शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
2
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
3
ब्रेक फेल, नियंत्रण सुटले, भरधाव ट्रकची बोलेरोसह दोन वाहनांना धडक, ११ जण जिवंत जळाले   
4
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
5
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
6
महापालिका अधिकारी कैलास गायकवाड यांच्या घरात रात्रभर झाडाझडती, पोलिसांना सापडलं मोठं घबाड
7
'...तर कॉन्सर्टला परवानगी नाहीच' पोलीस आयुक्तांची भूमिका; कठोर कारवाईचे आदेश
8
१ मे पासून ऑनलाइन गेमिंग्सबाबत नवे नियम; सरकारचा मोठा निर्णय, 'या' गेम्सवर बंदी तर इतरांना सूट
9
Bombay High Court: ‘त्या’ दोन महिलांना गर्भधारणेसाठी वैद्यकीय चाचण्यांना मुभा- मुंबई उच्च न्यायालय
10
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
11
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
12
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
13
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
14
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
15
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
16
दातात पकडून चिमुकल्यावर अघोरी उपचार, अकोल्यातील धक्कादायक प्रकार, व्हिडीओ व्हायरल
17
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
18
वि. स. खांडेकर ते सिमोन डी बोवॉयर... सगळे हुतात्मा चौकातील फुटपाथवर..!
19
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
20
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
Daily Top 2Weekly Top 5

भाजप प्रवेशानंतर कोल्हापूरकडे परतताना अपघात, तिघे गंभीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2025 13:37 IST

रस्त्यावर ऑईल पडल्याने चालकाचा ताबा सुटून कार्यकर्त्यांच्या टेम्पो ट्रॅव्हलरचा अपघात झाला

कोल्हापूर : भाजपमध्ये प्रवेश घेऊन मुंबईहून कोल्हापूरकडे परतणाऱ्या कार्यकर्त्यांच्या टेम्पो ट्रॅव्हलरचा अपघात मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर झाल्याने तिघेजण गंभीर जखमी झाले. जखमीवर मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. उर्वरित सहा जखमीची प्रकृती चांगली असून ते घरी आहेत. नगरसेवक आणि भाजप प्रवेश केलेले दिलीप पोवार यांनी त्यास दुजोरा दिला.नियाकत नालबंद, अमजद पठाण, परशुराम हेगडे (रा. कनाननगर, कोल्हापूर) यांच्यासह २० कार्यकर्ते १५ जुलैला मुंबईतील भाजप प्रवेशाचा कार्यक्रम संपवून कोल्हापूरच्या दिशेने निघाले. त्यावेळी राष्ट्रीय महामार्गावर पूर्वी अपघात झाल्याने ऑईल पडल्याने चालकाचा ताबा सुटून या कार्यकर्त्यांच्या टेम्पो ट्रॅव्हलरचा अपघात झाला. त्यात नऊजण जखमी झाले. त्यातील तिघे गंभीर जखमी आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी मदतीसाठी वैद्यकीय सेवा यंत्रणा गतिमान केली. व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे अपघातग्रस्तांशी संवाद साधून दिलासा दिला.