शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
3
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
4
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
5
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
6
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
7
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
8
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
9
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
10
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
11
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
12
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
13
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
14
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
15
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
16
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
17
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
18
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
19
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
20
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ स्थापन करून हजार कोटींची अर्थसंकल्पात तरतूद करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2021 20:51 IST

ब्राह्मण समाज बांधवांतर्फे उपोषण : जिल्हाधिकाऱ्यांशी केली चर्चा

जळगाव : समाजातील तरुणांना शैक्षणिक, व्यावसायिक तसेच रुग्णांना वैद्यकीय मदत मिळविण्यासाठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ स्थापन करून महामंडळास एक हजार कोटी रुपयांची महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात तरतूद करण्यासह इतर मागण्यांसाठी ब्रह्मश्री बहुउद्देशीय संस्था व बहुभाषिक ब्राह्मण संघासह इतर संघटनांतर्फे मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले.ब्राह्मण समाजाच्या प्रलंबित मागण्यांसाठी मंगळवारी ब्रह्मश्री बहुद्देशीय संस्था व बहुभाषिक ब्राह्मण संघाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत लाक्षणिक उपोषण करण्यात आले. दुपारी ४ वाजता जिल्हाधिकारी यांची ब्राह्मण समाजाच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन निवेदन दिले. त्यावेळी प्रलंबित मागण्यांविषयी चर्चा करण्यात आली. त्यापूर्वी आमदार सुरेश भोळे व महापौर भारती सोनवणे, कैलास सोनवणे यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन मागण्या जाणून घेतल्या होत्या.अशा आहेत मागण्याब्राह्मण समाजाचे आर्थिक सर्वेक्षण करण्यात यावे, प्रत्येक जिल्ह्यात मुला-मुलींसाठी स्वतंत्र वसतिगृह स्थापन करण्यात यावे, केजी टू पीजी शिक्षण मोफत करण्यात यावे, ब्राह्मण समाजाबाबत व महापुरुषांबद्दल आक्षेपार्ह लिखाण व वक्तव्य करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यासाठी अ‍ॅट्रॉसिटीप्रमाणे कायदा पारित करण्यात यावा, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना भारतरत्नने सन्मानित करण्यात यावे, पुरोहित समाजाला पाच हजार रुपये मानधन सुरू करण्यात यावे, वंश परंपरेने चालत असलेल्या मंदिरांचे सर्व अधिकार पूर्ववत पुजाऱ्यांकडे देण्यात यावे, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.यांचा होता उपोषणात सहभागउपोषणात बहुभाषिक ब्राह्मण संघाचे अध्यक्ष अशोक वाघ, संजय व्यास, सुरेंद्र मिश्रा, लेखराज उपाध्याय, महेंद्र पुरोहित, धनश्याम नागोरी, राजेश नाईक, गोपाळ पंडित, सौरभ चौबे, अजित नांदेडकर, दिनकर जेऊरकर, कमलाकर फडणीस, शिवप्रसाद शर्मा, चंद्रकांत पाठक, धनश्याम देशपांडे, डॉ. अजित नांदेडकर, भूपेश कुळकर्णी, शशिकांत एकबोटे, निरंजन कुळकर्णी, मिलिंद चौधरी, नंदू नागराज, राजेश कुळकर्णी, नीलेश कुळकर्णी, डॉ. महेंद्र जोशी, अनंता देसाई, मुकुंद धर्माधिकारी, डॉ. नीलेश राव, योगेश पाठक, व्ही.पी. कुळकर्णी, अशोक जोशी, हेमंत वैद्य, नवरंग कुळकर्णी, भरत कुळकर्णी आदींचा सहभाग होता तसेच ब्राह्मण सभा, ब्राह्मण बिझनेस नेटवर्क, शुक्ल यजुर्वेदीय ब्राह्मण संघ, उत्तर भारतीय ब्राह्मण महासंघ, सिखवाल ब्राह्मण संघ, रामदासी ग्रुप, राजस्थानी ब्राह्मण संघ, सुरभि महिला मंडळ, गुजराथी ब्राह्मण संघ आदी ब्राह्मण समाजाच्या संघटनांचा सहभाग होता.

 

टॅग्स :SocialसामाजिकJalgaonजळगाव