शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
2
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
3
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
4
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
5
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
6
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
7
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
8
कोल्हापूर जिल्ह्यात नीट परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याची पालकांची तक्रार; नेमकं काय घडलं?
9
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
10
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
11
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
12
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
13
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
14
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
15
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
16
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
17
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
18
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
19
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
20
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
Daily Top 2Weekly Top 5

'ती' शरद पवारांच्या कामाची पद्धत; संजय राऊत यांनी सांगितला पवारांचा भन्नाट किस्सा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2020 20:36 IST

शिवसेना नेते संजय राऊत यांनी सांगितल्या सत्तास्थापनेच्या घडामोडी

नाशिक: राज्यात सत्तांतर होऊ शकतं हा विश्वास सुरुवातीला फक्त दोनच व्यक्तींना होता. भाजपाला सत्तेपासून दूर ठेवता येऊ शकतं, हे मला आणि शरद पवारांनाच माहीत होतं. शरद पवारांना ईडीची नोटीस आली. त्यावेळी मी त्यांना भेटायलादेखील गेलो होतो. तेव्हापासून आमच्यात चर्चा सुरू होती, अशा शब्दांत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी राज्यात घडलेल्या सत्तांतरामागील घटनांचा पट उलगडला. वरिष्ठ पत्रकार राजू परुळेकर यांनी नाशिकमध्ये संजय राऊत यांची मुलाखत घेतली. त्यात संजय राऊत यांनी विविध मुद्द्यांवर 'रोखठोक' भाष्य केलं.भाजपाला सत्तेतून खाली खेचता येऊ शकतं हा विश्वास मला आणि शरद पवारांना होता. शरद पवार सुरुवातीला आम्हाला विरोधी पक्षात बसण्याचा जनादेश असल्याचं सांगत होते. पण ती शरद पवारांच्या कामाची पद्धत आहे, असं संजय राऊत यांनी म्हटलं. २०१४ मध्ये आम्हीदेखील विरोधी पक्षात होतो, याकडे त्यांनी लक्ष वेधलं. २०१४ मध्ये भाजपानं सत्ता स्थापन केली होती. त्यावेळी आम्ही विरोधी बाकांवर होतो. विरोधी पक्षनेतादेखील आमच्याच पक्षाचा होता, याची राऊत यांनी आठवण करुन दिली. राज्यात शिवसेनेचं सरकार येऊ शकतं, हा विचार राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांना ईडीची नोटीस आल्यावर पहिल्यांदा मनात आला, असं राऊत यांनी सांगितलं. 'शरद पवारांना ईडीची नोटीस आल्यावर मी त्यांना भेटायला गेलो होतो. त्यावेळी निवडणुकांची घोषणादेखील झाली होती. पवारांना भेटणं हा त्यावेळी गुन्हा होता. त्यांच्या बाजूनं बोलणारेदेखील कमी होते. त्या परिस्थितीत मी पवारांची भेट घेतली,' अशा शब्दांमध्ये राऊत यांनी सत्तास्थापनेच्या घडामोडी उपस्थितांना सांगितल्या.देशासाठी मोठं योगदान असणाऱ्या तुमच्यासारख्या नेत्यावर कारवाई होणं चुकीचं असल्याचं त्यावेळी मी शरद पवारांना म्हटलं होतं. आज तुमच्यासारख्या दिग्गज नेत्यावर सूडबुद्धीनं कारवाई होऊ शकते. तर मग इतरांचं काय, ही भावना त्यावेळी मी पवारांना बोलून दाखवली होती, असं राऊत यांनी सांगितलं. संजय राऊत यांनी मुलाखतीत मोदी सरकारवर तोफ डागली. कोणीही अंगावर आलं, तरी माझं काहीही वाकडं करू शकत नाही. तुम्ही माझ्यामागे पोलीस, सीबीआय, ईडी लावू शकत नाही. कारण मी फाटका माणूस आहे, असं राऊत म्हणाले. आम्ही सगळ्यांना पुरुन उरतो. राज्यातलं सत्तांतर हे त्याचंच उदाहरण आहे, अशा शब्दांत राऊत यांनी भाजपाला लक्ष्य केलं.

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतSharad Pawarशरद पवारBJPभाजपाEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयNCPराष्ट्रवादी काँग्रेसShiv Senaशिवसेना