इराण आणि अमेरिका यांच्यातील संघर्ष आता एका भयानक वळणावर येऊन पोहोचला आहे. अण्वस्त्रांच्या शर्यतीत इराणने आता 'डर्टी बॉम्ब' वापरण्याची उघड धमकी दिल्याने संपूर्ण जगाची धाकधूक वाढली आहे. जर, इराणवर मोठा हल्ला झाला, तर आम्ही किरणोत्सर्गी कचरा आणि एनरिच्ड युरेनियमचा वापर करून विध्वंस घडवू, असा इशारा तेहरानने दिला आहे. या धमकीनंतर अमेरिकेने आपल्या सैन्य हालचाली वेगवान केल्या असून आखाती देशांमध्ये युद्धाचे ढग गडद झाले आहेत.
काय आहे 'डर्टी बॉम्ब' आणि त्याचा धोका?
'डर्टी बॉम्ब' हा पारंपारिक अण्वस्त्रांइतका शक्तिशाली नसला तरी तो अत्यंत घातक मानला जातो. यात टीएनटी सारख्या स्फोटकांसोबत रेडिओलॉजिकल पदार्थ मिसळले जातात. याच्या स्फोटानंतर मोठा परिसर किरणोत्सर्गी होतो. यामुळे तो भाग अनेक दशकांपर्यंत राहण्यायोग्य उरत नाही आणि कर्करोगासारखे गंभीर आजार पसरतात.
इराणकडे ६०% युरेनियमचा साठा: IAEAचा खळबळजनक रिपोर्ट
आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सीच्या ताज्या आकडेवारीनुसार, इराण अण्वस्त्र निर्मितीच्या अगदी जवळ पोहोचला आहे. इराणने इस्फहानच्या डोंगराखाली सुरक्षित बोगदे बनवले आहेत. तिथे सुमारे ४४० किलो ६०% एनरिच्ड युरेनियम दडवून ठेवण्यात आले आहे. अण्वस्त्रांसाठी ९०% एनरिचमेंट लागते, इराण आता या टप्प्याच्या अत्यंत जवळ आहे. एवढ्या साठ्यातून अनेक 'डर्टी बॉम्ब' तयार केले जाऊ शकतात.
अमेरिकेचा 'डेस्परेट ब्लफ' आणि प्रतिहल्ला
ट्रम्प प्रशासनाने इराणची ही धमकी म्हणजे "हताशपणातून दिलेले विधान" असल्याचे म्हटले आहे. मात्र, प्रत्यक्षात अमेरिकन सैन्य आता इराणचा हा युरेनियमचा साठा जप्त करण्यासाठी किंवा नष्ट करण्यासाठी विशेष लष्करी मोहिमेची आखणी करत आहे. इराणने अमेरिकेचा मुकाबला करण्यासाठी आपली संरक्षण फळी मजबूत केली आहे.
Web Summary : Iran threatens to use a 'dirty bomb' if attacked, raising global concerns. It possesses a large enriched uranium stockpile. The US considers military action. Tensions escalate.
Web Summary : ईरान ने हमले की स्थिति में 'डर्टी बम' इस्तेमाल करने की धमकी दी, जिससे वैश्विक चिंता बढ़ गई है। उसके पास समृद्ध यूरेनियम का बड़ा भंडार है। अमेरिका सैन्य कार्रवाई पर विचार कर रहा है। तनाव बढ़ता है।