शहरं
Join us  
Trending Stories
1
खरा मित्र… रशियाने पुन्हा सिद्ध केले, गॅरंटी दिली, “काही होऊ दे, भारताचे नुकसान करणार नाही”
2
परदेश दौरे बंद अन् ताफा अर्ध्यावर; मुख्यमंत्र्यांचे कडक आदेश, मंत्री-अधिकारी एक दिवस बस-मेट्रोने फिरणार
3
PM मोदींच्या आवाहनाचा परिणाम! इंधन बचतीसाठी सुवेंदू अधिकारी यांचाही पुढाकार; DGP ना दिला मोठा आदेश
4
नाशिक कुंभमेळ्याचा 'महाप्लॅन' तयार; प्रत्येक आखाड्याला ५ कोटींचा निधी- एकनाथ शिंदे
5
नरेंद्र मोदींचा कृतीतून संदेश! पंतप्रधानांच्या ताफ्यात फक्त दोन कार, राजधानी दिल्लीतील व्हिडीओ व्हायरल
6
“नेपाळ-बांगलादेशप्रमाणे GenZ ने भारतातही रस्त्यावर उतरायला हवे”; केजरीवाल असे का म्हणाले?
7
PM मोदींचे आवाहन सकारात्मकतेने घेणं गरजेचं, विरोधकांनी थट्टा करू नये- मुख्यमंत्री फडणवीस
8
“जो सामील असेल, त्यावर कारवाई व्हायला हवी”; NEET पेपर लीक प्रकरणी CM फडणवीसांनी केले स्पष्ट
9
Travel : लडाखमध्ये इंजिन बंद असूनही गाड्या आपोआप चढतात डोंगर; या 'मॅग्नेटिक हिल'चं रहस्य काय?
10
विराटकडून प्रेरणा; आईच्या मार्गदर्शनाखाली फिटनेस स्तर उंचावला! IPL गाजवणाऱ्या साईची खास गोष्ट
11
भयंकर! फक्त एका लिंबूसाठी १२ वर्षांच्या मुलाची हत्या; संतप्त जमावाकडून पोलिसांवर दगडफेक
12
PM मोदी म्हणाले, १ वर्ष सोनं खरेदी करू नका; पण चांदीबद्दल काहीच का नाही बोलले? दर वर्षी किती चांदी खरेदी करतो भारत?
13
Top Marathi News Live: नाशिक: भोंदू अशोक खरातविरुद्ध SITकडून दोषारोपपत्र न्यायालयात दाखल
14
इराणचा 'डर्टी बॉम्ब'! एका स्फोटात शहरं होतील ओसाड; अमेरिकन नौदलाला हाय अलर्ट
15
देश मजबूत करू, PM मोदींना साथ देऊ! मुंबईकर आमदारांचा गोवा तेजस एक्स्प्रेसने प्रवास; म्हणाले…
16
STचे प्रवाशांसाठी मोठे पाऊल! १ जूनपासून सर्व स्वच्छतागृहे मोफत; प्रताप सरनाईकांची घोषणा
17
वर्दीतील देवदूत! हायवेवर Heart Attack आलेल्या चालकाचे वाचवले प्राण; इंटरनेटवर कौतुकाचा वर्षाव
18
पती हरवल्याची तक्रार घेऊन पोलीस ठाण्यात आली; तपास सुरू झाला, समोर आले पत्नीचे दोन आशिक अन्.. 
19
“मनमानी भाडेवाढ करणारे खासगी बस वाहतूकदार, अवैध प्रवासी ॲपवर कारवाई करा”: प्रताप सरनाईक
20
Huma Praveen : २ मुलींची जबाबदारी, १० वर्षे नोकरी, ५ वर्षे अपयश; किचनमध्ये केला अभ्यास, सून झाली ऑफिसर
Daily Top 2Weekly Top 5

PM मोदींच्या आवाहनाचा परिणाम! इंधन बचतीसाठी सुवेंदू अधिकारी यांचाही पुढाकार; DGP ना दिला मोठा आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2026 18:04 IST

आगामी काळात इतर मंत्री आणि नेतेही इंधन बचतीसाठी अशाच प्रकारचे उपाय योजण्याची शक्यता आहे....


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, देशातील इंधनाची बचत करण्यासाठी आणि सरकारी खर्च कमी करण्यासाठी केलेल्या आवाहनाचा प्रभाव आता दिसू लागला आहे. पंतप्रधानांनी स्वतःही आपल्या ताफ्यातील वाहनांची संख्या कमी करून एक आदर्श घालून दिला आहे, त्याच धर्तीवर आता पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांनीही आपल्या ताफ्यात मोठी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात त्यांनी राज्याच्या DGP नाही मोठे आदेश दिले आहे. महत्वाचे म्हणजे, आगामी काळात इतर मंत्री आणि नेतेही इंधन बचतीसाठी अशाच प्रकारचे उपाय योजण्याची शक्यता आहे.

काय म्हणाले सुवेंदू अधिकारी? -
पश्चिम बंगाल विधानसभा अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी अर्थात बुधवारी (१३ मे), सुवेंदू अधिकारी यांनी भवानीपूरचे आमदार म्हणून शपथ घेतली. यानंतर बोलतान त्यांनी पंतप्रधानांच्या निर्णयांचे स्वागत केले. अधिकारी म्हणाले, "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशहित आणि जनहितार्थ ही पावले उचलली आहेत." आपल्या ताफ्यातील वाहने अर्धी करण्यासंदर्भात माहिती देताना ते म्हणाले, "मी पोलीस महासंचालकांना (DGP) स्पष्ट आदेश दिले आहेत की, माझ्या ताफ्यात फार वाहने ठेवण्याची आवश्यकता नाही. आजपासूनच मी वाहनांची संख्या कमी केली आहे." तसेच, सर्वांनी पंतप्रधानांच्या या आवाहनाचा विचार करावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

ताफ्यात इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढवण्याचे मोदींचे निर्देश -
पंतप्रधान मोदींनी सरकारी खर्च कमी करण्यासाठी केवळ वाहनांची संख्याच कमीकेली नाही, तर ताफ्यात इलेक्ट्रिक वाहनांचा (EV) अधिक वापर करण्याचे निर्देशही 'एसपीजी'ला (SPG) दिले आहेत. विशेष म्हणजे, यासाठी नवीन वाहने न खरेदी करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. 

पंतप्रधान मोदींनी दिलेल्या निर्देशांची अंमलबजावणी सुरू झाली असून, नुकत्याच झालेल्या गुजरात आणि आसाम दौऱ्यात पंतप्रधानांचा ताफा लहान दिसून आला. सुरक्षा मानकांशी कोणतीही तडजोड न करता 'ब्लू बुक'मधील नियमांनुसारच हा बदल करण्यात आला आहे.

 

English
हिंदी सारांश
Web Title : PM Modi's appeal impacts! Suvendu Adhikari reduces convoy, orders DGP.

Web Summary : Inspired by PM Modi's fuel conservation appeal, Suvendu Adhikari cuts his convoy size and instructs the DGP. He encourages others to follow suit, embracing electric vehicles.
टॅग्स :Suvendu Adhikariसुभेंदु अधिकारीwest bengalपश्चिम बंगालPetrolपेट्रोलDieselडिझेलNarendra Modiनरेंद्र मोदी