शहरं
Join us  
Trending Stories
1
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
2
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
3
त्याच हॉटेलमध्ये राष्ट्राध्यक्षांवर ४५ वर्षांपूर्वी झालेला गोळीबार; डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले, पण...
4
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
5
संरक्षण क्षेत्रात भारताची आघाडी! रशियाच्या जुन्या भागीदाराला मिळाली साथ; पुतिनही हैराण
6
अशोक खरातचे आणखी 'काळे कारनामे' उघड! ऑफिसबॉयनंतर कुकनेही उडवली झोप; फार्महाऊसमधील कृत्य एसआयटीच्या हाती
7
कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता
8
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
9
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
11
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
12
माओवाद्यांकडून सशस्त्र क्रांतीचाच पुनरुच्चार! ‎'देवजी'ला ठरवले गद्दार: आत्मसमर्पण धोरणावर पत्रकातून आगपाखड 
13
हैदराबादहून चेन्नईला जाणाऱ्या चारमीनार एक्स्प्रेसला लागली आग, प्रवाशांनी धावत्या ट्रेनमधून मारल्या उड्या   
14
बैठे काम सिगारेट ओढण्याइतकेच घातक; दुर्लक्ष केल्यास आरोग्याचा निघणार ‘धूर’, कशी घ्याल काळजी? 
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
16
लग्नाच्या जल्लोषात रक्तरंजित वळण; नाचण्याच्या वादातून २२ वर्षीय तरुणाचा खून, चौघांविरोधात गुन्हा दाखल
17
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
18
"छत्रपती शिवरायांबद्दल अपशब्द खपवून घेणार नाही...", रितेश देशमुखने धीरेंद्र शास्त्रींना स्पष्ट शब्दांत सुनावलं
19
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
20
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
Daily Top 2Weekly Top 5

अमेरिका-इराण संघर्ष आता डिजिटल युद्धाच्या दिशेने; संपूर्ण मध्य-पूर्वेमध्ये ‘डिजिटल ब्लॅकआउट’?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2026 08:03 IST

इराण-अमेरिका संघर्ष आता तेलावरील वादातून माहिती आणि कनेक्टिव्हिटीवरील लढ्यात परिवर्तित झाला आहे. डिजिटल युगाचे साम्राज्य उभे करणाऱ्या अमेरिकेलाच इराणकडून खो बसतो आहे. होर्मुझची सामुद्रधुनी, जी एकेकाळी प्रामुख्याने ऊर्जा सुरक्षेचे प्रतीक होती, ती आता भौतिक आणि डिजिटल अशा दुहेरी रणनीतीचे केंद्र बनली असून संपूर्ण जगालाच तिने डिजिटल युद्धाच्या कक्षेत ओढले आहे. 

डॉ. सुखदेव उंदरेआंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक

होर्मुझच्या सामुद्रधुनीवर केंद्रित असलेला इराण आणि अमेरिका यांच्यातील संघर्ष एका नवीन आणि संभाव्यतः अधिक धोकादायक टप्प्यावर पोहोचला आहे. जगातील सर्वात महत्त्वाच्या तेल-पुरवठा मार्गांपैकी एकावर नियंत्रण मिळवण्यासाठी सुरू झालेला पारंपरिक लष्करी आणि आर्थिक संघर्ष आता एका हायब्रीड वॉरफेअर (संकरित युद्ध) मध्ये रूपांतरित होतो आहे. जिथे ‘सायबर क्षमता’ आणि ‘डिजिटल पायाभूत सुविधा’ ही प्रमुख युद्धभूमी म्हणून उदयास येत आहेत. 

हा संघर्ष पारंपरिक युद्धापुरता मर्यादित न राहता तो डिजिटल जगालाही आपल्या कवेत घेतो आहे. कालपर्यंत डोनाल्ड ट्रम्प इराणचे नेतृत्व संपवल्याचे सांगत होते, आज मात्र इराणचे नेतृत्व विभागले गेल्याचे सांगत आहेत. युद्धविराम संपायला अवघे काही तास उरले असतानाच, ट्रम्प यांनी हा संघर्ष अनिश्चित काळासाठी थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. कारण इराणने अमेरिकेसमोर डिजिटल व सायबर युद्धाचे मोठे आव्हान उभे केले आहे. नुकतेच, इराणी रिव्होल्यूशनरी गार्ड्सने ॲपल, गुगल, मायक्रोसॉफ्ट आणि स्टारलिंक यांसारख्या १८ प्रमुख अमेरिकन टेक कंपन्यांच्या पायाभूत सुविधांना लक्ष्य करण्याची धमकी दिली आहे, ज्यामुळे संपूर्ण मध्य-पूर्वेमध्ये ‘डिजिटल ब्लॅकआउट’ आणि इंटरनेटच्या वहनामध्ये व्यत्यय येण्याचा गंभीर धोका निर्माण झाला आहे.

इराण-अमेरिका संघर्ष आता तेलावरील वादातून माहिती आणि कनेक्टिव्हिटीवरील लढ्यात परिवर्तित झाला आहे. डिजिटल युगाचे साम्राज्य उभे करणाऱ्या अमेरिकेलाच इराणकडून खो बसतो आहे. होर्मुझची सामुद्रधुनी, जी एकेकाळी प्रामुख्याने ऊर्जा सुरक्षेचे प्रतीक होती, ती आता भौतिक आणि डिजिटल अशा दुहेरी रणनीतीचे केंद्र बनली असून संपूर्ण जगालाच तिने डिजिटल युद्धाच्या कक्षेत ओढले आहे. 

इराणने टेक कंपन्यांवर फिजिकल अटॅकची तयारी केली आहे. ‘ऑपरेशन १८’ द्वारे १८ कंपन्यांना डिजिटल लक्ष्य केले आहे. याद्वारे डिजिटल हेरगिरीला थोपविण्याचा इराणचा प्रयत्न आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स, क्लाउड कॉम्प्युटिंग्य, सर्विलांस टेक्नॉलॉजी, टार्गेट ट्रेकिंग, सॅटेलाईटद्वारा लोकेशनची मॅपिंग, सिग्नल इंटेलिजन्स इलेक्ट्रोनिक जॅमिंग आणि शेवटी टार्गेट लॉक... ही पूर्ण इलेक्ट्रोनिक वॉरफेअरची प्रक्रिया आहे, आणि यात इराणने स्वतःला कुशल केलेले आहे. 

सायबर युद्धाचा उदय आणि इराणची तयारी 

युद्धाच्या सुरुवातीच्या टप्प्यात हवाई हल्ले, नौदल संघर्ष आणि तेल पुरवठ्यात व्यत्यय आणण्यावर लक्ष केंद्रित केले जात असले तरी, आता सायबर युद्धाचे नवे रूप  अधिकाधिक समोर येत आहे. सुरुवातीपासूनच, लष्करी हल्ल्यांना पाठिंबा देण्यासाठी सायबर कारवायांचा वापर केला जात होता, ज्यात इराणच्या कमांड-अँड-कंट्रोल प्रणालींमध्ये व्यत्यय आणण्याचाही समावेश होता. इराणकडे दीर्घकाळापासून सायबर क्षमता आहे, ज्यात डिस्ट्रिब्युटेड डिनायल-ऑफ-सर्व्हिस हल्ले, हेरगिरी आणि पायाभूत सुविधांना लक्ष्य करण्याचा अनुभव समाविष्ट आहे. सध्याच्या संघर्षादरम्यान, शासन-समर्थित घटक आणि प्रॉक्सी हॅक्टिव्हिस्ट गट या दोघांनीही अमेरिका आणि मित्र राष्ट्रांच्या प्रणालींवर हल्ले केले आहेत, आणि आता जागतिक डिजिटल पायाभूत सुविधांना विशेषतः समुद्राखालील केबल्सना लक्ष्य करण्याचा धोका आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनुसार, इराणशी संबंधित शक्तींनी अमेरिका आणि इस्रायलवर हजारो सायबर हल्ले केले आहेत, ज्यात या प्रदेशातील डेटा सेंटर्स आणि नेटवर्क्सना लक्ष्य केले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : US-Iran conflict escalates to digital warfare; Middle East 'digital blackout'?

Web Summary : US-Iran tensions shift to cyber warfare as Iran threatens American tech infrastructure. A 'digital blackout' looms, endangering Middle East internet connectivity, escalating conflict beyond oil disputes.
टॅग्स :US Israel Iran Warअमेरिका-इस्रायल-इराण वॉरInternetइंटरनेट