शहरं
Join us  
Trending Stories
1
खरा मित्र… रशियाने पुन्हा सिद्ध केले, गॅरंटी दिली, “काही होऊ दे, भारताचे नुकसान करणार नाही”
2
परदेश दौरे बंद अन् ताफा अर्ध्यावर; मुख्यमंत्र्यांचे कडक आदेश, मंत्री-अधिकारी एक दिवस बस-मेट्रोने फिरणार
3
PM मोदींच्या आवाहनाचा परिणाम! इंधन बचतीसाठी सुवेंदू अधिकारी यांचाही पुढाकार; DGP ना दिला मोठा आदेश
4
नाशिक कुंभमेळ्याचा 'महाप्लॅन' तयार; प्रत्येक आखाड्याला ५ कोटींचा निधी- एकनाथ शिंदे
5
नरेंद्र मोदींचा कृतीतून संदेश! पंतप्रधानांच्या ताफ्यात फक्त दोन कार, राजधानी दिल्लीतील व्हिडीओ व्हायरल
6
“नेपाळ-बांगलादेशप्रमाणे GenZ ने भारतातही रस्त्यावर उतरायला हवे”; केजरीवाल असे का म्हणाले?
7
PM मोदींचे आवाहन सकारात्मकतेने घेणं गरजेचं, विरोधकांनी थट्टा करू नये- मुख्यमंत्री फडणवीस
8
“जो सामील असेल, त्यावर कारवाई व्हायला हवी”; NEET पेपर लीक प्रकरणी CM फडणवीसांनी केले स्पष्ट
9
Travel : लडाखमध्ये इंजिन बंद असूनही गाड्या आपोआप चढतात डोंगर; या 'मॅग्नेटिक हिल'चं रहस्य काय?
10
विराटकडून प्रेरणा; आईच्या मार्गदर्शनाखाली फिटनेस स्तर उंचावला! IPL गाजवणाऱ्या साईची खास गोष्ट
11
भयंकर! फक्त एका लिंबूसाठी १२ वर्षांच्या मुलाची हत्या; संतप्त जमावाकडून पोलिसांवर दगडफेक
12
PM मोदी म्हणाले, १ वर्ष सोनं खरेदी करू नका; पण चांदीबद्दल काहीच का नाही बोलले? दर वर्षी किती चांदी खरेदी करतो भारत?
13
Top Marathi News Live: नाशिक: भोंदू अशोक खरातविरुद्ध SITकडून दोषारोपपत्र न्यायालयात दाखल
14
इराणचा 'डर्टी बॉम्ब'! एका स्फोटात शहरं होतील ओसाड; अमेरिकन नौदलाला हाय अलर्ट
15
देश मजबूत करू, PM मोदींना साथ देऊ! मुंबईकर आमदारांचा गोवा तेजस एक्स्प्रेसने प्रवास; म्हणाले…
16
STचे प्रवाशांसाठी मोठे पाऊल! १ जूनपासून सर्व स्वच्छतागृहे मोफत; प्रताप सरनाईकांची घोषणा
17
वर्दीतील देवदूत! हायवेवर Heart Attack आलेल्या चालकाचे वाचवले प्राण; इंटरनेटवर कौतुकाचा वर्षाव
18
पती हरवल्याची तक्रार घेऊन पोलीस ठाण्यात आली; तपास सुरू झाला, समोर आले पत्नीचे दोन आशिक अन्.. 
19
“मनमानी भाडेवाढ करणारे खासगी बस वाहतूकदार, अवैध प्रवासी ॲपवर कारवाई करा”: प्रताप सरनाईक
20
Huma Praveen : २ मुलींची जबाबदारी, १० वर्षे नोकरी, ५ वर्षे अपयश; किचनमध्ये केला अभ्यास, सून झाली ऑफिसर
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक कुंभमेळ्याचा 'महाप्लॅन' तयार; प्रत्येक आखाड्याला ५ कोटींचा निधी- एकनाथ शिंदे

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2026 18:19 IST

Eknath Shinde Nashik Kumbh Mela 2027: जमीन संपादनासाठी २२६७ कोटी रुपयांच्या भरघोस निधीला मंजुरी

Eknath Shinde Nashik Kumbh Mela 2027: नाशिकमध्ये होणाऱ्या आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नियोजनासाठी आज महत्त्वाची बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीत १३ आखाड्यांच्या साधू-महंतांशी संवाद साधून तयारीचा सविस्तर आढावा घेतला. मोठ्या आखाड्याला विकासकामांसाठी ५ कोटी रुपये तर जमिनीच्या संपादनासाठी २२६७ कोटी रुपयांच्या भरघोस निधीला मंजुरी दिल्याची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज माध्यमांच्या प्रतिनिधींना दिली.

याविषयी माध्यमांशी बोलताना उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, "या बैठकीत कुंभमेळ्याच्या बोधचिन्हाचे अनावरण करण्यात आले असून त्र्यंबकेश्वर दर्शन पथ प्रकल्पाचे ऑनलाईन भूमिपूजनही करण्यात आले. कुंभमेळ्यासाठी प्रशासन सज्ज असून केवळ चालू वर्षाचा विचार न करता भविष्यातील गरजा लक्षात घेऊन कायमस्वरूपी सोयी-सुविधा निर्माण करण्यावर भर दिला जात आहे. कुंभमेळ्यासाठी एकूण ३७७ एकर जमीन आरक्षित करण्यात आली असून त्यातील ९४ एकर जमीन नाशिक महापालिकेने संपादित केली आहे. उर्वरित २८३ एकर जमिनीच्या संपादनासाठी सरकारने  २२६७ कोटी रुपयांच्या भरघोस निधीला मंजुरी दिली आहे. विशेष म्हणजे, आखाड्यांच्या जमिनी घेताना त्यांना योग्य मोबदला किंवा पर्यायी जमीन दिली जाईल."

"प्रत्येक मोठ्या आखाड्याला विकासकामांसाठी ५ कोटी रुपये, तर लहान संस्थांना १५ लाख रुपये दिले जाणार आहेत. आखाड्यांचे वीज बिल स्वतः कुंभमेळा प्राधिकरण भरणार असून पावसाळ्यापासून संरक्षणासाठी तिथे 'रैन बसेरा' उभारला जाईल. १४५० एकरवर भव्य साधुग्रामची निर्मिती केली जाणार असून १५ हजार स्वच्छता मित्रांच्या माध्यमातून परिसर स्वच्छ ठेवला जाईल. गोदावरीचे पात्र स्वच्छ आणि निर्मळ राहील यासाठी सरकार कटिबद्ध आहे. याशिवाय रस्ते, पार्किंग, पिण्याचे पाणी, सुसज्ज रुग्णालये, आपत्ती व्यवस्थापन आणि महिलांच्या सुरक्षेबाबत बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली असून कुंभमेळ्याच्या निधीत कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही," असे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी सांगितले.

English
हिंदी सारांश
Web Title : Nashik Kumbh Mela 'Mega Plan' Ready; ₹5 Crore Fund for Each Akhada

Web Summary : ₹2267 crore approved for Nashik Kumbh Mela land acquisition. Each Akhada gets ₹5 crore for development. Focus on facilities, cleanliness and safety.
टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेNashikनाशिकKumbh Melaकुंभ मेळा