शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
2
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
3
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
4
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
5
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
6
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
7
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
8
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
9
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
10
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
11
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
12
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
13
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
14
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
15
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
16
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
17
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
18
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
19
‘धुरंधर’चा वाद सामंजस्याने सोडवावा, दिग्दर्शक आदित्य धर, निर्मात संतोष कुमार यांना उच्च न्यायालयाच्या सूचना
20
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2025 19:31 IST

Congress leader join BJP: भाजपाच्या प्रदेश कार्यालयात झाला मोठा कार्यक्रम

Congress leader join BJP: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी राज्यमंत्री सुरेश वरपुडकर यांनी मंगळवारी आपल्या असंख्य समर्थकांसह भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी परभणीचे वरपुडकर व त्यांच्या सहकाऱ्यांचे स्वागत केले. प्रदेश कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमाला महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची विशेष उपस्थिती होती. यावेळी रवींद्र चव्हाण म्हणाले की, सुरेश वरपुडकर हे सामाजिक बांधिलकी ठेवून काम करणारे व्यक्तिमत्व आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्तृत्वावर विश्वास ठेवून विकसित भारत आणि महाराष्ट्र घडवण्यासाठी या सर्वांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. महाराष्ट्राला सुजलाम सुफलाम बनवून, प्रत्येक क्षेत्रात राज्याला अव्वल बनवण्यासाठी भाजपा प्रयत्नशील आहे. दांडगा अनुभव पाठीशी असलेल्या वरपुडकर यांच्या पक्षप्रवेशाने परभणी जिल्ह्यात भाजपा संघटना अधिक मजबूत होईल. पक्षात प्रवेश केलेल्या सर्वांचा भाजपामध्ये सन्मान राखला जाईल अशी ग्वाही चव्हाण यांनी  दिली.

यावेळी महसूल मंत्री श्री. बावनकुळे म्हणाले की, सहकार क्षेत्रातील कार्य आणि समाजकार्यामुळे परभणी जिल्ह्याच्या राजकारणात चार दशकांपासून ठसा उमटवणारे वरपुडकर यांच्या भाजपा प्रवेशाने पक्ष संघटनेला बळ मिळेल. भाजपाच्या विकासनीतीला साथ देण्यासाठी भाजपामध्ये प्रवेश केल्याचे वरपुडकर म्हणाले. सर्वांच्या साथीने भाजपाची विचारधारा अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवून पक्षवाढीस हातभार लावण्याचा संकल्प वरपुडकर यांनी केला.

कोणकोणत्या मंडळींनी केला पक्षप्रवेश?

भाजपामध्ये प्रवेश केलेल्यांमध्ये परभणी जिल्हा परिषद उपाध्यक्ष समशेर वरपुडकर, जिल्हा परिषद माजी सभापती परभणी धोंडीराम चव्हाण, पंचायत समितीचे माजी सभापती तुकाराम वाघ, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक प्रेरणा वरपुडकर, माजी समाजकल्याण सभापती द्वारकाबाई कांबळे, कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती अजय चव्हाण, जिल्हा परिषद माजी सदस्य तुळशीराम सामाले, पंचायत समितीचे माजी उपसभापती रामेश्वर कटिंग, पंचायत समितीचे माजी सदस्य मधुकर लाड, दिलीपराव साबळे आदींचा समावेश आहे.

टॅग्स :congressकाँग्रेसBJPभाजपाministerमंत्री