शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
3
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
4
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
5
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
6
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
7
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
8
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
9
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
10
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
11
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
12
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
13
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
14
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
15
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
16
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
17
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
18
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
19
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
20
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

लातूर शहरात घर फोडले; दाेन लाखांचा ऐवज लंपास, चाेरट्यांविराेधात गुन्हा

By राजकुमार जोंधळे | Updated: April 18, 2026 06:05 IST

Latur Crime News: लातूर - शहरातील एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील वाल्मीकी नगर भागात एक बंदघर चाेरट्यांनी फाेडल्याची घटना घडली असून, रोख रक्कमेसह सोन्याचे दागिने असा १ लाख ७३ हजार ५५० रुपयांचा मुद्देमाल पळविला आहे.

- राजकुमार जाेंधळेलातूर - शहरातील एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील वाल्मीकी नगर भागात एक बंदघर चाेरट्यांनी फाेडल्याची घटना घडली असून, रोख रक्कमेसह सोन्याचे दागिने असा १ लाख ७३ हजार ५५० रुपयांचा मुद्देमाल पळविला आहे. ही घटना १७ एप्रिल २०२६ रोजी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. याबाबत एमआयडीसी पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पाेलिसांनी सांगितले, फिर्यादी नंदकिशोर द्वारकादास झंवर (वय ४९, रा. तुळशी कुंज, वाल्मीकी नगर, लातूर) हे आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहेत. शुक्रवार, १७ एप्रिल रोजी मध्यरात्री १ ते पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास, अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराच्या लॉकरचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. चोरट्यांनी घरातील ४० हजार रुपये रोख आणि एकूण ३३.०५ ग्रॅम वजनाच्या दोन सोन्याच्या चैन (किंमत १ लाख ३३ हजार ५५० रुपये) असा एकूण १ लाख ७३ हजार ५५० रुपयांचा ऐवज लंपास केला.याबाबत एमआयडीसी पाेलिस ठाण्यात नंदकिशोर झंवर यांनी तक्रार दाखल केली. त्यांच्या जबाबावरून अज्ञात चाेरट्यांविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून, चाेरट्यांचा शाेध सुरु आहे. तपास पोलिस निरीक्षक समाधान चवरे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि. खंदारे हे करीत आहेत.

घरफाेडीच्या घटनामध्ये वाढ; नागरिकांत चिंतेचे वातावरण...लातूरसह जिल्ह्यात घरफोडीच्या घटनात वाढ हाेत असल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. एमआयडीसी पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून, लवकरच चोरट्यांना जेरबंद केले जाईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Latur House Burgled; Two Lakhs Worth Looted, Case Filed

Web Summary : Burglars broke into a house in Latur's MIDC area, stealing ₹1.73 lakh worth of cash and gold jewelry. Police have registered a case and are investigating, amidst rising concerns over increasing burglaries.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीlaturलातूर