शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

काही गोष्टी मनात ठेवायच्या...'त्या' वादग्रस्त विधानावर अजित पवारांनी कोकाटेंचे कान टोचले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2025 16:15 IST

कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी पंचनाम्यांबाबत केलेल्या वक्तव्याने नवीन वाद निर्माण झाला आहे.

Ajit Pawar On Manikrao Kokate : राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते आणि राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे गेल्या काही दिवसांपासून आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत आहेत. काही दिवसांपूर्वीच कोकाटेंनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरुन केलेल्या वक्तव्याने मोठा वाद झाला होता. आता पुन्हा एकदा कृषीमंत्र्यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे. या वादानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोकाटेंचे कान टोचले हेत.

अजित पवार काय म्हणाले?मीडियाशी बोलताना अजित पवार म्हणाले की, माणिकराव कोकाटे यांना काही दिवसांपूर्वी सांगितले होते की, शेतकऱ्यांच्या बाबतीत अशाप्रकारची वक्तव्ये टाळा. शेतकरी आपला बळीराजा आहे, लाखांचा पोशिंदा आहे. सर्व गोष्टी आम्हालादेखील माहिती आहेत. आम्ही देखील शेतकरी आहेत. पण काही गोष्टी बोलून कशाला दाखवायच्या? त्या मनात ठेवायच्या असतात. पण, कोकाटेंना अजून गोष्टी मनात ठेवायची सवय नाही, त्यामुळे हे होत आहे. पण हे मला महागात पडते आहे, असे अजित पवार यांनी म्हटले.

काय म्हणाले माणिकराव कोकाटे?नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्याच्या नुकसानग्रस्त शेतीची पाहणी करताना कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी वादग्रस्त वक्तव्य केले होते. हार्वेस्टिंग झालेल्या पिकांचे पंचनामे करून काय करणार, ढेकळांचे पंचनामे करायचे का? असा सवाल करून त्यांनी शेतकऱ्यांच्या भावना दुखावल्या. याशिवाय, कृषीमंत्रीपद म्हणजे ओसाड गावची पाटीलकीच आणि मला हे खाते अजितदादांनी दिले, असे ते एका कार्यक्रमात म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यांनी मोठा वाद निर्माण झाला. विरोध यावरुन सरकारवर टीका करत आहेत.

कोकाटेंचे स्पष्टीकरणटीका झाल्यानंतर कोकाटे यांनी त्यावर स्पष्टीकरण दिले. मी असे काही बोललोच नाही, माझ्या बोलण्याचा चुकीचा अर्थ घेतला. सध्या शेतात कपाशी नाही, सोयाबीन नाही. आता फळबागा उभ्या आहेत, अवकाळी पावसामुळे फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ज्या शेतात काहीही नाही, तेथील पंचनामे करुन काय करणार? काही भागात कांद्याच्या पिकाचे नुकसान झाले आहे, जेवढे नुकसान झाले, त्यानुसार पंचनामे करण्यास सांगितले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई दिली जाणार आहे, अशी सारवासारव त्यांनी केली.

कोकाटे यांची यापूर्वीची विधाने१. शेतकरी कर्ज घेतात आणि पाच-दहा वर्षे कर्जमाफीची प्रतीक्षा करतात, नियमित कर्जफेड करणाऱ्यांनी काय करावयाचे, तुम्ही कर्जमाफीच्या पैशांचे काय करता, साखरपुडे, विवाह करीत फिरता.२. आता भिकारीसुद्धा एक रुपया घेत नाही, पण आम्ही शेतकऱ्यांना एक रुपयात पीक विमा देतो.३. स्वीय सहायकांच्या बदल्यांचे अधिकारसुद्धा कृषिमंत्र्यांना नाहीत.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारManikrao Kokateमाणिकराव कोकाटेNCPराष्ट्रवादी काँग्रेसFarmerशेतकरी