जामनेरनजीक पुन्हा अपघात; भुसावळचे दोन जण जागीच ठार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2021 13:04 IST2021-12-23T13:02:18+5:302021-12-23T13:04:12+5:30
भुसावळहून जामनेरमार्गे औरंगाबादला जात असलेल्या कारला अज्ञात वाहनाने धडक दिली.

जामनेरनजीक पुन्हा अपघात; भुसावळचे दोन जण जागीच ठार
जामनेर जि.जळगाव : भुसावळहून जामनेरमार्गे औरंगाबादला जात असलेल्या कारला अज्ञात वाहनाने धडक दिली. यात कारमधील एका महिलेसह दोन जण जागीच ठार झाले. हा अपघात गुरुवारी सकाळी ९.३० वाजता जामनेरपासून ३ किमी अंतरावर घडला. जामनेरनजीक दोन दिवसात झालेला हा दुसरा अपघात आहे. सुदैवाने या अपघातात सहा महिन्यांचे बाळ वाचले आहे.
पंकज गोविंदा सैंदाणे ( २५, रा. तुकाराम नगर,भुसावळ ), सुजाता प्रवीण हिवरे ( ३०, रा. त्रिमूर्तीनगर, रा. भुसावळ) अशी ठार झालेल्यांची नावे आहेत. हर्षा पंकज सैंदाणे, नेहा राजेश अग्रवाल, प्रतिभा जगदीश सैंदाणे, ६ महिन्यांचा चिमुकला स्पंदन पंकज सैंदाणे हे जखमी झाले आहेत. जखमींना जामनेरच्या जी. एम. हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. जामनेरच्या नगराध्यक्षा साधना महाजन आणि नागरिकांनी भेट देऊन जखमींची विचारपूस केली. दुसरीकडे भुसावळनजीक गुरुवारी सकाळी झालेल्या अपघातात एक ठार झाला आहे.