अमेरिका आणि इराणमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर इस्लामाबादमध्ये दुसऱ्या फेरीची चर्चा (Talks 2.0) होणार आहे. या संदर्भात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सकारात्मक संकेत दिले आहे. दरम्यान त्यांनी इराणच्या जनतेचे कौतुक करत, तेहराणला गंभीर इशाराही दिला आहे. "इराणसोबत लवकरच मोठी डील होईल, मात्र त्यांनी करार केला नाही, तर पुन्हा एकदा बॉम्बफेक सुरू होईल," अशा शब्दांत ट्रम्प यांनी इराणला पुन्हा एकदा थेट धमकीच दिली आहे.
"४७ वर्षांत जे इतर राष्ट्राध्यक्षांनी करायला हवे होते, ते करण्याची संधी आता मला" -सीएनबीसीला (CNBC) दिलेल्या मुलाखतीत ट्रम्प म्हणाले, "स्ट्रेट ऑफ होर्मुज'वर अमेरिकेचे संपूर्ण नियंत्रण आहे. अमेरिका सध्या अत्यंत मजबूत स्थितीत आहे. गेल्या ४७ वर्षांत जे इतर राष्ट्राध्यक्षांनी करायला हवे होते. ते करण्याची संधी आता मला मिळाली आहे." विशेष म्हणजे, मागील काही दिवसांच्या युद्धविरामाचा वापर अमेरिकेने आपली लष्करी ताकद वाढवण्यासाठी केल्याचेही त्यांनी मान्य केले.
इराणच्या जनतेचे कौतुक, चीनवर संशय -अमेरिकेने सोमवारी एका संशयास्पद जहाज पकडले. त्यातून चीनकडून काही अयोग्य गोष्टी पाठवल्या गेल्याचा संशय ट्रम्प यांनी व्यक्त केला. इराणच्या जनतेचे कौतुक करताना ट्रम्प म्हणाले, "इराणचे लोक सक्षम आहेत, त्यांनी समंजसपणा दाखवून करार केला तर इराण पुन्हा समृद्ध देश बनू शकतो." मात्र, एक-दोन दिवसांत तोडगा न निघाल्यास सैन्य कारवाईची स्पष्ट धमकीही त्यांनी दिली. यामुळे आता इस्लामाबादमधील चर्चेकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.
Web Summary : Ahead of Islamabad talks, Trump praised Iranians but warned Tehran. He hinted at a deal but threatened renewed military action if negotiations fail, citing America's strong position and past missed opportunities. He also expressed suspicion about China's involvement, adding pressure on upcoming discussions.
Web Summary : इस्लामाबाद वार्ता से पहले, ट्रंप ने ईरानियों की प्रशंसा की लेकिन तेहरान को चेतावनी दी। उन्होंने एक समझौते का संकेत दिया, लेकिन अगर बातचीत विफल रही तो सैन्य कार्रवाई की धमकी दी, अमेरिका की मजबूत स्थिति और पहले छूटे अवसरों का हवाला दिया। उन्होंने चीन की भागीदारी पर भी संदेह जताया, जिससे आगामी चर्चाओं पर दबाव बढ़ गया।