ऑस्ट्रेलियामध्ये बांधले जाणारे पहिले 'ट्रम्प टॉवर' आता ट्रम्प यांच्या नावाशिवाय उभं राहणार आहे. हा प्रकल्प जाहीर झाल्यापासून अवघ्या तीन महिन्यांतच स्थानिक विकासकानं 'ट्रम्प' हे नाव प्रकल्पातून हटवण्याचा निर्णय घेतला असून, ऑस्ट्रेलियामध्ये हा ब्रँड आता 'टॉक्सिक' झाला असल्याचं म्हटलं आहे.
इराण युद्ध आणि इतर जागतिक घडामोडींमुळे ऑस्ट्रेलियात ट्रम्प या नावाची लोकप्रियता मोठ्या प्रमाणावर कमी झाली आहे, अशी प्रतिक्रिया अल्टस प्रॉपर्टी समूहाचे सीईओ डेव्हिड यंग यांनी सीएनएनशी बोलताना दिली. हा प्रकल्प जाहीर झाल्यापासूनच त्याला विरोध सुरू झाला होता. एका याचिकेवर तर तब्बल १,४०,००० हून अधिक लोकांनी स्वाक्षऱ्या केल्या होत्या. अमेरिकेतील सामाजिक घडामोडी आणि हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर ऑस्ट्रेलियातील जनतेनं या प्रकल्पाला कडाडून विरोध दर्शवला होता.
३६ वर्षांपूर्वीच्या शेअर ट्रान्सफरवरुन नवा वाद; नोएल टाटा आणि एन. चंद्रशेखरन यांना नोटीस
प्रकल्पाचं भव्य स्वरूप
गोल्ड कोस्ट येथे ९१ मजली 'ट्रम्प इंटरनॅशनल हॉटेल अँड टॉवर' उभारले जाणार होतं. हे ऑस्ट्रेलियातील सर्वात उंच टॉवर ठरणार होते. यामध्ये २८५ आलिशान खोल्यांचे हॉटेल, हाय-एंड रिटेल प्लाझा, रेस्टॉरंट्स आणि ट्रम्प यांच्या मानकांनुसार तयार केलेली आलिशान निवासी अपार्टमेंट्स असणार होती. विशेष म्हणजे, ट्रम्प ऑर्गनायझेशनचा ऑस्ट्रेलियातील हा पहिलाच अधिकृत प्रकल्प होता.
ब्रँड नेमवरून वाद
डेव्हिड यंग यांनी स्पष्ट केलं की, जरी ट्रम्प ब्रँडसोबतचा करार संपला असला, तरी टॉवरचे बांधकाम सुरूच राहील, फक्त त्याला ट्रम्प यांचे नाव नसेल. यंग यांनी सोशल मीडियावर म्हटलं की, ट्रम्प यांच्या नावाचा ब्रँड ऑस्ट्रेलियात आता वादात सापडला आहे. माध्यमांनी आणि काही संघटनांनी डोनाल्ड ट्रम्प यांची जी प्रतिमा रंगवली आहे, त्यामुळे हा ब्रँड भारतीयांना किंवा ऑस्ट्रेलियातील लोकांना नकोसा झाला आहे. दरम्यान, त्यांनी हे देखील स्पष्ट केले की ट्रम्प कुटुंबाशी त्यांचे कोणतेही वैयक्तिक मतभेद नाहीत.
आर्थिक बाजू आणि प्रशासकीय अडचण
गोल्ड कोस्टचे महापौर टॉम टेट यांनी या प्रकरणावर वेगळी बाजू मांडली. त्यांच्या मते, या प्रकल्पासाठी कधीही अधिकृत अर्ज महापालिकेकडे सादर करण्यात आला नव्हता. हा केवळ दोन खाजगी पक्षांमधील करार होता. यामागे पैशांचं कारणही असू शकतं, कारण ट्रम्प ऑर्गनायझेशन त्यांच्या नावासाठी आणि व्यवस्थापनासाठी मोठ्या नफ्याची मागणी करत होते, जे कदाचित विकासकाला परवडणारं नव्हतं.
२०३२ मध्ये होणाऱ्या ब्रिस्बेन ऑलिम्पिकपूर्वी ही इमारत पूर्ण करण्याचा डेव्हिड यंग यांचा मानस होता. आता हा प्रकल्प 'अमेरिकन' नव्हे तर संपूर्णपणे 'ऑस्ट्रेलियन' प्रकल्प म्हणून पुढे नेला जाणार आहे. तसंच यंग आता या टॉवरसाठी इतर आंतरराष्ट्रीय लक्झरी ब्रँड्सशी चर्चा करत आहेत.
Web Summary : Australia's first Trump Tower project was abandoned due to brand toxicity. Local developers cited declining popularity and public opposition linked to Trump's image. Financial disagreements also played a role in the decision.
Web Summary : ब्रांड की विषाक्तता के कारण ऑस्ट्रेलिया में पहला ट्रम्प टॉवर प्रोजेक्ट रद्द कर दिया गया। स्थानीय डेवलपर्स ने ट्रम्प की छवि से जुड़ी घटती लोकप्रियता और सार्वजनिक विरोध का हवाला दिया। वित्तीय असहमति ने भी निर्णय में भूमिका निभाई।