शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण युद्ध थांबवायचे की सुरु करायचे...! ट्रम्प यांच्याकडे फक्त ७ दिवस! '१ मे' पूर्वी मोठा निर्णय घेण्याची शक्यता
2
बंगालमध्ये पहिल्या टप्प्यातील १५२ पैकी भाजपा किती जागा जिंकणार? अमित शाहांनी थेट आकडाच सांगितला
3
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
4
'विशाल पाटलांना तिकीट मिळणार नाही हे जयंत पाटील-विश्वजित कदमांना माहीत होतं"; पडळकरांचा मोठा गौप्यस्फोट
5
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
6
अमेरिकेच्या युद्धनौकेवर अचानक माकडाने हल्ला चढवला; होर्मुझच्या मोहिमेवर निघालेले...
7
तुमच्या घरात तुळशीच्या बाजूला ‘या’ गोष्टी ठेवल्या नाही ना? लक्ष्मी नाराज होईल, निघून जाईल!
8
विधानपरिषद निवडणुकीच्या हालचालींना वेग! भाजपने नावे पाठवली, मविआतर्फे उद्धव ठाकरे?
9
"डोनाल्ड ट्रम्प यांनी पदाची प्रतिष्ठा घालवली"; 'भारताला नरक' म्हणताच अमेरिकन खासदार कृष्णमूर्ती भडकले
10
ChatGPT नं एका झटक्यात संपवली १६ अब्ज डॉलरची कंपनी; अवघ्या ४ वर्षात शेअर्समध्ये घसरण, काय घडलं?
11
राजस्थान विधानसभेला बॉम्बने उडवण्याची धमकी, IPL सामन्यापूर्वी जयपूरमध्ये खळबळ 
12
कित्येकींनी साकारल्या राणी सईबाई; पण जिनिलीयाला पाहून चाहते म्हणतात- "सौंदर्य आणि शक्ती..."
13
Sandeepa Virk : प्रेग्नन्सी टेस्ट, ४ महिने तिहार जेल; अभिनेत्रीचा खळबळजनक खुलासा, म्हणाली, "मला रात्रीच्या वेळी..."
14
ही इलेक्ट्रीक एसयुव्ही लाँच काय झाली, ३० मिनिटांत १०,००० बुकिंग; पहा कोणती एवढी कंपनी डिमांडमध्ये आहे...
15
मंत्रिमंडळात एकत्र बसायचे, बाहेर विरोधात कुरघोड्या करायच्या? शिंदे-नाईक वादावर नागरिक नाराज!
16
शाहरुखची मॅनेजर पूजा गुरनानीनं वांद्य्रात खरेदी केले ३ आलिशान फ्लॅट्स; एका चौरस फुटाची किंमत ₹८४,०००
17
'रशियासोबत अमेरिकेनं जे केलं ते आपल्यासोबत..,' म्हणून अनेक देश वाढवताहेत आपला सुवर्ण साठा; प्रकरण काय?
18
शेजारणीकडे दिली घराची चावी अन् तिजोरीच गायब, ३४ लाख रुपयांचे दागिने चोरीला!
19
९ तासांत २ बलात्कार अन् १ हत्या, आधी मित्राच्या बायकोवर बळजबरी मग...; आरोपी राहुलचं सत्य उघड
20
केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते ‘भारत टॅक्सी’ ॲपचा शुभारंभ
Daily Top 2Weekly Top 5

राजेश लाटकर घेणार उद्धव ठाकरेंची भेट! कोल्हापुरात राजकीय घडामोडींना वेग

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2024 12:58 IST

Maharashtra Assembly Election 2024 : अपक्ष उमेदवार राजेश लाटकर हे उद्धव ठाकरे यांचीही भेट घेणार आहेत. 

Maharashtra Assembly Election 2024 : कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर मतदारसंघातील काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार मधुरिमाराजे छत्रपती यांनी अनपेक्षितपणे  निवडणूक लढण्यापूर्वीच रिंगणातून माघार घेऊन सर्वांना धक्का दिला. मधुरिमाराजे छत्रपती यांनी माघार घेतल्यानंतर  काँग्रेस आता अपक्ष उमेदवार राजेश लाटकर यांना पाठिंबा देण्याची शक्यता वर्तविली जात आहे. तसेच, राजेश लाटकर हे उद्धव ठाकरे यांचीही भेट घेणार आहेत. 

उद्धव ठाकरे आज कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. यादरम्यान, कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार राजेश लाटकर उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. दुपारी दोन वाजता होणार भेट आहे. राजेश लाटकर कोल्हापूर उत्तर मध्ये शिवसेना ठाकरे गटाचा पाठिंबा मिळावा, यासाठी उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत, अशी माहिती आहे.

मी काँग्रेसच्या विचारांचा कार्यकर्ता आहे. सतेज पाटील माझे नेते होते, आहेत आणि राहणार आहेत, अशा शब्दांत राजेश लाटकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तसेच, शाहू महाराज यांनी मला न्याय देण्याचा प्रयत्न केला, मी त्यांचा आभारी आहे. सतेज पाटील हे माझे काल देखील नेते होते आज देखील नेते आहेत आणि उद्या देखील नेते राहतील. मला काँग्रेसच्या वतीने पाठिंबा देण्यासाठी त्यांना भेटणार आहे, असे राजेश लाटकर यांनी सांगितले.

दरम्यान, काँग्रेसने आपली उमेदवारी पुरस्कृत करावी, अशी मागणी राजेश लाटकर यांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि विधान परिषदेचे गटनेते सतेज पाटील यांच्याकडे लेखी पत्राद्वारे केली आहे. याबाबत सतेज पाटील यांनी  आपण आज, मंगळवारी निर्णय घेऊ अशी भूमिका मांडली आहे. त्यामुळे आता या मतदारसंघात काँगेस राजेश लाटकर देणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.  

लाटकरांचे तिकीट कापून मधुरिमाराजेंना संधीकोल्हापूर उत्तर या मतदारसंघातून काँग्रेसने आधी राजेश लाटकर यांना तिकीट दिले होते. मात्र काही नगरसेवकांनी राजेश लाटकर यांच्या उमेदवारीला विरोध दर्शविला.तसेच, यासंबंधीचे पत्र या नगरसेवकांनी  काँग्रेस नेते सतेज पाटील यांना दिले होते. त्यानंतर सतेज पाटील यांनी पक्षश्रेष्टींसोबत चर्चा करून राजेश लाटकर यांची उमेदवारी रद्द करून मधुरिमाराजे छत्रपती यांना तिकीट दिले. मात्र, मधुरिमाराजे छत्रपती यांनी आपली उमेदवारी मागे घेतली. त्यामुळे आता सतेत पाटील यांच्यावर नामुष्की ओढवली आहे.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४kolhapur-north-acकोल्हापूर उत्तरkolhapurकोल्हापूरUddhav Thackerayउद्धव ठाकरेcongressकाँग्रेसSatej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटील