शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
3
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
4
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
5
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
6
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
7
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
8
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
9
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
10
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
11
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
12
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
13
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
14
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
15
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
16
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
17
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
18
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
19
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
20
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

जलयुक्त शिवार योजना मी खूप आधीच राबवलीय; पंकजा मुंडेंचा पुन्हा टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2019 19:35 IST

पंकजा मुंडेंचं राज्य नेतृत्त्वावर पुन्हा एकदा शरसंधान

मुंबई: ग्रामविकास मंत्री म्हणून काम करताना अनेक अडथळे आले. ते खातं आव्हानात्मक होतं. मात्र साधी आमदार असतानाही मी जनहिताची अनेक कामं केलेली आहेत. जलयुक्त शिवार योजना मी खूपच आधीच राबवली होती, अशा शब्दांमध्ये भाजपा नेत्या पंकजा मुंडेंनी राज्यातील पक्ष नेतृत्त्वाला पुन्हा एकदा टोला लगावला. साधी आमदार असतानाच मी जलयुक्त शिवार योजनेची कामं केली. त्यानंतर सरकारमध्ये गेल्यावरदेखील त्या योजनेवर काम सुरू ठेवलं, असंदेखील त्या पुढे म्हणाल्या.जलसंधारणाची कामं करताना गुजरात पॅटर्न राबवला. त्याचा बराच फायदा झाला. मात्र अनेकदा प्रसिद्धीचे नकारात्मक परिणामदेखील सहन करावे लागतात. मलादेखील याचा अनुभव आला, असं पंकजा म्हणाल्या. मी पक्षावर नाराज नाही, याचाही त्यांनी पुनरुच्चार केला. मी काही दिवसांपूर्वी फेसबुकवर पोस्ट लिहिली, त्यामागे कोणतीही अस्वस्थता नव्हती. मी नाराज नव्हते, अस्वस्थ नव्हते. मात्र फेसबुक पोस्ट लिहिल्यानंतर १ डिसेंबर ते १२ डिसेंबर या कालावधीत ज्या वावड्या उठल्या त्यामुळे मी अस्वस्थ झाले, असं त्यांनी सांगितलं.मी पॉवरगेम खेळते आहे, मला विरोधी पक्षनेते पद हवं आहे, त्यासाठी माझ्याकडून दबाव निर्माण केला जात आहे, अशा चर्चा रंगल्या होत्या. त्या सगळ्या चर्चांना पूर्णविराम देण्यासाठी मी कोअर कमिटीच्या सदस्यत्वाचा राजीनामा देते अशी घोषणा केल्याचं पंकजा यांनी स्पष्ट केलं. व्यक्त होणं आणि पक्षविरोधी असणं या वेगळ्या गोष्टी आहे. माझ्या अस्वस्थतेची कारणं वेगळी आहेत. माझ्यावर अन्याय झाला असं मी कधीही म्हटलेलं नाही. विधानसभा निवडणुकीत झालेला पराभव मी स्वीकारला असून आता शून्यापासून पुन्हा एकदा कामाला सुरुवात करणार आहे, असं म्हणत त्यांनी स्वत:ची पुढील वाटचाल स्पष्ट केली.  

टॅग्स :Pankaja Mundeपंकजा मुंडेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपा