शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
3
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
4
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
5
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
6
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
7
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
8
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
9
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
10
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
11
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
12
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
13
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
14
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
15
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
16
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
17
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
18
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
19
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
20
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2024 20:32 IST

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने पोलीस आयुक्तांकडे जाहिरातीविरोधात तक्रार दिली आहे.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 ( Marathi News ) : विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीकडून प्रचारसभांना सुरुवात झाली आहे, दोन्ही आघाडीकडून सोशल मीडियावरही कॅम्पेन जोरदार सुरु आहे. महाविकास आघाडीने काल 'लाडक्या बहिणींसाठी आणली यांनी बाधा..',या नावचा एक कॅम्पेन व्हिडीओ बनवला आहे. या व्हिडीओविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. 

"अशोक चव्हाणांनी काँग्रेसच्या जीवावर स्वतःची घरं भरली अन् पक्ष संकटात असताना भाजपात गेले"

राष्ट्रवादी युवकचे प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांनी मुंबई पोलीस आयुक्तांना पत्र लिहून तक्रार दिली आहे. या तक्रारीमध्ये जाहिरातीमधील मजूकर आणि अजित पवारांच्या पात्राचा उल्लेख करत तक्रार दाखल केली आहे. या जाहिरातीमधून अजित पवार यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न महाविकास आघाडीने केला असल्याचे तक्रारीमध्ये केला आहे. बदनामीकारण मजकूर, खोट वृत्त आणि वादग्रस्त आशयाची व्हिडिओ जाहिरात बनवून  उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रतिमा मलिन केल्याचे म्हटले आहे. दरम्यान, तक्रारीची दखल घेऊन संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी सुरज चव्हाण यांनी पत्रातून केली आहे. 

महाविकास आघाडीने गेल्या काही दिवसापासून विधानसभा निवडणुकीसाठी व्हिडीओ कॅम्पेन सुरु केले आहे. काल एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या जाहिरातीमध्ये एक महिला दीड हजारांचा दादा तुमचा वाद फसवा असल्याचं ती महिला बोलत असल्याचे दिसत आहे.ही जाहिरात सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. 

अजित पवार मलिकांसाठी मैदानात, थेट रोड शोमध्ये दाखल

महायुतीमध्ये नवाब मलिक यांच्या उमेदवारीला मोठा विरोध करण्यात आला होता. पण भाजपाचा विरोध झुगारत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नवाब मलिक यांना उमेदवारी दिली. यानंतर भाजपाने मलिक यांचा प्रचार करणार नसल्याचे जाहीर केले. यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले, नवाब मलिक यांच्या प्रचाराला अजित पवार उपस्थित राहणार का नाहीत, या चर्चा सुरू होत्या. तर दुसरीकडे नवाब मलिक यांच्या रोड शो साठी स्वत: अजित पवार यांची उपस्थिती आहे. यावेळी बोलताना अजित पवार यांनी आम्ही नवाब मलिक यांच्या पाठिमागे खंबीर असल्याचे सांगितले आहे.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४NCPराष्ट्रवादी काँग्रेसElectionनिवडणूक 2024Ajit Pawarअजित पवारSharad Pawarशरद पवार