शहरं
Join us  
Trending Stories
1
परदेश दौरे बंद अन् ताफा अर्ध्यावर; मुख्यमंत्र्यांचे कडक आदेश, मंत्री-अधिकारी एक दिवस बस-मेट्रोने फिरणार
2
PM मोदींच्या आवाहनाचा परिणाम! इंधन बचतीसाठी सुवेंदू अधिकारी यांचाही पुढाकार; DGP ना दिला मोठा आदेश
3
नाशिक कुंभमेळ्याचा 'महाप्लॅन' तयार; प्रत्येक आखाड्याला ५ कोटींचा निधी- एकनाथ शिंदे
4
नरेंद्र मोदींचा कृतीतून संदेश! पंतप्रधानांच्या ताफ्यात फक्त दोन कार, राजधानी दिल्लीतील व्हिडीओ व्हायरल
5
“नेपाळ-बांगलादेशप्रमाणे GenZ ने भारतातही रस्त्यावर उतरायला हवे”; केजरीवाल असे का म्हणाले?
6
PM मोदींचे आवाहन सकारात्मकतेने घेणं गरजेचं, विरोधकांनी थट्टा करू नये- मुख्यमंत्री फडणवीस
7
“जो सामील असेल, त्यावर कारवाई व्हायला हवी”; NEET पेपर लीक प्रकरणी CM फडणवीसांनी केले स्पष्ट
8
Travel : लडाखमध्ये इंजिन बंद असूनही गाड्या आपोआप चढतात डोंगर; या 'मॅग्नेटिक हिल'चं रहस्य काय?
9
विराटकडून प्रेरणा; आईच्या मार्गदर्शनाखाली फिटनेस स्तर उंचावला! IPL गाजवणाऱ्या साईची खास गोष्ट
10
भयंकर! फक्त एका लिंबूसाठी १२ वर्षांच्या मुलाची हत्या; संतप्त जमावाकडून पोलिसांवर दगडफेक
11
PM मोदी म्हणाले, १ वर्ष सोनं खरेदी करू नका; पण चांदीबद्दल काहीच का नाही बोलले? दर वर्षी किती चांदी खरेदी करतो भारत?
12
Top Marathi News Live: नागपूर विमानतळाला आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणून केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता
13
इराणचा 'डर्टी बॉम्ब'! एका स्फोटात शहरं होतील ओसाड; अमेरिकन नौदलाला हाय अलर्ट
14
देश मजबूत करू, PM मोदींना साथ देऊ! मुंबईकर आमदारांचा गोवा तेजस एक्स्प्रेसने प्रवास; म्हणाले…
15
STचे प्रवाशांसाठी मोठे पाऊल! १ जूनपासून सर्व स्वच्छतागृहे मोफत; प्रताप सरनाईकांची घोषणा
16
वर्दीतील देवदूत! हायवेवर Heart Attack आलेल्या चालकाचे वाचवले प्राण; इंटरनेटवर कौतुकाचा वर्षाव
17
पती हरवल्याची तक्रार घेऊन पोलीस ठाण्यात आली; तपास सुरू झाला, समोर आले पत्नीचे दोन आशिक अन्.. 
18
“मनमानी भाडेवाढ करणारे खासगी बस वाहतूकदार, अवैध प्रवासी ॲपवर कारवाई करा”: प्रताप सरनाईक
19
Huma Praveen : २ मुलींची जबाबदारी, १० वर्षे नोकरी, ५ वर्षे अपयश; किचनमध्ये केला अभ्यास, सून झाली ऑफिसर
20
LPG ग्राहकांसाठी सूचना! छोटीशी चूक तुम्हाला अडचणीत आणू शकते; सरकार लोकांना का करतंय अलर्ट?
Daily Top 2Weekly Top 5

नरेंद्र मोदींचा कृतीतून संदेश! पंतप्रधानांच्या ताफ्यात फक्त दोन कार, राजधानी दिल्लीतील व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2026 16:56 IST

PM Narendra Modi: देशवासियांना आवाहन केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतःच्या ताफ्यात मोठा बदल केला आहे.

PM Modi Convoy:  जागतिक स्तरावर निर्माण झालेले ऊर्जा संकट आणि इंधनाच्या वाढत्या किमतींच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. पंतप्रधानांनी देशवासीयांना इंधन बचतीचे आवाहन केल्यानंतर स्वतःच्या ताफ्यातील वाहनांची संख्या लक्षणीयरीत्या कमी केली आहे. बुधवारी पंतप्रधान मोदी केवळ दोन गाड्यांच्या ताफ्यासह कॅबिनेटच्या बैठकीला पोहोचले. इंधन बचतीचे आवाहन केल्यानंतर पंतप्रधान मोदींनी हे पाऊल उचलले जेणेकरून इतरांनाही याचे अनुकरण करण्याची प्रेरणा मिळेल. 

सुरक्षा कायम, पण साधेपणावर भर

पंतप्रधानांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या विशेष सुरक्षा दलाच्या प्रोटोकॉलमध्ये कोणतीही तडजोड न करता हा महत्त्वपूर्ण बदल करण्यात आला. नवीन व्यवस्थेनुसार, आता केवळ अत्यंत आवश्यक असलेली सुरक्षा वाहनेच ताफ्यात असतील. एका गाडीत पंतप्रधान स्वतः होते, तर दुसऱ्या गाडीत एसपीजीचे कमांडो तैनात होते. अनावश्यक गाड्या हटवून ताफा अधिक सक्षम बनवण्यावर पंतप्रधानांनी भर दिला आहे. तसेच, भविष्यात ताफ्यात इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढवण्याचे सूतोवाचही त्यांनी केले आहे.

देशवासीयांना आवाहन

पंतप्रधान मोदींनी सलग दोन दिवस देशातील जनतेला काही महत्त्वाचे संकल्प करण्याचे आवाहन केले होते. पंतप्रधान मोदींनी पेट्रोल आणि डिझेलचा वापर अत्यंत विचारपूर्वक आणि जबाबदारीने करावा, प्रत्येक गोष्टीसाठी आयातीवर अवलंबून राहण्यापेक्षा स्थानिक उत्पादनांचा जास्तीत जास्त वापर करावा तसेच परकीय चलन वाचवण्यासाठी किमान एक वर्ष सोन्याची खरेदी टाळा आणि परदेश दौऱ्यांऐवजी देशांतर्गत पर्यटनाला प्राधान्य द्या अशी आवाहने केली आहेत.

पंतप्रधानांच्या पावलावर पाऊल

पंतप्रधानांव्यतिरिक्त, इतर मंत्री आणि नेत्यांनीही त्यांच्या ताफ्यातील वाहनांची संख्या कमी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही त्यांच्या ताफ्याचा आकार निम्म्याहून अधिक कमी केला आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनीही आपल्या अधिकृत ताफ्यातील वाहनांची संख्या ५० टक्क्यांनी कमी करण्याचा आणि महाराष्ट्र दौऱ्यादरम्यान बसने प्रवास करण्याचा निर्णय घेतला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : PM Modi's action speaks: Reduced convoy size, Delhi video viral.

Web Summary : PM Modi reduced his convoy to two cars, urging fuel conservation. Ministers and BJP leaders followed suit, cutting convoy sizes and promoting online meetings, setting an example for responsible living.
टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीUS Israel Iran Warअमेरिका-इस्रायल-इराण वॉरLPG Gas Crisisएलपीजी गॅस टंचाई