शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: जीव घेतल्यानंतरही बालिकेवर अत्याचार, शिये प्रकरणातील संशयितांचा क्रूरपणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2024 13:17 IST

दुसऱ्या दिवशी जाऊन मृतदेहाची पाहणी, संशयिताची पोलिस कोठडीत रवानगी

कोल्हापूर : शिये (ता. करवीर) येथील शेतात नेऊन बालिकेवर लैंगिक अत्याचार आणि खून करणाऱ्या संशयितांनी दुसऱ्या दिवशी सकाळी जाऊन मृतदेहाची पाहणी केली. ठार मारल्यानंतरही नराधमांनी तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची माहिती तपासात समोर आली आहे. अटकेतील दोन्ही संशयितांची 'क्राईम हिस्ट्री' जाणून घेण्यासाठी पोलिसांचे पथक लवकरच बिहारला जाणार आहे. दरम्यान, दुसरा संशयित राहुल कुमार सिंग (वय १९, रा. बिहार) याची पोलिस कोठडीत रवानगी झाली.पीडित बालिकेचा नातेवाइक दिनेश साहा आणि त्याचा साथीदार राहुल कुमार सिंग हे दोघे गेल्या काही दिवसांपासून पीडित मुलीला मोबाइलवर अश्लील चित्रफिती दाखवत होते. ती या दोघांपासून लांब राहण्याचा प्रयत्न करीत असल्याने दोघांनी तिला मारहाण केली. बुधवारी (दि. २१) दुपारी नारळ काढण्याच्या बहाण्याने संशयित आरोपी पीडित मुलीला घरातून घेऊन गेले. शेतात निर्जन ठिकाणी नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केले.त्यानंतर गळा आवळून आणि लाथा-बुक्क्या मारून तिला ठार मारले. किळसवाणा आणि चीड आणणारा प्रकार म्हणजे बालिका ठार झाल्यानंतरही तिच्यावर अत्याचार केले. घटनेनंतर घरी परतलेले दोघे संशयित रात्रपाळीच्या कामावर गेले. त्यानंतर सकाळी परत आल्यानंतर दोघांनी घटनास्थळी जाऊन मृतदेहाची पाहणी केली, अशी माहिती चौकशीत समोर आली. क्राईम हिस्ट्रीचा शोध सुरूया गुन्ह्यातील दुसरा संशयित राहुल कुमार सिंग हा १५ दिवसांपूर्वीच शिये येथे आला. दिनेश साहा याचा तो मित्र आहे. गुन्ह्याची पद्धत पाहता या दोघांवर आणखी काही गुन्हे असण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवली जात आहे. दोघांची क्राईम हिस्ट्री शोधण्यासाठी पोलिसांचे एक पथक बिहारला रवाना होणार आहे.

नशेत केला गुन्हा?बालिकेवर लैंगिक अत्याचार करून तिचा खून करणे आणि पुन्हा तिचा मृतदेह पाहण्यासाठी जाणारे दोन्ही संशयित नशेखोर असावेत, असा पोलिसांना संशय आहे. गुन्हा करताना ते नशेत होते काय? याची माहिती घेण्याचे काम सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस