शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
3
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
4
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
5
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
6
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
7
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
8
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
9
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
10
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
11
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
12
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
13
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
14
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
15
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
16
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
17
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
18
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
19
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
20
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

धडाकेबाज PSI 'बदने'वर बलात्काराचा आरोप! तस्करांना पकडणारा अधिकारी महिला डॉक्टरच्या मृत्यूनंतर फरार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2025 16:36 IST

साताऱ्यातील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात पीएसआय गोपाल बदनेचे नाव आल्याने खळबळ उडाली आहे.

PSI Gopal Badnae: साताऱ्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयाच्या महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणात पोलीस उपनिरीक्षक गोपाल बदने यांचे नाव समोर आल्याने जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, ज्या अधिकाऱ्यावर आता बलात्कारासारखे गंभीर आरोप आहेत, त्याच बदने यांनी काही महिन्यांपूर्वी जीवावर उदार होऊन मोठी आणि धडाकेबाज कारवाई केली होती. मात्र आता महिला डॉक्टरवर बलात्कार आणि आत्महत्येस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे.

फलटण उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर तरुणीने आत्महत्या करण्यापूर्वी आपल्या हातावर एक सुसाईड नोट लिहून ठेवली होती. पोलीस उपनिरीक्षक गोपाल बदने आपल्या आत्महत्येस जबाबदार असल्याचं तरुणीने लिहिलं आहे. मयत तरुणी मूळ बीड जिल्ह्यातील रहिवासी होती. पोलीस निरीक्षक गोपाल बदने याने माझ्यावर चार वेळा बलात्कार असं महिलेने हातावर लिहीलं होतं. ती फलटण शहरातील विद्यानगर परिसरात पेईंग गेस्ट म्हणून राहत होती. आत्महत्या प्रकरणात नाव आल्यानंतर गोपाळ बदनेने काही महिन्यांपूर्वी केलेल्या कारवाईची चर्चा सुरु झाली आहे.  बदने सध्या फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

काही महिन्यांपूर्वी फलटण परिसरात गांजाची तस्करी करणाऱ्या एका टोळीला पकडताना पी.एस.आय. गोपाल बदने यांनी अत्यंत शौर्य दाखवले होते. गांजा तस्करांना पकडण्याच्या या कारवाईदरम्यान, आरोपींनी बदने यांना गाडीसोबत फरफटत नेले होते. या पाठलागात बदने यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली होती. या धडाकेबाज कारवाईमुळे त्यांचे वरिष्ठ अधिकारी आणि सामान्य नागरिक यांच्याकडून त्यांचे कौतुक झाले होते.

एप्रिल महिन्यात फलटण तालुक्यातील साखरवाडी येथे पोलिसांचा तपासणी नाका केला होता. त्यावेळी सात सर्कल रोडवरील एका शेतात एक पांढर्‍या रंगाची कार आली. तिला बदने यांनी थांबवण्याचा प्रयत्न केला असता ती धडकून थांबली. चालकाकडे चौकशी करत असतानाच चालकाने अचानक खिडकीची काच वर घेतली. यात बदने यांचा हात अडकला. आरोपीने तशीच कार पळवत नेली. सुमारे एक किलोमीटरपर्यंत बदने यांना फरफटत नेले. त्यानंतर कार शेतात जाऊन उभी राहिली आणि कारचालक पळून गेला. मात्र शेजारच्या व्यक्तीला पळून जाता आले नाही. वेळी कारमध्ये पांढऱ्या गोणीत दहा किलो ३० ग्रॅम गांजा आढळून आला. बदने यांच्यावर फलटण येथील खासगी दवाखान्यात उपचार सुरू होते.

अशी कामगिरी करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यावर एका महिला डॉक्टरने मृत्यूपूर्वी बलात्कार आणि छळाचा गंभीर आरोप केल्याने संपूर्ण पोलीस दल चक्रावले आहे. महिला डॉक्टरने आपल्या हातावर स्पष्टपणे लिहिले की, "PSI गोपाल बदनेने माझा चारवेळा बलात्कार केला आणि प्रशांत बनकरने शारीरिक व मानसिक त्रास दिला." यासोबतच पोस्टमार्टम रिपोर्ट बदलण्यासाठी दबाव आणल्याचा आरोपही महिला डॉक्टरच्या नातेवाईकांनी केला आहे. दरम्यान, साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी बदने यांना तातडीने निलंबित केले असून, त्यांना अटक करण्यासाठी पोलीस पथके रवाना झाली आहेत. 

English
हिंदी सारांश
Web Title : PSI Accused of Rape, Absconding in Doctor's Death Case

Web Summary : PSI Gopal Badne faces rape allegations, linked to a doctor's suicide. The doctor accused him in a suicide note. Badne, previously lauded for bravery in a drug bust, is now absconding. Police are searching for him after suspension.
टॅग्स :Satara areaसातारा परिसरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस