हसन मुश्रीफ हे ताकतवान नेते, त्यांनी माझा पूर्व इतिहास काढावाच; आमदार शिवाजीराव पाटील यांचे आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2026 11:53 IST2026-05-04T11:52:25+5:302026-05-04T11:53:10+5:30

डोंगळे यांची दुबईत गुंतवणूक; आबाजी नव्हे ते तर'गोकुळ'चे 'बाबाजी' 

Hasan Mushrif is a powerful leader, he must clear my past history; MLA Shivajirao Patil's challenge | हसन मुश्रीफ हे ताकतवान नेते, त्यांनी माझा पूर्व इतिहास काढावाच; आमदार शिवाजीराव पाटील यांचे आव्हान

हसन मुश्रीफ हे ताकतवान नेते, त्यांनी माझा पूर्व इतिहास काढावाच; आमदार शिवाजीराव पाटील यांचे आव्हान

कोल्हापूर : हसन मुश्रीफ हे ताकदवान नेते आहेत. 'गोकुळ' 'केडीसीसी' सह अनेक कारखाने त्यांच्या ताब्यात असल्याने निवडणुका कशा जिंकायच्या हे त्यांना चांगले माहिती आहे. त्यातूनच गुलाल घेऊनच आपण उत्तर देऊ' असे ते म्हटले असावेत. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे माझ्याबद्दल काय तक्रार करायची ती करू देत, माझा पूर्व इतिहास त्यांनी काढावाच, असे आव्हान आमदार शिवाजीराव पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना रविवारी दिले.

ते म्हणाले, माझा पूर्व इतिहास काढण्याची धमकी मुश्रीफ देत आहेत. मी कोणाला फसविलेले नाही. जनतेचा गल्ला लुटलेला नाही, त्यामुळे मला काळजी करायची गरज नाही. मुश्रीफ महायुतीचे नेते आहेत, याबद्दल मला बोलायचे नाही. फक्त 'गोकुळ'च्या भ्रष्ट कारभाराबद्दल वस्तुस्थिती मांडायची होती. प्रशासक नियुक्त करून सखोल चौकशी होऊ दे, त्यातून दूध का दूध आणि पाणी पाणी होऊ दे. प्रशासक आल्यानंतर सत्य समोर येईल. अरुण डोंगळे व विश्वास पाटील (आबाजी) हे ३०-४० वर्षे संचालक आहेत. डोंगळे यांनी दुबईत गुंतवणूक केली आहे. आबाजी तर 'गोकुळ'चे बाबाजी आहेत. त्यांची ईडीकडून चौकशी होईलच. प्रशासक आल्यानंतर 'गोकुळ'चे लोणी कोण खात होते? हे दूध उत्पादकांना समजेल.

त्याच त्याच संचालकांची मक्तेदारी का..? 

गोकुळच्या इतिहासात त्याच त्याच संचालकांची मक्तेदारी असल्यासारखे तेथे तळ ठोकून आहेत. सामान्य कुटुंबातील कार्यकर्ता तेथे का जात नाही त्यासाठी माझी लढाई असल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले.

चंदगडमध्ये त्यांनी आपली ताकद दाखवली 

हसन मुश्रीफ हे 40-45 वर्ष सक्रिय राजकारणात आहेत. ते राष्ट्रवादीचे मोठे नेते आहेत. चंदगड मतदारसंघात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसला एकत्र आणत आपली ताकद दाखवून दिल्याचा टोलाही आमदार पाटील यांनी लगावला.

तुकाराम मुंढेंसाठी आग्रह 

गोकुळचे पारदर्शक चौकशी व्हावी यासाठी तुकाराम मुंढे यांच्यासारखा अधिकारी तेथे प्रशासक म्हणून येणे गरजेचे आहे. त्यांच्या नियुक्तीसाठी आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे प्रयत्नशील असल्याचेही आमदार पाटील यांनी सांगितले.

Web Title : विधायक पाटिल ने मुश्रीफ को अपने अतीत के सौदे उजागर करने की चुनौती दी।

Web Summary : विधायक शिवाजीराव पाटिल ने हसन मुश्रीफ को अपना अतीत उजागर करने की चुनौती दी। पाटिल ने गोकुल डेयरी के मामलों की जांच का स्वागत किया। उन्होंने कुछ निदेशकों के प्रभुत्व का आरोप लगाया, पारदर्शिता की मांग की, और निष्पक्ष जांच के लिए तुकाराम मुंडे को प्रशासक के रूप में सुझाया।

Web Title : MLA Patil dares Mushrif to reveal his past dealings.

Web Summary : MLA Shivajirao Patil challenged Hasan Mushrif to reveal his past. Patil welcomes inquiry into Gokul dairy's affairs. He alleges dominance of certain directors, demands transparency, and suggests Tukaram Mundhe as administrator for fair probe.