शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
4
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
5
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
6
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
7
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
8
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
9
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
10
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
11
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
12
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
13
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
14
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
15
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
16
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
17
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
18
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
19
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
20
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
Daily Top 2Weekly Top 5

...तर मला अटक झाली नसती, पण सरकार पडलं असतं; अनिल देशमुखांचा गौप्यस्फोट

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2023 13:01 IST

मी शरद पवारांच्या उपस्थितीत हे विधान वर्धातील सभेत केले होते. पुन्हा तेच सांगतोय असं अनिल देशमुख म्हणाले.

नागपूर - जयंत पाटील यांच्यावर भाजपाकडून दबाव होता. भाजपाचा प्रस्ताव मान्य केला नाही म्हणून जयंत पाटील यांच्यावर ईडी कारवाई झाली असा दावा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला. तर राऊतांचा हा दावा भाजपाने फेटाळला. पण २ वर्षापूर्वी मलाही भाजपाने प्रस्ताव पाठवला होता असं विधान माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांनी केले आहे. 

अनिल देशमुख म्हणाले की, २ वर्षापूर्वी मी भाजपासोबत समझोता केला असता तर मला अटक नसती झाली. पण २ वर्षापूर्वीच काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे सरकार पडले असते. मी शरद पवारांच्या उपस्थितीत हे विधान वर्धातील सभेत केले होते. माझ्याकडे जो प्रस्ताव आला होता त्याने मला अटक झाली नसती पण सरकार पडले असते. याचा अर्थ तुम्ही समजून जा असं त्यांनी म्हटलं आहे. 

मविआत जागावाटपाची चर्चा होईलमहाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षाचे वरिष्ठ नेते चर्चेला बसतील, कोणत्या मतदारसंघात कुणाला उमेदवारी द्यायची, मतदारसंघ कोणत्या पक्षाला द्यायचा हे ठरवतील. त्यानंतर मतदारसंघात जो कुणी उमेदवार दिला जाईल त्याला निवडून आणण्यासाठी महाविकास आघाडीच्या सर्व पक्षाचे कार्यकर्ते दिवसरात्र प्रयत्न करतील असा विश्वास अनिल देशमुखांनी व्यक्त केला. 

राष्ट्रवादी पक्ष सर्वसमावेशक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ओबीसी सेलचे २ दिवसीय पदाधिकारी शिबीर नागपूरात आहे. या शिबिराला शरद पवार, अजित पवार, जयंत पाटील यांच्यापासून सगळेच हजर असतील. अतिशय महत्वाचे शिबीर असून त्याला नेते मार्गदर्शन करतील. पक्षाकडून विविध शिबीर आयोजित केले जातात. ओबीसीचे राज्यभरातील पदाधिकारी, कार्यकर्ते या मेळाव्याला उपस्थित राहतील. आमचा पक्ष सर्वसमावेशक, जातीधर्माचे लोकांचा आहे. कुठल्याही एका जातीचा आणि धर्माचा नाही असंही अनिल देशमुख यांनी सांगितले. 

टॅग्स :Anil Deshmukhअनिल देशमुखMahavikas Aghadiमहाविकास आघाडीBJPभाजपा