Join us
Daily Top 2Weekly Top 5

विराटकडून प्रेरणा; आईच्या मार्गदर्शनाखाली फिटनेस स्तर उंचावला! IPL गाजवणाऱ्या साईची खास गोष्ट

By सुशांत जाधव | Updated: May 13, 2026 17:29 IST

Open in App
1 / 8

IPL च्या सलग तिसऱ्या हंगामात साई सुदर्शन याने कमी वयात ५०० पेक्षा अधिक धावा करत खास विक्रम नोंदवला आहे.

2 / 8

गुजरात टायटन्सच्या ताफ्यातून सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या सलामीवीराच्या यशात त्याच्या कुटुंबियाचा खूप मोठा वाटा आहे.

3 / 8

क्रिकेटचं मैदान गाजवण्यासाठी फक्त खेळातील क्षमता असून चालत नाही फिटनेसही तेवढाच महत्त्वाचा असतो. या युवा क्रिकेटरनं विराट कोहलीचे फिटनेसचे व्हिडिओ पाहून आणि त्याने फिटनेसमुळे कारकिर्द बहरल्याची गोष्ट ऐकली आणि आईच्या मार्गदर्शनाखाली फिटनेसवर लक्षकेंद्रीत केले. हाच त्याच्या करिअरचा टर्निंग पाइंट ठरला.

4 / 8

साई सुदर्शनला सर्वोत्तम क्रिकेटरच्या रुपात घडवण्यात त्याचा आईचा मोलाचा वाटा आहे. क्रिकेटरची आई उषा या राज्यस्तरीय व्हॉलीबॉल खेळाडू आणि प्रशिक्षक राहिल्या आहेत. एवढेच नाही तर त्या स्ट्रेंथ अँड कंडिशनिंग कोचही आहेत.

5 / 8

साईची आई उषा यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की, त्याने विराट कोहलीचे बरेच व्हिडिओ पाहिले. कोहलीने सांगितले की. त्याचा फिटनेस त्याला खूप आत्मविश्वास देतो. त्यानंतर त्याने माझ्या मार्गदर्शनाखाली गंभीरपणे ट्रेनिंग सुरू केले.

6 / 8

२०१९ मध्ये देशांतर्गत क्रिकेटमध्ये साई सुदर्शन संघाबाहेर झाल्यावर आईच्या मार्गदर्शनाखाली त्याने फिटेसवर भर दिला. त्यामुळे त्याचा फिटनेस, स्टॅमिना आणि मैदानावर दीर्घकाळ खेळण्याची क्षमता अधिक मजबूत झाली.

7 / 8

आईशिवाय साईच्या प्रशिक्षणात त्याचे वडीलही तितकेच महत्त्वाचे ठरले. ते राष्ट्रीय स्तरावरील ट्रॅक अ‍ॅथलीट राहिल्यामुळे त्याच्या रनिंग आणि एंड्युरन्स ट्रेनिंगमध्ये सातत्य ठेवले गेले. त्यामुळे त्याची वेगवान धावण्याची क्षमता आणि फिटनेस पातळी उंचावली.

8 / 8

IPL गाजवणारा साई सुदर्शन संयमी, फिट आणि सातत्यपूर्ण कामगिरी करणारा फलंदाज म्हणून ओळखला जातो. त्यामागे त्याच्या आई वडिलांची भूमका महत्त्वपूर्ण राहिली आहे.

टॅग्स :आयपीएल २०२६गुजरात टायटन्स