शहरं
Join us  
Trending Stories
1
PM मोदींच्या आवाहनाला राकेश टिकैत यांचा पाठिंबा! सोन्याची खरेदी कशी होईल कमी? सुचवला 'जालीम उपाय'!
2
शरद पवारांच्या घरी अचानक भेट; बाहेर येऊन सुनील तटकरे म्हणाले, "मी गेले काही दिवस..."
3
शानदार.. जबरदस्त.. अफलातून..!! ५० षटकांत तब्बल ८२२ धावा; चौकार-षटकारांचा तर हिशेबच नाही...
4
LPG संकटात ग्राहकांना आणखी एक मोठा झटका! आता आपोआप बंद होणार 'या' लोकांची गॅस सबसिडी
5
अर्धशतकी खेळीसह साई सुदर्शनचा मोठा पराक्रम! हार्दिक पांड्याला मागे टाकत गिलच्या विक्रमाशी बरोबरी
6
खळबळजनक! मुंबईच्या जे. जे. रूग्णालयात निवासी डॉक्टरने उचललं टोकाचं पाऊल, नेमकं असं काय घडलं?
7
GT vs SRH : ७ चेंडूत २ विकेट्स! पॉवर प्लेमध्ये विदर्भकर प्रफुल हिंगेची हवा; अंपायरला निर्णय बदलावा लागला (VIDEO)
8
सुनेत्रा पवार गुवाहाटीत; कामाख्या देवीचे दर्शन, अजितदादांचा वारसा देशभरात नेण्याचा निर्धार
9
मुंबईत डॉकयार्ड रोडवर अज्ञातांकडून फायरिंग; एक जखमी, मागून झाडल्या दोन गोळ्या
10
२ राजयोगत अपरा एकादशी २०२६: ७ राशींना अनुकूल काळ, अडचणी संपतील; चांगला लाभ, भरघोस भरभराट!
11
सांगली हादरली! मंदिराची भिंत कोसळून सहा ठार, ८ जण जखमी; मृतांमध्ये दोन मुलांचा समावेश
12
राज्य विमा योजनेच्या रुग्णालयांमधील आरोग्य सुविधांचा लाभ प्रत्येक कामगारापर्यंत पोहोचवा!
13
Vistadome सुपरहिट, प्रवाशांचा १०० टक्के प्रतिसाद; ‘इतके’ कोटी कमावले, प्रवासाचा सुखद अनुभव!
14
टीम इंडिया T20 पाठोपाठ वनडे मध्येही नंबर १ ! पाकिस्तानला मोठा धक्का, कोण कुठल्या स्थानी?
15
सुनेचे तोकडे कपडे अन् 'रीलबाजी'! सासू-सासऱ्यांनी उचललं टोकाचं पाऊल; वाचा धक्कादायक कारण
16
IPL वंडर बॉय वैभव सूर्यवंशीचा ‘मास्टरशेफ’ अवतार; किचनमधील व्हिडिओ व्हायरल
17
Petrol Diesel Rate: पेट्रोल-डिझेल महागणार, सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसणार? केंद्र सरकारचे मोठे संकेत
18
WTC 2025-27 Points Table : बांगलादेशचा पाकिस्तानवर ऐतिहासिक विजय! टीम इंडिया फायद्यात; ते कसं?
19
सावधान! ९९% लोकांना टरबूज खाण्याची योग्य पद्धतच माहीत नाही; डॉक्टरांनी सांगितलेल्या 'या' ३ चुका पडू शकतात महागात
20
शहरातल्या गजबजाटापासून दूर थंड हवा, झोपाळ्यावर डुलकी; महापौर रितू तावडे यांचा गावी दौरा
Daily Top 2Weekly Top 5

फडणवीसांच्या दौऱ्यापासून मनपाचे पदाधिकारी राहिले दूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2020 11:58 IST

आपसातील मतभेद येताहेत समोर : शहराच्या निधी, विकासाबाबत कोणतीही चर्चा नाही

जळगाव : राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस गुरुवारी शहराच्या दौºयावर आले असता, त्यांनी कोविड रुग्णालयाला भेट देऊन कोरोनाबाबत जिल्ह्याची स्थिती जाणून घेतली. या दौºयात भाजपाची सत्ता असलेल्या महानगरपालिकेच्या बाबतीत महापौर, उपमहापौर व मनपाच्या इतर पदाधिकाऱ्यांसोबत काही चर्चा होतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र, या दौºयातून मनपाचे काही ठरावीक नगरसेवक वगळता इतर पदाधिकारी थोडे लांबच राहिले. हा दौरा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असल्याने मनपा व शहरविषयक कोणतीही चर्चा होणार नसल्याचे आधीच ठरले होते, अशी माहिती भाजपच्या पदाधिकाºयांनी दिली तर काहींनी या दौºयाबाबतची पूर्ण माहिती आम्हाला कळवली गेलीच नाही असेही सांगितले.
मनपात भाजपची सत्ता आहे. मात्र, दोन वर्षांत सत्ताधाºयांमधील आपसी मतभेदांमुळे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात मिळालेल्या निधीतून १२० कोटींचा निधी अद्याप खर्च करता आलेला नाही.
यासह अनेक पदाधिकाºयांची संघटनेतील पदाधिकाºयांशी पटत नाही तर ५७ नगरसेवकांमध्ये चार ते पाच गटांमध्ये सत्ता विभागली गेल्याने अनेक कामांना ब्रेकदेखील लागत आहे.
अशा पार्श्वभूमीवर फडणवीस भाजपच्या प्रमुख पदाधिकाºयांना मार्गदर्शन करतील, अशी अपेक्षा होती. मात्र, फडणवीस यांच्या दौºयात केवळ कोरोनावरच चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

पासेस् वितरण
प्रमुख पदाधिकाºयांना पासेसदेखील वितरीत केले होते. मात्र, पासेस वितरित केले असले तरी सुरक्षित अंतरासाठी दूर राहण्याचाही सूचना देण्यात आली होती. तसेच आमदार सुरेश भोळे, फडणवीस यांच्याकडेदेखील संघटनेतील पदाधिकारी म्हणजेच महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी, जिल्हा महानगर सरचिटणीस विशाल त्रिपाठी, डॉ. राधेश्याम चौधरी, राजेंद्र घुगे-पाटील, नगरसेवक जितेंद्र मराठे होते तर महापौर भारती सोनवणे यांनी जैन हिल्सवर फडणवीस यांची भेट घेतली.

हेतूपुरस्सर पदाधिकाºयांना ठेवले दूर ?
सध्या सत्ताधारी भाजपात रंगलेल्या नाराजीनाट्याची जोरदार चर्चा सुरू आहे. त्यातच काही नगरसेवकांनी याबाबत आमदार गिरीश महाजन यांच्याकडेदेखील चर्चा केली होती. त्यातच फडणवीस यांनी नगरसेवकांची किंवा काही पदाधिकाºयांसोबत बैठक घेतली असती तर या नाराजी नाट्यावर चर्चा झाली असती. त्यामुळे पदाधिकाºयांना मुुद्दामहूनच फडणवीसांच्या दौºयापासून दूर ठेवल्याची चर्चा आहे. यासाठी सुरक्षित अंतराचा मुद्दा निर्माण होईल, असे कारण देत पदाधिकाºयांना दूर ठेवले असल्याची माहिती भाजपच्या काही नगरसेवकांनी दिली.

विरोधी पक्षनेत्यांच्या दौºयाच्या वेळेस सर्व पदाधिकाºयांना पासेस उपलब्ध करून देण्यात आले होते. तसेच महापौरांनीही जैन हिल्स येथे विरोधी पक्षनेत्यांची भेट घेतली होती. सुरक्षित अंतरदेखील पाळणे गरजेचे होते. त्यामुळे काही नियम पाळावे लागले. कोरोनाबाबत विरोधी पक्षनेत्यांनी काही सूचना दिल्या आहेत. नागरिकांना लागणाºया गरजा पूर्ण करण्यासोबत गरजंूना मदत करण्याचा सूचना दिल्या आहेत.
-दीपक सूर्यवंशी, महानगराध्यक्ष, भाजप

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याJalgaonजळगाव