शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
2
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
3
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
4
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
5
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
6
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
7
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
8
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
9
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
10
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
11
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
12
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
13
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
14
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
15
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
16
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
17
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
18
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
19
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
20
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
Daily Top 2Weekly Top 5

भयानक! सांगलीत पत्नीने मुलासोबत मिळून केली पतीची हत्या, रचला अपघाताचा बनाव, पण असं फुटलं बिंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2025 18:31 IST

Sangli Crime News: गेल्या काही दिवसांमध्ये कौटुंबिक वाद विवादातून होणाऱ्या गुन्ह्यांचं प्रमाण सातत्याने वाढत आहे. दरम्यान, सांगली जिल्ह्यातील कवठे महांकाळ तालुक्यात पत्नीने मुलालासोबत घेत आपल्याच पतीला जिवे मारल्याची भयानक घटना घडली आहे.

गेल्या काही दिवसांमध्ये कौटुंबिक वाद विवादातून होणाऱ्या गुन्ह्यांचं प्रमाण सातत्याने वाढत आहे. दरम्यान, सांगली जिल्ह्यातील कवठे महांकाळ तालुक्यात पत्नीने मुलालासोबत घेत आपल्याच पतीला जिवे मारल्याची भयानक घटना घडली आहे. आरोपी पत्नीने पतीवर झालेल्या कर्जाचा डोंगर आणि कर्ज फेडण्यासाठी सातत्याने येत असलेल्या दबावाला कंटाळून तसेच पतीच्या विम्याचे पैसे त्याच्या मृत्यूनंतर आपल्याला मिळावेत या हेतूने हे कृत्य केल्याचे समोर आले आहे. त्यासाठी या महिलेने स्वत:चा मुलगा आणि त्याच्या मित्रांना मदतीला घेतल्याचे तपासामधून समोर आले आहे.

कुटुंबातील नात्यांना कलंक लावणाऱ्या या धक्कादायक घटनेत हत्या झालेल्या व्यक्तीचं नाव बाबुराव पाटील असं आहे. बाबुराव पाटील यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी आरोपी पत्नी वनिता पाटील, मुलगा तेजस पाटील आणि त्याचा मित्र भीमराव हुलवान यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आरोपींनी सुरुवातीला बाबुराव पाटील यांचा मृत्यू हा अपघाती असल्याचे भासवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र पोलिसांनी करून तपास केल्याने आरोपींचं बिंग फुटलं. 

याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार बाबुराव पाटील हे कर्जबाजारी झालेले होते. तसेच त्यांना कर्ज देणारी मंडली त्यांच्याकडे पैशांसाठी तगादा लावत होती. मात्र बाबुराव पाटील यांच्याकडे काही विमा पॉलिसी होत्या. या पॉलिसींचे पैसे मिळवण्यासाठी बाबुराव पाटील यांची हत्या करून त्यांच्या मृत्यूचा बनाव रचण्याचा डाव त्यांच्या पत्नीने आखला. बाबुराव पाटील यांचा अपघातात मृत्यू झाला, असे भासवण्यासाठी आरोपींनी रस्त्याच्या दुभाजकावर डोकं आपटून त्यांची हत्या केली. त्यानंतर पोलिसांनीही सुरुवातीला अपघाती मृत्यूची नोंद केली होती.

मात्र पोलिसांना बाबुराव पाटील यांच्या मृत्यूबाबत संशय आल्याने त्यांनी अधिक तपास केला. तसेच मुलगा तेजस पाटील याला चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीनंतर मृत बाबुराव पाटील यांची पत्नी वनिता पाटील आणि तेजस पाटील याचा मित्र भीमराव हुलवान यांना ताब्यात घेतले. त्यानंतर या तिघांनीही आपण बाबुराव पाटील यांची दुभाजकावर डोकं आपटून हत्या केल्याची कबुली दिली.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSangliसांगलीFamilyपरिवारMaharashtraमहाराष्ट्र