सदानंद दाते महाराष्ट्राचे नवे पोलीस महासंचालक! रश्मी शुक्ला यांच्याकडून स्वीकारला पदभार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2026 20:37 IST2026-01-03T20:32:32+5:302026-01-03T20:37:18+5:30

Sadanand Date DGP Maharashtra: दाते हे कडक शिस्तीचे आणि कर्तव्यनिष्ठ अधिकारी म्हणून ओळखले जातात

sadanand date new director general of police dgp of maharashtra head of police force after rashmi shukla | सदानंद दाते महाराष्ट्राचे नवे पोलीस महासंचालक! रश्मी शुक्ला यांच्याकडून स्वीकारला पदभार

सदानंद दाते महाराष्ट्राचे नवे पोलीस महासंचालक! रश्मी शुक्ला यांच्याकडून स्वीकारला पदभार

Sadanand Date DGP Maharashtra | भारतीय पोलीस सेवेतील अधिकारी सदानंद दाते यांनी आज महाराष्ट्र पोलीस महासंचालक (DGP) म्हणून पदभार स्वीकारला. राज्याच्या पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला आज सेवानिवृत्त झाल्या. त्यांच्या जागी नवीन पोलिस महासंचालक कोण असेल याची चर्चा गेल्या महिन्यापासून सुरू होती. राज्याच्या गृह विभागाने त्यासाठी सात ज्येष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांची नावे केंद्रीय लोकसेवा आयोगाकडे पाठवली होती. राष्ट्रीय तपास संस्थेचे (एनआयए) प्रमुख सदानंद दाते यांचे नाव यात प्रामुख्याने चर्चेत होते. केंद्रीय लोकसेवा आयोगाने सातपैकी तीन नावांची निवड करून ती राज्य सरकारकडे पाठवली होती. त्यातून सदानंत दाते यांच्या नियुक्तीवर ३० डिसेंबरला शिक्कामोर्तब करण्यात आले आणि आज त्यांनी पदभार स्वीकारला. "महाराष्ट्र राज्याच्या पोलीस महासंचालक मा. रश्मी शुक्ला यांचा आज कार्यकाळ पूर्ण झाला. त्यांच्या पश्चात १९९० तुकडीचे भा.पो.से. अधिकारी श्री. सदानंद दाते, यांनी महाराष्ट्र राज्य पोलीस महासंचालक, पदाचा पदभार स्वीकारला आहे. महाराष्ट्र पोलीस दल त्यांचे नेतृत्व आणि अनुभवाने अधिक सक्षम होईल", असे ट्विट करत महाराष्ट्र पोलिसांच्या अधिकृत एक्स अकाऊंटवरून पदभार स्वीकारल्याची माहिती दिली.

सदानंद दाते यांचा कार्यकाळ किती वर्षांचा असेल?

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या पॅनेलमेंट समितीने शिफारस केलेल्या पॅनेलमध्ये समाविष्ट असलेले सदानंद वसंत दाते, भारतीय पोलिस सेवा यांची 'महाराष्ट्र राज्याचे पोलिस महासंचालक (एचओपीएफ)' या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. निवेदनात म्हटले आहे की, सर्वोच्च न्यायालयाच्या संबंधित निकाल आणि आदेशांनुसार, 'पोलीस महासंचालक (HOPF)' या पदावर नियुक्त झालेल्या भारतीय पोलीस सेवेच्या अधिकाऱ्याचा कार्यकाळ दोन वर्षांचा असेल. त्यानुसार, भारतीय पोलीस सेवेचे सदानंद वसंत दाते हे नियुक्तीच्या तारखेपासून दोन वर्षांच्या कालावधीसाठी 'पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य (HOPF)' या पदावर राहतील.

कोण आहेत सदानंद दाते?

सदानंद दाते हे १९९० तुकडीचे आयपीएस अधिकारी असून, केंद्रात प्रतिनियुक्तीवर होते. राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) प्रमुख पदाची जबाबदारी त्यांच्याकडे होती. केंद्रीय समितीने दोन आठवड्यांपूर्वी मुदतपूर्व कर्तव्यमुक्त केल्याने त्यांच्या महासंचालक पदावरील नियुक्तीचा मार्ग मोकळा झाला होता. २६/११ हल्ल्यात अतिरेक्यांशी प्रत्यक्ष दोन हात करणारे दाते यांची कडक शिस्तीचे आणि कर्तव्यनिष्ठ अधिकारी म्हणून ओळख आहे. १ एप्रिल २०२४ पासून ते राष्ट्रीय तपास संस्थेचे (NIA) महासंचालक (डीजी) होते. यापूर्वी त्यांनी सीबीआयमध्ये उपमहानिरीक्षक (डीआयजी), महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाचे (एटीएस) प्रमुख, मुंबईतील सह पोलिस आयुक्त (गुन्हे आणि कायदा आणि सुव्यवस्था) आणि मीरा-भाईंदर आणि वसई-विरार प्रदेशांचे पोलिस आयुक्त म्हणून काम पाहिले आहे.

दाते यांनी वाणिज्य विषयात पदव्युत्तर पदवी, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून डॉक्टरेट (पीएच.डी.), इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंटंट्स ऑफ इंडियामधून पात्र कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटंट आणि हम्फ्रे फेलोशिप अंतर्गत मिनेसोटा विद्यापीठात व्हाईट-कॉलर आणि संघटित गुन्हेगारी नियंत्रणाचा अभ्यास केला आहे.

Web Title : सदानंद दाते महाराष्ट्र के नए पुलिस महानिदेशक नियुक्त, रश्मी शुक्ला का स्थान लिया

Web Summary : सदानंद दाते ने रश्मी शुक्ला से महाराष्ट्र के शीर्ष पुलिस पद का कार्यभार संभाला। 1990 बैच के आईपीएस अधिकारी दाते पहले एनआईए के प्रमुख थे। वह 26/11 के हमलों में अपनी भूमिका और कर्तव्यनिष्ठा के लिए जाने जाते हैं। उनका कार्यकाल दो साल के लिए निर्धारित है।

Web Title : Sadanand Date Appointed Maharashtra's New Police Chief, Succeeds Rashmi Shukla

Web Summary : Sadanand Date assumes Maharashtra's top police post from Rashmi Shukla. A 1990 batch IPS officer, Date previously headed the NIA. He's known for his role in the 26/11 attacks and commitment to duty. His tenure is set for two years.