लोकसभेत महिला आरक्षण घटनादुरुस्ती विधेयक नामंजूर झाल्यानंतर मुंबईत भाजपने आयोजित केलेल्या 'जन आक्रोश' महिला संमेलनाच्या वेळी वाहतूक कोंडीचा मोठा फटका सामान्यांना बसला. या कोंडीमुळे त्रस्त झालेल्या एका महिलेने थेट राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांच्यासमोर जाऊन आपला संताप व्यक्त केला. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून, विरोधकांनी यावरून भाजपवर टीकेची झोड उठवली आहे.
नेमके काय घडले?
महिला आरक्षण घटनादुरुस्ती विधेयकाच्या मुद्द्यावरून भाजप-महायुतीतर्फे वरळी डोम येथे जन आक्रोश महिला संमेलन आयोजित करण्यात आले होते. मात्र, या मोर्चासाठी करण्यात आलेल्या गर्दीमुळे मुंबईतील वाहतूक विस्कळीत झाली. तासनतास वाहतूक कोंडीत अडकल्यामुळे एका महिलेचा संयम सुटला आणि ती थेट मोर्चाच्या ठिकाणी पोहोचली. तिथे उपस्थित असलेले मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे धाव घेत, तिने त्यांना खडे बोल सुनावले. "विरोध करायचाच असेल तर मैदानात जाऊन करा, आमच्यासारख्या सामान्यांना वाहतूक कोंडीत का वेठीस धरता?" असा संतप्त सवाल तिने केला. यावेळी महिला आणि पोलिसांमध्येही शाब्दिक वाद झाल्याचे पाहायला मिळाले.
महायुतीची 'एकजूट' विस्कळीत?
एकीकडे वाहतूक कोंडीवरून गोंधळ सुरू असतानाच, दुसरीकडे या मोर्चाकडे शिवसेना महिला आघाडीने पाठ फिरवल्याची चर्चा रंगली आहे. पक्षाकडून आदेश नसल्याचे सांगत शिवसेना महिला आघाडीच्या नेत्या या मोर्चापासून दूर राहिल्या. मुख्यमंत्र्यांनी या मोर्चाला 'महायुतीचा मोर्चा' असल्याचे जाहीर केले होते, मात्र भाजपच्या प्रमुख नेत्यांशिवाय इतर घटक पक्षांची फारशी उपस्थिती नसल्याने राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत.
Web Summary : A woman berated Minister Girish Mahajan after a BJP rally caused massive traffic jams in Mumbai. Frustrated citizens were severely inconvenienced. Shiv Sena's absence from the rally sparks alliance discord rumors.
Web Summary : मुंबई में भाजपा रैली के कारण यातायात जाम से परेशान एक महिला ने मंत्री गिरीश महाजन को फटकार लगाई। शिवसेना की अनुपस्थिति से गठबंधन में कलह की अफवाहें उड़ी।