शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
4
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
5
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
6
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
7
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
8
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
9
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
10
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
11
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
12
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
13
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
14
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
15
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
16
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
17
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
18
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
19
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
20
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
Daily Top 2Weekly Top 5

मी थांबलो, तसं शरद पवार थांबले असते तर...; पुतण्याला वारसदार करणारे काका स्पष्टच बोलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2024 16:36 IST

महाराष्ट्राच्या राजकारणात पहिल्यांदाच काकाने राजकारणातून निवृत्ती घेत पुतण्याला राजकीय वारसदार म्हणून पुढे केल्याचं घडलं आहे. 

बीड - राजकारणात काका-पुतणे हे राजकारण नेहमीच रंगल्याचं दिसून आले. राजकीय वारसा न मिळाल्याने बरेच पुतणे काकांपासून दूर झाले. ठाकरे, पवार या घराण्यातही काका पुतण्याचा राजकीय वाद रंगलाच. मात्र बीड जिल्ह्यात सोळंके घराणं त्याला अपवाद ठरलं आहे. याठिकाणी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश सोळंके यांनी त्यांच्या पुतण्याला राजकीय वारसदार बनवून राजकारणातून निवृत्तीची घोषणा केली आहे. यावेळी आमदार प्रकाश सोळंके यांनी शरद पवारांनाही खोचक सल्ला दिला आहे. 

आमदार प्रकाश सोळंके म्हणाले की, महाराष्ट्रात ज्याठिकाणी वाद आहेत त्याठिकाणी चुलत्यांनी थांबण्याची भूमिका घेतली पाहिजे. शरद पवारांनी आमच्यासमोर निवृत्तीचा निर्णय घेतला आणि तो २ दिवसांत फिरवला. ही दुर्दैवी घटना होती. त्यामुळे त्यांच्या घरात फूट झाली असावी. वडिलधारी म्हणून चुलत्यांनी भूमिका घेतली असती तर घर शाबूत राहिले असते. मी मागच्या निवडणूक प्रचारातच ही माझी शेवटची निवडणूक असं जाहीर केले होते. त्यामुळे मला ही भूमिका बदलायची नाही असं त्यांनी सांगितले.

तसेच ज्यांनी माझ्यासोबत प्रत्यक्ष काम केले आहे त्यांना अजूनही मी निवडणूक लढवावी अशी त्यांची भावना आहे. परंतु मी निवृत्तीचा निर्णय ५ वर्षापूर्वी घेतला आहे. मी घेतलेला निर्णय योग्य आहे हे माझं ठाम मत आहे. नवीन नेतृत्व, तरूण नेतृत्व पुढचे ५-२५ वर्ष मतदारसंघाला स्थिर नेतृत्व लाभावं असं मला वाटतं. त्याला लोकही पाठिंबा देतील अशी अपेक्षा आहे. तरुण मंडळी माझ्याशी जे संपर्क ठेवू शकत नव्हते. काहींना आदरयुक्त भीती असायची ते कदाचित नव्या नेतृत्वाला जोडले जातील असंही आमदार प्रकाश सोळंके यांनी म्हटलं.

दरम्यान, मी जरी निवडणुकीच्या राजकारणातून बाजूला व्हायचं ठरवलं असलं तरी मी सक्रीय राहणार आहे. मी २०१४ ते २०१९ आमदार नव्हतो. तरी रात्रदिवस लोकांसाठी काम करत होतो. यापुढेही तसं करत राहीन. विधानसभेची निवडणूक महत्त्वाची नाही. पुढे पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका निवडणुका आहे. त्या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत. ज्या कार्यकर्त्यांनी आजपर्यंत मला सहकार्य केले त्यांच्यासाठी मला काम करावेच लागणार आहे असंही आमदार प्रकाश सोळंके यांनी स्पष्ट केले.  

टॅग्स :Prakash Solankeप्रकाश सोळंकेSharad Pawarशरद पवारPoliticsराजकारणAjit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४