शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! मुंबईच्या जे. जे. रूग्णालयात निवासी डॉक्टरने उचललं टोकाचं पाऊल, नेमकं असं काय घडलं?
2
सुनेत्रा पवार गुवाहाटीत; कामाख्या देवीचे दर्शन, अजितदादांचा वारसा देशभरात नेण्याचा निर्धार
3
सांगली हादरली! मंदिराची भिंत कोसळून सहा ठार, ८ जण जखमी; मृतांमध्ये दोन मुलांचा समावेश
4
टीम इंडिया T20 पाठोपाठ वनडे मध्येही नंबर १ ! पाकिस्तानला मोठा धक्का, कोण कुठल्या स्थानी?
5
सुनेचे तोकडे कपडे अन् 'रीलबाजी'! सासू-सासऱ्यांनी उचललं टोकाचं पाऊल; वाचा धक्कादायक कारण
6
२ राजयोगत अपरा एकादशी २०२६: ७ राशींना अनुकूल काळ, अडचणी संपतील; चांगला लाभ, भरघोस भरभराट!
7
IPL वंडर बॉय वैभव सूर्यवंशीचा ‘मास्टरशेफ’ अवतार; किचनमधील व्हिडिओ व्हायरल
8
Petrol Diesel Rate: पेट्रोल-डिझेल महागणार, सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसणार? केंद्र सरकारचे मोठे संकेत
9
Vistadome सुपरहिट, प्रवाशांचा १०० टक्के प्रतिसाद; ‘इतके’ कोटी कमावले, प्रवासाचा सुखद अनुभव!
10
WTC 2025-27 Points Table : बांगलादेशचा पाकिस्तानवर ऐतिहासिक विजय! टीम इंडिया फायद्यात; ते कसं?
11
सावधान! ९९% लोकांना टरबूज खाण्याची योग्य पद्धतच माहीत नाही; डॉक्टरांनी सांगितलेल्या 'या' ३ चुका पडू शकतात महागात
12
मध्यमवर्ग त्याग करायला तयार आहेच, पण डझनभर गाड्यांचा ताफा...; जयंत पाटील यांची टिप्पणी
13
“२२ लाख विद्यार्थ्यांची स्वप्ने धुळीला मिळाली”; NEET 2026 परीक्षा रद्द, राहुल गांधी संतापले
14
Top Marathi News LIVE Updates: सोलापूर शहरातील विविध भागात पाऊस सुरू, अचानक आलेल्या पावसानं धावपळ
15
“NEET पेपर लीक करणारे मोकाट, सरकारला एक परीक्षाही घेता येत नाही का?”: हर्षवर्धन सपकाळ
16
"सौंदर्यासाठी नाही, तर मी पैशांसाठी तुझ्याशी लग्न केलं"; नवरा झाला हैवान, बायकोचा घेतला जीव
17
मुख्यमंत्री विजय यांचा मोठा निर्णय! आपल्या खास ज्योतिष्याला बनवलं थेट 'OSD'
18
मूर्ती लहान, कीर्ती महान! ३ वर्षे ११ महिन्यांच्या जान्हवी सोनीची कमाल; नावावर ३ इंटरनॅशनल रेकॉर्ड
19
शहरातल्या गजबजाटापासून दूर थंड हवा, झोपाळ्यावर डुलकी; महापौर रितू तावडे यांचा गावी दौरा
20
संतापजनक! पिझ्झा तयार करताना थुंकायचा; किळसवाणा Video व्हायरल, लोकांनी बेदम चोपलं
Daily Top 2Weekly Top 5

रंकाळ्यातील ५ कोटींच्या कारंजाने पर्यटक होणार चिंब, 'लाईट इफेक्ट'मध्ये साकारणार कोल्हापूरचे प्रतिबिंब!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2026 17:39 IST

जूनपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन

कोल्हापूर : ऐतिहासिक रंकाळा तलावात अत्याधुनिक लाइट इफेक्टसह म्युझिक फाउंटनचे (संगीत कारंजा) काम सुरू करण्यात आले आहे. राज्य सरकारच्या नगरविकास विभागाने यासाठी ५ कोटी रुपयांचा निधी २०२४ मध्ये मंजूर केला होता. मात्र, अनेक कारणांनी हे काम रखडले होते. अखेर या कामाला दोन दिवसांपासून सुरुवात करण्यात आली आहे. जूनपर्यंत हे काम पूर्ण करण्यात येणार आहे.

रंकाळ्याला मोठा ऐतिहासिक वारसा लाभला असून कोल्हापुरात येणारा प्रत्येक नागरिक रंकाळ्यावर फेरफटका मारल्याशिवाय परतत नाही. त्यामुळे शासनाकडून रंकाळ्याच्या सुशोभिकरणासाठी आणि संवर्धन करण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. त्याअंतर्गतच परदेशातील धर्तीवर हे म्युझिक फाउंटन उभारण्यात येत आहे. सध्या याचा सांगाडा उभारण्याचे काम सुरू आहे. तो उभारल्यानंतर रंकाळ्याच्या मध्यभागी तो ठेवण्यात येईल. विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर जूनमध्ये हे म्युझिक फाउंटन सुरू करण्यात येईल.

सुवर्ण इतिहासाची छाया प्रतिबिंबित होणार

रंकाळा तलावाच्या मध्यभागी ५० मीटर परिघाची आकर्षक विद्युत रोशणाई आणि त्यासोबतच ध्वनी प्रणाली असणारे पाण्याचे कारंजे बसवण्यात येणार आहेत. यामध्ये विविध आकाराचे संगीत फवाऱ्यासह विशेषतः कोल्हापूरच्या सुवर्ण इतिहासाचे छाया प्रतिबिंब या संगीताच्या माध्यमातून दाखवण्यात येणार आहे.

असे असेल म्युझिक फाउंटन

म्युझिक फाउंटनच्या कारंजाची लांबी २४ मीटर इतकी असणार असून, १५ मीटरपर्यंत कारंजाचे पाणी उडेल. या कारंजाच्या माध्यमातून कोल्हापूरचा ऐतिहासिक ठेवा प्रतिबिंबित होणार आहे. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज, अंबाबाई मंदिर, छत्रपती शाहू महाराज यांच्यासह देवदेवता व महामानवांच्या प्रतिमा लाइट इफेक्टच्या माध्यमातून साकारल्या जातील.

पर्यटनात भर

रंकाळा टॉवरपासून जवळच हे म्युझिक फाउंटन उभारण्यात येत आहे. या म्युझिक फाउंटनमुळे कोल्हापूरच्या पर्यटनात भर पडणार आहे. रंकाळ्यावर रोज हजारो पर्यटक भेट देतात. विद्युत रोशणाईने रंकाळा उजाळला आहेच. मात्र, म्युझिक फाउंटनमुळे त्यात आणखी भर पडणार आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur's Rankala Lake to get ₹5Cr musical fountain, tourist attraction.

Web Summary : Rankala Lake's ₹5Cr musical fountain project is underway, promising light effects showcasing Kolhapur's history. Expected to be complete by June, it will feature water displays, sound systems, and imagery of Shivaji Maharaj and Shahu Maharaj, enhancing tourism.