शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक संपताच सैन्याकडून बंगालच्या उपसागरात NOTAM जारी; पाकिस्तानशी आहे खास संबंध
2
Crude Oil Price Today: कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ: इराणच्या UAE वरील हल्ल्यानंतर ब्रेंट क्रूड $११४ पार; जाणून घ्या पेट्रोल-डिझेलचे दर
3
आता पुढचे लक्ष्य अखिलेश यादव; ममता बॅनर्जींचा पराभव करणाऱ्या सुवेंदू अधिकारींनी थोपटले दंड
4
Gold Silver Price Today : सोनं महागलं, चांदी झाली स्वस्त; आज काय आहेत नवे दर? पटापट चेक करा
5
कॅनडाचे दोन तुकडे होणार? स्वतंत्र देशासाठी जनमत संग्रहाची मागणी; प्रादेशिक उपेक्षा भोवली
6
LIVE: नसरापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीच्या मुलाचा संताप, काय म्हणाला?
7
Raja Shivaji Box Office: रितेश देशमुख ठरला बॉक्स ऑफिसचा 'राजा'! ४ दिवसांत सिनेमाची किती कोटींची कमाई?
8
'आग लगा दी बस्ती में...!' दोन जुळ्या भावांनी केले एकाच मुलीशी लग्न; नवरीचा चेहरा पाहून नेटकरी संतापले 
9
अवघ्या एका मताने फैसला, या मतदारसंघात रंगली रोमांचक लढत, कुणी मारली बाजी?
10
राज्य महिला आयोग अध्यक्षपदी माजी IPS अधिकारी मीरा बोरवणकर यांची निवड?; जाणून घ्या सत्य
11
राजकारणात 'ब्लॉकबस्टर' एन्ट्री घेणाऱ्या थलापती विजयनं आई वडिलांविरोधात खटला का दाखल केला होता?
12
तो माझा बाप हीच चूक, तिथेच ठेचून मारले पाहिजे; नसरापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीच्या पत्नी-मुलाचा संताप
13
Stock Market Today: रेड झोनमध्ये शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात; 'या' शेअर्समध्ये मोठी घसरण
14
Iran War: Iran War: अमेरिकेचे होर्मुझ सामुद्रधुनीत जहाजांवर हल्ले, पाच जणांचा मृत्यू; दोन जहाजे काढली बाहेर
15
नसरापूरमधील ‘त्या’ बालिकेच्या पोस्टमार्टेम रिपोर्टमधून धक्कादायक माहिती आली समोर, नराधमाने…
16
वैभव सूर्यवंशी ते अक्षत रघुवंशी! IPL पदार्पणात पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकणारे ११ 'धुरंधर'
17
सलमान खान साकारणार 'सुपरहीरो'! राज आणि डीकेच्या आगामी चित्रपटात करीना कपूरची वर्णी?
18
KVP Investment Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम, १ लाखांचे होतील २ लाख; 'इतक्या' महिन्यांमध्ये रक्कम होईल डबल
19
Tarot Card: अंगारकीचा मुहूर्त आणि बाप्पाची कृपा; कोणाचे नशीब बदलणार? वाचा टॅरो भविष्य
20
भाजपानं दिली संधी, आयुष्याला मिळाली कलाटणी; धुणं-भांडी, घरकाम करणाऱ्या कलिता माझी बनल्या आमदार
Daily Top 2Weekly Top 5

“अमेरिकबरोबरच्या व्यापारी करारामुळे भारतातील शेतकरी देशोधडीला लागणार”: हर्षवर्धन सपकाळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2026 00:10 IST

Congress Harshwardhan Sapkal: शिव, शाहु, फुले व आंबेडकरांचा महाराष्ट्र कोणाला बदलू देणार नाही, असा इशारा हर्षवर्धन सपकाळ यांनी दिला.

Congress Harshwardhan Sapkal:काँग्रेस आघाडीचे सरकार असताना शेतकऱ्यांना भरीव आर्थिक मदत केली जात होती. शेतकरी कर्जमाफी करण्यात आली. कोणतीही नैसर्गिक आपत्ती ओढवली तरी काँग्रेस सरकार शेतकऱ्यांच्या मदतीला धावून जात परंतु २०१४ पासून केंद्रात व राज्यात भाजपाची सत्ता आल्यापासून शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम भाजपा सरकारने केले आहे. शेतमालाला भाव नाही. त्याला सर्वस्वी नरेंद्र व देवेंद्र यांचे सरकारच जबाबदार आहे, असा निशाणा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी साधला.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली आज बुलढाणा जिल्ह्यातील मानेगाव ते जळगाव जामोद अशी शिवसन्मान शेतकरी संघर्ष पदयात्रा काढण्यात आली. पदयात्रेच्या सांगता सभेत बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजपा सरकारवर तोफ डागली. शेतकऱ्याच्या सोयाबीन, कापूस, कांदा, तूर, हरभरा, धानाला भाव मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल आहे, एकीकडे आस्मानी संकट तर दुसरीकडे सुलतानी संकटात तो अडकला आहे आणि देशातील व राज्यातील भाजपा सरकार मात्र शेतकऱ्यांसाठी काहीच करत नाही. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ब्लॅकमेल करत आहेत, मोदी अमेरिकेसमोर सरेंडर झाले आहेत. त्यातूनच अमेरिकेबरोबर नरेंद्र मोदींनी दबावाखाली व्यापारी करार केला, त्याचा मोठा परिणाम भारतातील शेतकऱ्यांवर होणार आहे. या करारामुळे भारतातील शेतकऱ्याच्या शेतमालाला भाव मिळणार नाही आणि शेतकरी देशोधडीला लागेल, हे पाप भाजपा सरकारने केले आहे. तर काँग्रेस पक्षाने मात्र शेतकऱ्यासाठी संघर्षाची भूमिका घेतली आहे, बळीराजाचे राज्य आणेपर्यंत काँग्रेस स्वस्थ बसणार नाही, असा निर्धार सपकाळ यांनी केला. 

शिव, शाहु, फुले व आंबेडकरांचा महाराष्ट्र कोणाला बदलू देणार नाही

भाजपा व संघ परिवारातील लोक सातत्याने छत्रपती शिवाजी महाराज यांची बदनामी करत आहेत. छत्रपतींचा इतिहास विकृत करण्याचे काम केले जात आहे गोलवलकर, सावरकर यांच्यापासून भगतसिंह कोश्यारी, राहुल सोलापूरकर, कोरटकर यांच्यासारख्या लोकांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला पण त्यांच्यावर कारवाई मात्र केली नाही. पुण्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यास विरोध करणारे संघ विचाराचे लोक होते, सावित्रीबाईंनाही याच विचाराने विरोध केला. परंतु प्राण गेला तरी शिव, शाहु, फुले व आंबेडकरांचा महाराष्ट्र कोणाला बदलू देणार नाही, असा इशारा सपकाळ यांनी दिला.

दरम्यान, पाच राज्याच्या निवडणुकीचे निकालानंतर भाजपाने महाराष्ट्रात फटाके फोडून विजयाचा जल्लोष केला. राज्यात शेतकरी संकटात आहे, महिलांवर अत्याचार होत असताना फटाके फोडून जल्लोष करताना भाजपाला लाज कशी वाटत नाही, असा संतप्त सवाल करत ममता बॅनर्जींना पराभूत करण्यासाठी भाजपाने सर्वशक्ती पणाला लावली. निवडणूक आयोग व सुप्रीम कोर्टही मैदानात उतरले आणि सर्वांनी मिळून पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांचा पराभव केला, अशी टीका सपकाळ यांनी केली.

 

टॅग्स :congressकाँग्रेसHarshavardhana Sapkalहर्षवर्धन सपकाळFarmerशेतकरी