शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
4
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
5
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
6
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
7
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
8
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
9
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
10
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
11
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
12
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
13
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
14
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
15
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
16
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
17
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
18
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
19
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
20
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाचं धक्कातंत्र सुरूच...! श्रीकांत शिंदेंच्या मतदारसंघातील शिंदेसेनेचे बडे नेते लावले गळाला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2025 09:24 IST

कनाथ शिंदे यांचे सुपुत्र असलेले खासदार श्रीकांत शिंदे यांच्या मतदारसंघात शिंदेसेनेतील नेत्यांना भाजपात घेण्याचा कार्यक्रम सुरूच आहे

डोंबिवली - मागील काही महिन्यांपासून भाजपा आणि शिंदेसेना यांच्यातील वाद वाढला आहे. त्यात भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी एकनाथ शिंदे यांना धक्का देणे सुरूच ठेवले आहे. नुकतेच शिंदेसेनेचे स्थानिक नेते अभिजीत थरवळ यांच्यासह अनेक युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनी भाजपात प्रवेश केला आहे. अभिजीत हे शिंदेसेनेचे ज्येष्ठ नेते सदानंद थरवळ यांचा मुलगा आहे. मागील १५ वर्षापासून अभिजीत थरवळ राजकारणात सक्रीय असून ते युवासेनेचे पदाधिकारी होते. कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाकडून पक्षप्रवेशाचा धडाका सुरू आहे. त्यात विरोधकांसह मित्रपक्ष असलेल्या शिंदेसेनेलाही भाजपाने धक्का दिला आहे.

एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र असलेले खासदार श्रीकांत शिंदे यांच्या मतदारसंघात शिंदेसेनेतील नेत्यांना भाजपात घेण्याचा कार्यक्रम सुरू आहे. या पक्षप्रवेशावरून काही दिवसांपूर्वी शिंदे नाराज झाले होते. त्यांची ही नाराजी उघडपणे दिसली जेव्हा शिंदेसेनेच्या मंत्र्‍यांनी कॅबिनेट बैठकीला गैरहजेरी लावली. फडणवीसांच्या नेतृत्वातील या बैठकीकडे शिंदेसेनेच्या मंत्र्‍यांनी पाठ फिरवल्याने नाराजीची चर्चा सुरू झाली. त्यानंतर शिंदेसेनेच्या मंत्र्‍यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीत पक्षप्रवेशाबाबत नाराजी व्यक्त केली. परंतु सुरुवात तुम्ही केली होती, आम्ही केले तर चालणार नाही असं होणार नाही असं मुख्यमंत्र्‍यांनी बजावले होते.

या भेटीनंतर शिंदेसेनेच्या मंत्र्‍यांनी माध्यमासमोर येत यापुढे दोन्ही पक्षात एकमेकांचे नेते घ्यायचे नाहीत असं ठरल्याचे सांगितले. परंतु त्यानंतरही भाजपा आणि शिंदेसेनेत कुरघोडी सुरू आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्ली गाठत अमित शाह यांची भेट घेतली. या भेटीत रवींद्र चव्हाण यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली. त्यानंतर मालवण येथे शिंदेसेनेचे आमदार निलेश राणे यांनी भाजपा कार्यकर्त्याच्या घरी पैशाची बॅग पकडून दिली तेव्हा थेट रवींद्र चव्हाणांवर त्यांनी हल्लाबोल केला. मग चव्हाणांनीही त्यावर प्रतिक्रिया देताना मला २ तारखेपर्यंत युती टिकवायची आहे असं विधान केले त्यामुळे अनेकांच्या भूवया उंचावल्या होत्या. 

शिंदेसेनेतील नेत्यांचा भाजपात प्रवेश

दरम्यान, शिंदेसेनेचे अभिजीत थरवळ, प्रशांत सावंत, अभिजीत विचारे, लक्ष्मीकांत अंबरकर, प्रदीप चव्हाण, विनय घरत, मयूर पाटील, सर्वेश पाटील, योगेश शिंदे, ओमकार शिर्के, प्रतीक सोनी, ओमकार देवधर, प्रिन्स गुप्ता, दर्शन मकवाना, राहुल म्हात्रे, गोपाळ देशपांडे, विरम वोरा, नील प्रजापती, कौशभ मक्वाना, प्रितेश भोसले, प्रजित अमीन, सर्वेश साईल यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते भाजपात सहभागी झाले. त्याआधी बुधवारी सकाळी कल्याण ग्रामीणचे शिंदेसेनेचे उपतालुका प्रमुख विकास देसले यांनीही भाजपात प्रवेश केला.  

 

English
हिंदी सारांश
Web Title : BJP Continues Power Play: Shinde Faction Leaders Join BJP

Web Summary : BJP is inducting leaders from Shinde's Shiv Sena in Kalyan-Dombivli, causing tension. Despite reconciliation talks, the poaching continues, with numerous Sena members joining BJP, signaling ongoing power struggles ahead of local elections.
टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेShiv SenaशिवसेनाBJPभाजपाRavindra Chavanरविंद्र चव्हाण