शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs LSG : वैभव सूर्यवंशीची धमाकेदार खेळी; ‘ध्रुव-तारा’ही चमकला, लखनौसमोर राजस्थानचा रॉयल विजय
2
बांगलादेशात भारतीय उच्चायुक्तालयाच्या अधिकाऱ्याचा मृत्यू, संशयास्पद स्थितीत आढळला मृतदेह
3
मोहम्मद शमीबद्दल प्रश्न विचारताच पंतने दिलं उडवाउडवीचं उत्तर? टॉसवेळी नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
'चिकन नेक'चा ताबा केंद्राला देण्याचा सुवेंदु यांच्या सरकारचा निर्णय, ८ राज्यांना होणार फायदा
5
'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं केली षटकारांची 'बरसात'; युनिव्हर्सल बॉस ख्रिस गेलचा महारेकॉर्ड धोक्यात
6
AI कॅमेरे ठेवणार कॉपीबहाद्दरांवर थेट नजर! यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा निर्णय
7
वैभव सूर्यवंशीचा नवा विक्रम अन् नवे सेलिब्रेशन! ट्रॅविस हेडसह गिलख्रिस्टचा विक्रम मोडला (VIDEO)
8
उल्हासनगर मधील 'लेक व्ह्यू' इमारत पाडकामावेळी कोसळली, गेल्याच आठवड्यात केलेली रिकामी
9
बस्तर नक्षलमुक्त! अमित शाह म्हणाले- "छत्तीसगडच्या जनतेच्या मनातील भीती संपली, याचं श्रेय..."
10
RR vs LSG : वादळी खेळीनंतर कमनशिबी ठरला मिचेल मार्श; सलग दुसऱ्यांदा Run Out झाल्यामुळं हुकलं शतक
11
“काही झाले तरी अमेरिकेला शरण जाणार नाही”; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराणचे सडेतोड उत्तर
12
टेनिस बॉल स्टार कसा झाला टीम इंडियाचा शिलेदार? Prince Yadav च्या अविश्वसनीय प्रवासाची गोष्ट
13
"आंदोलन करा, पण रस्ते अडवून त्रास देऊ नका"; नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावर सुप्रीम कोर्टाचे विधान
14
अनुभवी रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल वनडे संघात का नाहीत? सिलेक्टर अजित आगरकर स्पष्टच बोलला...
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता पुतिन चीन दौऱ्यावर जाणार! शी जिनपिंग यांच्यासंदर्भात केलं मोठं विधान, म्हणाले...
16
Adhik Maas 2026: ‘श्री गजानन विजय’चे पारायण करा; महाराज सदैव साथ देतील, अनंत कृपा-लाभ होईल!
17
"दोन दिवसांत लोक कसे शांत होतात?"; नसरापूर अत्याचार प्रकरणावरून अमित ठाकरेंचा संताप
18
भारतीय शेअर मार्केटला वाईट दिवस! जगातील टॉप १०० कंपन्यांमधून RIL, HDFC आणि TCS बाहेर!
19
टीम इंडियाच्या वरिष्ठ संघात एन्ट्रीसाठी वैभव सूर्यवंशीच्या वाटेत ‘हा’ मोठा अडथळा; जाणून घ्या सविस्तर
20
Twisha Sharma : Video - ट्विशा शर्माचा पती समर्थ सिंह का झाला फरार, कधी येणार समोर? सासू गिरीबाला सिंहचा मोठा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

Anganewadi Jatra 2026: आंगणेवाडी जत्रेला जाताय? कोकण रेल्वेवर सुटणार विशेष ट्रेन, पाहा, वेळापत्रक, तिकीट बुकिंग वेळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2026 16:35 IST

Konkan Railway Special Trains For Anganewadi Yatra 2026: यंदा, ०९ फेब्रुवारी २०२६ रोजी आंगणेवाडीची जत्रा आहे. यावर्षी सुमारे १० लाख भाविक येतील, असे म्हटले जात आहे.

Anganewadi Bharadi Devi Jatra 2026 Special Trains: दक्षिण कोकणची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आंगणेवाडी येथील श्री भराडी देवीची वार्षिक जत्रा ९ फेब्रुवारी २०२६ रोजी होणार आहे. दरवर्षी लाखोंच्या संख्येने भाविक या जत्रेला उपस्थिती दर्शवतात. यावेळी सुमारे दहा लाखांपेक्षा जास्त भाविक यात्रेस उपस्थिती दर्शवतील असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. आंगणेवाडी जत्रेच्या पार्श्वभूमीवर कोकणरेल्वेने विशेष ट्रेन सोडण्याचा निर्णय घेतला आहे. 

आंगणेवाडीत येणारे लाखो भाविक देवीच्या दर्शनाची आस घेऊन येतात. वस्त्रालंकारांनी सजविलेली देवी ‘याचि देही, याचि डोळा’ पाहून जीवनाचे सार्थक झाल्याचा अनुभव भाविकांना या ठिकाणी येतो. कोणत्याही प्रकारची गैरसोय न होता आई भराडी मातेचे दर्शन होण्यासाठी आंगणे कुटुंबीयांसह आंगणेवाडीचे सर्व सदस्य मेहनत घेत असतात. या यात्रोत्सवामध्ये मोठ्या प्रमाणात मुंबईकर चाकरमानी उपस्थिती दर्शवितात. 

कोकण रेल्वेच्या दोन विशेष ट्रेन कधीपासून? पाहा, वेळापत्रक

- कोकण रेल्वेवर ट्रेन क्रमांक ०१००३ लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई ते मडगाव जंक्शन साप्ताहिक विशेष ट्रेन ०८ फेब्रुवारी २०२६ आणि १० फेब्रुवारी २०२६ रोजी लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथून सकाळी ०७ वाजून ५५ वाजता सुटेल. ही गाडी त्याच दिवशी रात्री १० वाजता मडगाव जंक्शन येथे पोहोचेल. 

- ट्रेन क्रमांक ०१००४ मडगाव जंक्शन ते लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई साप्ताहिक विशेष गाडी ०७ फेब्रुवारी २०२६ आणि ०९ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी ०४ वाजून ३० वाजता मडगाव जंक्शनवरून सुटेल. ही गाडी दुसऱ्या दिवशी पहाटे ५ वाजून ५० मिनिटांनी लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथे पोहोचेल.

- ही ट्रेन करमाळी, थिविम, सावंतवाडी रोड, कुडाळ, सिंधुदुर्ग, कणकवली, वैभववाडी रोड, राजापूर रोड, विलवडे, आडवली, रत्नागिरी, संगमेश्वर रोड, चिपळूण, खेड, माणगाव, रोहा, पेण, पनवेल आणि ठाणे स्थानकांवर थांबतील.

- या ट्रेनला एकूण २२ कोच असतील. यामध्ये २० स्लीपर कोच आणि २ एसएलआर कोच असणार आहेत.

- या ट्रेनचे थांबे आणि वेळापत्रकाची सविस्तर माहिती www.enquiry.indianrail.gov.in या संकेतस्थळाला पाहता येणार आहे. तर, ट्रेन क्रमांक ०१००४ साठीचे तिकीट बुकिंग ०४ फेब्रुवारी २०२६ रोजी सुरू होणार आहे.

दरम्यान, आंगणेवाडीची जत्रा ही कोणत्याही तिथीवर अवलंबून नसते. दरवर्षी डिसेंबर महिन्यात आंगणे कुटुंबीय आणि मानकरी भराडी देवीला 'कौल' लावला जातो. देवीचा हुकूम मिळाल्यावरच यात्रेची तारीख निश्चित केली जाते. ३ डिसेंबर रोजी झालेल्या कौलानुसार, ९ फेब्रुवारी २०२६ ही तारीख ठरवण्यात आली. या दीड दिवसांच्या यात्रेत सहभागी होण्यासाठी लाखो भाविक आवर्जून उपस्थिती दर्शवतात.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Anganewadi Jatra: Special Konkan Railway Trains Announced; Check Schedule, Booking Details

Web Summary : Konkan Railway announces special trains for the Anganewadi Jatra on February 9, 2026. Two weekly trains will run between Lokmanya Tilak Terminus and Madgaon. Booking for train number 01004 starts on February 4, 2026. Check timings and stops online.
टॅग्स :Konkan Railwayकोकण रेल्वेkonkanकोकणanganewadi jatraआंगणेवाडी भराडीदेवी जत्राRatnagiriरत्नागिरीsindhudurgसिंधुदुर्गTravel Tipsट्रॅव्हल टिप्सrailwayरेल्वेRailway Passengerरेल्वे प्रवासीpassengerप्रवासीticketतिकिटIndian Railwayभारतीय रेल्वेgoaगोवा