहे. ४५ टक्क्यांहून अधिक लोकांनी या योजनेला सकारात्मक प्रतिसाद दिला असून, ही योजना निवडणुकीतील 'गेम चेंजर' मानली जात आहे. मात्र, सरकारची लोकप्रियता एवढी वाढली असली तरी सत्ताबदलाची मागणी कायम आहे.

मराठा आरक्षणाचा परिणाम होणार?

सी-व्होटरच्या सर्वेक्षणात मराठा आरक्षण हाही निवडणूक निकालांवर परिणाम करणारा मुद्दा असल्याचे सांगण्यात आले आहे. येत्या निवडणुकीत मराठा आरक्षणाचा मुद्दा महत्त्वाचा ठरू शकतो, असे २३ टक्के लोकांचे मत आहे. याशिवाय बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न, महागाई या मुद्द्यांमुळे सरकारविरोधात निदर्शने होत आहेत. ५२.२ टक्के लोकांनी शिंदे सरकारच्या विकासकामांचे कौतुक केले असले तरी बेरोजगारी आणि महागाईवर जनतेत तीव्र नाराजी असल्याचे दिसत आहे.

अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेससोबतच्या युतीला भाजपला संमिश्र प्रतिसाद मिळत असल्याचेही सर्वेक्षणातून समोर आले आहे. राष्ट्रवादीशिवाय भाजपची कामगिरी चांगली होऊ शकली असती, असे ४९ टक्के लोकांचे मत आहे, तर ३६ टक्के लोकांनी ही आघाडी फायदेशीर असल्याचे म्हटले आहे.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Mahavikas Aghadiमहाविकास आघाडीMahayutiमहायुतीElectionनिवडणूक 2024BJPभाजपाShiv Senaशिवसेनाcongressकाँग्रेस