शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
3
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
4
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
5
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
6
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
7
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
8
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
9
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
10
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
11
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
12
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
13
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
14
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
15
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
16
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
17
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
18
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
19
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
20
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

Hatkanangale Lok Sabha Result 2024: हातकणंगलेत ट्विस्ट; धैर्यशील माने आघाडीवर, समर्थकांचा जल्लोष सुरु

By पोपट केशव पवार | Updated: June 4, 2024 15:55 IST

Hatkanangale Lok Sabha Result 2024: हातकणंगलेत ट्विस्ट, धैर्यशील माने दोन हजार मतांनी आघाडीवर

कोल्हापूर : हातकणंगले मतदारसंघात मोठी ट्विस्ट दिसून आला. सुरुवातीपासून अतितटीच्या लढतीत महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील आघाडीवर असतानाच १९ व्या फेरीत शिवसेना शिंदे गटाचे धैर्यशील माने यांनी आघाडी घेतली आहे. १८ फेरीअखेर धैर्यशील माने यांनी १२ हजार ११८ मतांनी आघाडी घेतली. माने यांनी आघाडी घेताच समर्थकांनी जल्लोषाला सुरुवात केली.सुरुवातीच्या काही फेऱ्यांमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील-सरुडकर हे अल्पशा मतांनी आघाडीवर होते. या दोन्ही उमेदवारांमध्ये कॉटे की टक्कर पाहायला मिळत आहे. मात्र, आता र्धेर्यशील माने यांनी दोन हजारांवर आघाडी घेतली आहे. अपेक्षेप्रमाणे मतमोजणीत कमालीची चुरस दिसत आहे. प्रत्येक फेरीत सत्यजीत पाटील आणि धैर्यशील माने  यांच्यात मताधिक्य कमी-जास्त होत आहे. या लढतीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार राजू शेट्टी पिछाडीवर पडले आहेत.निवडणूक निकालाच्या आधीच राजू शेट्टी यांनी आपणच विजयी होणार असल्याचा दावा केला होता. मात्र मतमोजणीत राजू शेट्टी तिसऱ्या क्रमांकावर असल्याचे दिसते. हातकणंगले मतदारसंघात एेनवेळेस शिवसेना उद्धव ठाकरेंनी सत्यजित पाटलांनी निवडणूक रिंगणात उतरवल्याने रंगत आली होती. कोल्हापूर जिल्ह्यातील दोन्ही मतदारसंघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तळ ठोकल्याने साऱ्या राज्याचे लक्ष या निकालाकडे लागून राहिले होते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरkolhapur-pcकोल्हापूरhatkanangle-pcहातकणंगलेlok sabha election 2024 Resultलोकसभा निवडणूक २०२४ निकालlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४dhairyasheel maneधैर्यशील मानेSatyajit Patilसत्यजित पाटीलRaju Shettyराजू शेट्टी